Showing posts with label अण्णा आणि माईंचे. Show all posts
Showing posts with label अण्णा आणि माईंचे. Show all posts

Monday, 2 March 2020

अण्णा आणि माईंचे टिकटॉक व्हिडिओज होत आहेत व्हायरल

झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले ’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले आहेमालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसंच या  भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेतयाचं बहुतांश श्रेय हे मालिकेतील कलाकारांनाही जातंमुख्य म्हणजे 'रात्रीस खेळ चाले ', मधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळत आहेही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहेजरी मालिकेत अण्णा आणि माई यांचं पटत नसलं तरी ऑफस्क्रीन दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत आणि सेटवर सगळ्यांसोबत ते तितकीच धम्माल करताना दिसतात.
गेले काही दिवस अण्णा आणि माई यांचे सेटवरील काही टिकटॉक व्हिडिओज तुफान व्हायरल होत आहेतया दोघांची धम्माल केमिस्ट्री पाहून नेटकरी देखील त्यांच्यावर फिदा झाले आहेतत्यांच्या या व्हिडिओजना चाहत्यांचा भरगोस प्रतिसाद मिळत आहेतजुन्या गाण्यांवरील अण्णा आणि माईंचे  कमाल हावभाव या व्हिडिओजचे हायलाईट आहेअण्णा आणि शेवंताची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जितकी कमाल आहे तितकीच अण्णा आणि माईंच्या टिकटॉक व्हिडीओजची चर्चा सध्या होत आहे.