Showing posts with label 'लाईव्ह'!!. Show all posts
Showing posts with label 'लाईव्ह'!!. Show all posts

Sunday, 17 May 2020

Zee Yuva | Dr.Don | डॉक्टर डॉन आणि डार्लिंग डीनचं प्रेम रंगणार 'लाईव्ह'!!


देवा भाई आणि डॉली हे लव्हबर्ड्स येणार लाईव्ह!!
कोरोना व्हायरसने सगळीकडे घातलेलं थैमान, आणि त्यामुळे लॉकडाऊन झालेलं जग, ही गोष्ट एव्हाना सवयीची होऊ लागली आहे. लाडक्या मालिका पाहण्याची संधी मिळत नसल्याने, आवडत्या पात्रांना आपण सर्वच जण खूप मिस करू लागलो आहोत. अशावेळी, 'झी युवा' वाहिनीवरील 'डॉक्टर डॉन' या मालिकेतील डॉन, अर्थात देवा भाई आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. घरातून बाहेर पडण्यास बंदी असली, तरीही इन्स्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून डॉक्टर डॉन प्रेक्षकांशी संवाद साधणार आहे. अनेक कलाकारांना आपण लाईव्ह आलेलं पाहिलं आहे, मात्र हे कलाकार मालिकेतील पात्राच्या रूपात लाईव्ह आलेले पाहायला मिळणार आहेत. मंगळवार, १९ मे रोजी संध्याकाळी ४ वाजता आपल्याला डॉक्टर डॉनला भेटता येणार आहे.  त्याच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या चाहत्यांना देवा भाई मिस करतोय. पण, तो त्याहून जास्त मिस करतोय, ते त्याच्या डार्लिंग डीनला! म्हणूनच इन्स्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून तो आणि डार्लिंग डीन चाहत्यांना भेटायला आणि त्यांच्याशी गप्पा मारायला येणार आहेत. मागच्यावेळी देवा भाई आणि सत्या लाईव्ह आलेले असताना, सत्याने देवा भाईसाठी केलेलं रॅप सगळ्यांनाच आवडलं होतं. यावेळी तो त्याच्या डार्लिंग डीनसोबत येणार असल्यामुळे, हे दोघे लव्हबर्ड्स कुठलं नवीन सरप्राईज घेऊन येतात, त्याची उत्सुकता सगळ्यांना आहे. देवदत्त नागे हा लाडका अभिनेता 'डॉक्टर डॉन' म्हणून, तर 'बोल्ड अँड ब्युटीफुल' श्वेता शिंदे, डार्लिंग डीन म्हणून लाईव्ह येणार असल्यामुळे, प्रेक्षकांसाठी ती दुहेरी मेजवानी ठरणार आहे. त्यांच्यासाठी ती एक मोठी पर्वणी असते. मंगळवार १९ मे रोजी, देवा भाई आणि डॉलीला पाहण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना मिळेल. ते