Showing posts with label आरोह वेलणकर. Show all posts
Showing posts with label आरोह वेलणकर. Show all posts

Tuesday, 24 September 2019

चॉकलेट बॉय आरोह वेलणकरने दिली त्याच्या चाहत्यांना ट्रिट

बिग बॉस मराठीतला हँडसम हंक अभिनेता आरोह वेलणकरने एका मीट अँड ग्रीट’ सेशनचे आयोजन करून नुकतीच आपल्या चाहत्यांची भेट घेतली. विकेन्डला झालेल्या ह्या सेशनला महाराष्ट्रभरातून आलेल्या आपल्या चाहत्यांसोबत गप्पा-गोष्टी, गाणी- डान्स करत आरोहने छान मजा-मस्ती केली.
आरोह वेलणकर ह्या मीट अँड ग्रीट सेशनच्या आयोजनाविषयी सांगतो, रेगे सिनेमामूळे माझा चाहतावर्ग निर्माण झाला. नुकताच बिग बॉस मराठी हा रिएलिटी शो केल्यावर तर माझा चाहतावर्ग वाढलाय, हे माझ्या लक्षात आलं. कधी भेटून, कधी मेसेजस, फोन क़ॉल्स करून तर ब-याचदा सोशल मीडियाव्दारे वेगवेगळे फॅन्स माझ्याबद्दल त्यांच्या भावना व्यक्त करत होते. ह्या फॅन्समुळेच मी बिग बॉसच्या घरात खरं तर, सहा आठवडे राहू शकलो. त्यामुळे त्यांना भेटून कृतज्ञता व्यक्त करावी, असं मनात होतं. म्हणूनच त्यांना मी विकेन्डला एक छोटीशी ट्रिट दिली.
आरोह पूढे म्हणाला, पहिल्यांदाच अशा फॅनमीटव्दारे मी माझ्या चाहत्यांना भेटलो. त्यांच्यासोबत गप्पा मारणं, सेल्फी काढणं, त्यांची काही सजेशन्स ऐकणं हे सर्व करताना खूप मजा आली. माझ्या कुटूंबाशिवाय मी माझ्या फिल्मइंडस्ट्रीतल्या मित्रमंडळीचं एक दूसरं कुटूंब मानतो. आता ह्या फॅन्समुळे मला तिसरं कुटूंब मिळालंय, असं मला वाटतंय. आणि ह्या कुटूंबाशी मी आता सातत्याने टचमध्ये राहणार आहे.
बिग बॉसमूळे आरोह वेलणकरशी निगडीत शेर आया शेरपोरी पडत्यातए आरोविषय कट’ असे काही वनलाइनर्स प्रसिध्द झाले. हे वनलाइनर्सही त्याच्या चाहत्यांना खूप आवडले. ह्या वनलाइनर्सचे टी-शर्ट्स आरोहने त्याच्या चाहत्यांना भेट केले. आरोहच्या फॅनमीटला झालेल्या चाहत्यांची गर्दी पाहता, आरोहने बिगबॉसची ट्रॉफी जिंकली नसली, तरीही रसिकांची मनं जिकली असल्याचंच दिसून आलंय 

Friday, 13 September 2019

बिग बॉस फायनलिस्ट आरोह वेलणकरने पुढे केला पुरग्रस्तांना मदतीचा हात, मुख्यमंत्री मदतनिधीमध्ये दिले योगदान

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील फायनलिस्ट,  अभिनेता आरोह वेलणकरने नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी असलेल्या मुख्यमंत्री मदतनिधीसाठी त्याने 1 लाख रूपयांचा मदतनिधी दिला. मुख्यमत्र्यांच्या कार्यालयातून आरोहच्या ह्या स्तुत्य उपक्रमासाठी ट्विटही करण्यात आले.
'रेगे' फेम अभिनेता आरोह वेलणकर ह्याविषयी सांगतो, माझा सामाजिक कार्य करण्याकडे पूर्वीपासूनच कल असल्याने मी अशी मदत एरवी नेहमी करत असतो. त्याविषयी बोलायला मला जास्त आवडत नाही. पण ह्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयानेच ह्यविषयी ट्विट केले आहे.
तो पूढे म्हणतो, जेव्हा मी बिग बॉसच्या घरात होतो. तेव्हा महाराष्ट्रावर एवढे मोठे संकंट कोसळले होते. बाहेर आल्यावर मला ह्या गोष्टीची जाणीव झाली. ह्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देताना आर्थिक बळाची आवश्यकता असते. आपणही त्यात खारीचा का होईना वाटा उचलावा ही इच्छा झाली. आणि मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना मदतनिधी दिला,
आरोह अनेक सामाजिक संस्थांबरोबर संलग्न आहे. 'आय व्होटसारख्या वेगवेगळ्या जनजागृती मोहिमांमध्ये तो सहभागी झाला आहे. दिव्यांगांसाठीही तो काम करतो. सूत्रांच्या अनुसार, आरोहच्या ह्या उपक्रमामूळे त्याच्यावर आता कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

Thursday, 29 August 2019

५ गुण ज्यांच्यामुळे अभिनेता आरोह वेलणकर ठरेल बिग बॉस मराठी सिजन २चा विजेता!

बिग बॉस मराठीचे दुसरे पर्व आता अंतिम टप्प्यावर आले आहे. टॉप ६ स्पर्धकांमधून कोण विजेता ठरेल ह्याविषयी आता प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. वाईल्ड कार्ड एन्ट्री करूनही प्रेक्षकांची मनं जिंकून ग्रँड फिनालेला रेगे’ फेम आरोह वेलणकर पोहचला आहे.  आरोहमधल्या खालील पाच गुणांमूळे तो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य  गाजवतोय. 
१.      खिलाडूवृत्ती  वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतलेला आरोह वेलणकर बिग बॉस मराठीचे सगळे टास्क बेधडकपणे खेळतो. खेळत असताना समोरची व्यक्ती हि केवळ त्याच्यासाठी प्रतिस्पर्धी असते. भावना बाजूला ठेऊन केवळ टास्क जिंकण्याकडे त्याचे लक्ष असते. टास्क खेळताना त्याने कधीच बळाचा वापर केला नाही. प्रत्येक टास्क तो बुद्धिचातुर्याने खेळतो. नियमांचा भंग त्याच्याकडून कधीच होत नाही. सलमान खान आला असताना महेश मांजरेकर सुद्धा म्हणाले होते कि, “आरोह नियमांना धरून खेळणारा स्पर्धक आहे.” गेल्याच आठवड्यात त्याला बेस्ट परफॉर्मरचा किताबही मिळाला होता.
२.      स्पष्टवक्तेपणा – २० जुलैला बिग बॉसच्या घरात एन्ट्री केल्यापासून आरोह आपली मते नि:संकोचपणे व्यक्त करताना दिसला आहे. प्रेक्षकसह-सदस्यआणि माजी सदस्य या सगळ्यांच्या मते आरोह मुद्देसूद बोलतो. सगळ्यांनी त्याच्या स्पष्टवक्तेपणाची वाहवाही केली आहे. सोशल मिडीयावर कमेंट्समध्ये चाहत्यांनी त्याच्या या गुणाची प्रशंसा केली आहे. तिकीट टू फिनाले टास्क दरम्यान आलेल्या सगळ्या जुन्या स्पर्धकांनी त्याच्या खेळाची आणि स्वभावाची स्तुतीच केली होती. पाठीमागे न बोलता समोरासमोर शांत आणि स्पष्टपणे मते व्यक्त करणारा आरोह सगळ्यांचा आवडता आहे.   
३.      सर्वसमावेशक – बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश केल्यापासून आरोहने घरातल्या प्रत्येक सदस्यासह खास ऋणानुबंध जोडले. घरातल्या सर्व सदस्यांचे त्याच्याविषयी चांगले मत आहे. पहिल्या आठवड्यापासून आरोह मनमिळावूसर्वसमावेशक असल्याची मते सगळ्यांकडून व्यक्त केली जात होती. कायम वेगवेगळे किस्से आणि कहाण्या सांगून तो सदस्यांना एकत्र आणायचा, हे अनसीन-अनकटमधल्या व्हिडीयोजमधून स्पष्ट होत आहे. शिव ठाकरेअभिजित केळकर या दोघांबरोबर त्याचे खटके उडाले असताना आरोहने समोरून त्यांची माफी मागितली होती. घरातल्या सदस्यांबरोबर कमीत कमी वाद होतील यासाठी कित्येकदा न सांगता त्याने इतरांची कामे केली आहेत. घरात कायम शांत वातावरण राहील यासाठी तो काळजी घेत आला आहे. बिग बॉस मराठीच्या घरात मनमिळावूसर्वसमावेशक वृत्ती असलेला हा एकमेव सदस्य असू शकेल.
४.      तत्पर वृत्ती – बिग बॉसच्या घरात सगळे सदस्य समान असतात. त्यामुळे प्रत्येक आठवड्याला सदस्यांना कामाचे वाटप केले जाते. आरोहने त्याच्या वाटणीची सगळी कामे कायम तत्परतेने पूर्ण केली आहेत. कुठल्याही कामासाठी त्याने नाही म्हटले नाही. प्रत्येक काम तो मन लावून करत आला आहे. कामाबाबतीत तो कधीच तक्रारीला वाव ठेवत नाही. त्याने बऱ्याचदा इतर सदस्यांची सुद्धा कामे केली आहेत स्वतःच्या वाटणीची कामे झालेली असतानाही. इतरांची कामे करून सुद्धा त्याने त्याची वाच्यता कधी केली नाही. बिग बॉसच्या घरात असेच सदस्य सगळ्यांना हवेहवेसे वाटतात जे आपल्या कामाप्रती तप्तर असतात.
५.     सामाजिक भान जपणारा – बिग बॉस मराठीच्या अनेक अनसीन अनदेखाच्या भागांमध्ये आरोह विविध सामाजिक प्रश्नांविषयी आपली मते व्यक्त करताना दिसला आहे. बिग बॉस मराठीच्या अनसीन अनकट व्हिडीओमध्ये दिव्यांगांच्या असामान्य कर्तृत्वाच्या यशोगाथा आरोहने सांगितल्या होत्या. तो अनेक एनजीओजसाठी काम करतो. माय होम इंडिया’, ‘नुतन गुळगुळे फाउंडेशन’ अश्या अनेक सामाजिक संस्थांशी तो संलग्न आहे. आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून तो कायम समाजोपयोगी कामांना वेळ देत आला आहे. नुकतंच त्याने ध्वनी प्रदूषण करणे कसे चुकीचे आहेते कसे टाळले पाहिजे याविषयी अनसीन अनदेखामधल्या एका व्हिडीयोमध्ये सांगतले होते. आरोह हा अतिशय जागरूक स्पर्धक आहे. बिग बॉसच्या घरात आरोहने वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांविषयी सदस्यांना विचार मांडायला प्रवृत्त केले आहे.
बिग बॉस मराठी या रिऍलिटी शो मध्ये स्पर्धकांचे खरे चेहरे समोर येतात. स्पर्धक खऱ्या आयुष्यात कसे आहेत याची झलक प्रेक्षकांना मिळते. सूत्रांच्या अनुसारआरोहने कधीच कुठला मुखवटा धारण केला नाही. बिग बसमध्ये तो जसा आहे तसाच कायम वागत आला. आरोह खऱ्या आयुष्यात सुद्धा खूप मेहनतीसमंजस,स्पष्टवक्ता आहे. स्पर्धक म्हणून हे सगळे स्वभावगुण पाहता बिग बॉस मराठीच्या विजेतेपदासाठी आरोह वेलणकरचेच नाणे खणखणीत वाजेल असे वाटते. त्यामुळेच आरोह वेलणकर बिग बॉस मराठी सीजन २च्या ट्रॉफीवर हक्क गाजवताना कदाचित दिसू शकेल. 

Tuesday, 27 August 2019

आरोह वेलणकरला मिळतोय फिनालेसाठी प्रेक्षकांचा पाठिंबा

अभिनेता आरोह वेलणकरने वाईल्ड कार्ड म्हणून बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात २० जुलैला दणक्यात प्रवेश केला. कमी वेळातच आरोहने सगळ्यांची मने जिंकत टॉप ६ मध्ये बाजी मारली. आरोह वेलणकरचा स्पष्टवक्ता स्वभाव आणि बुद्धीचातुर्य वापरून खेळायची वृत्ती यामुळे अल्पावधीतच त्याने प्रेक्षकांची वाहवाही मिळवली. आरोहने टॉप ६ मध्ये एन्ट्री केल्यापासून सध्या सोशल मिडीयावरून त्याचे चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करतआहे.
आरोह वेलणकरच्या सोशल मिडीयावर चाहत्यांनी अगदी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.  त्या काही प्रातिनिधीक प्रतिक्रिया :
आरोह तू माझा सर्वात आवडता स्पर्धक आहेस. मी तुझा खूप मोठा चाहता आहेस. मला तुझ्या हातात बिग बॉसची ट्रॉफी पाहायची आहे. तू एक स्ट्राँग कंटेस्टंट आहेस. तू बिग बॉसच्या घरातला सर्वाधिक समजूतदार आणि सरळमार्गी कंटेस्टंट आहेस
आरोह तू बिग बॉसच्या घरात सर्वात चांगला खेळाडू आहेस. शिस्तबध्द खेळाडू आहेस. तू सुरूवातीपासून असतास तर तूच विनर झाला असतास. तू खूप हुशार आहेस. तू जसा खेळतो आहेस. त्यामूळे मला तूझा बिग ब़ॉसमधला परफॉर्मन्स खूप आवडतो आहे. 
आरोह तू स्पर्धक म्हणून माझा फेवरेट आहेस. तुझा स्पष्टवक्तेपणा मला आवडतो. टास्कमध्ये सुध्दा तू खूप छान खेळतोस. माझ्यासाठी तूच बिग बॉसचा विनर आहेस.
कुणाशी भांडण नाही ना तंट नाही. जिथे कुठे चुकलास, तिथे एकदम चांगल्या प्रकारे माफी मागितलीस. टास्कसगळेच एकदम मन लावून खेळलास. जरी बिग बॉस जिंकला नाही तरी काही हरकत नाही. कारण तू जनतेचं मन जिंकलंस.
तुझं घरातल्या प्रत्येक स्पर्धकाविषयीचं विश्लेषण अगदी योग्य असतं.  आपलं म्हणणं सर्वांसमोर ठामपणे मांडण्याची तुझ्यात हिम्मत आहे, ह्याचे मला कौतुक वाटते. 
तु वाइल्ड कार्ड असूनही सर्वांना मागे टाकलं दादा. वाइल्ड कार्ड कंटेस्टंटने कसं खेळावं हे तू दाखवून दिलंस . तू खूप मॉच्युअर्डली बोलतोस.  आणि बरोबर बोलतोस ते आम्हांला आवडतं.
जसे चाहते आरोहचे कौतुक करत आहेत. तसेच आरोहचे कौतुक बिग बॉसच्या घरातल्या स्पर्धकांनीही वेळोवेळी केले आहे. आरोहने एन्ट्री घेताक्षणी बिगबॉसच्या घरात एक सकारात्मकता आणली होती. त्याला पहिल्यांदाच भेटणारे अभिजित केळकर आणि वैशाली म्हाडे आरोहविषयी बोलताना, तो चांगला आहे. पॉझीटीव्हस्पष्ट आणि क्लीअर वाटतो. चांगलं जमेल त्याच्याशी. स्वभाव छान आहे.
 सुपरस्टार सलमान खान आलेला असताना महेश मांजरेकरांनी त्याची स्तुती केली होती कि, “आरोह नेहमी सत्याच्या बाजूने असतो. तो नियमांना धरून खेळणारा स्पर्धक आहे . असं म्हटलं होतं.
नुकत्याच झालेल्या वीकेंडच्या डावमध्ये आरोहला बेस्ट परफॉर्मरचा किताब मिळाला होता. महेश मांजरेकर म्हणाले होते ,”या आठवड्यात आरोह सेन्सिबल खेळला. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक बोलला.”  
थोडक्यात हँडसम हंक’ आरोहला फिनालेसाठी प्रेक्षकांचा भरभरून पाठिंबा मिळत आहे त्यामुळे तो बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता ठरला, तर आश्चर्य वाटू नये. 

Thursday, 1 August 2019

बिग बॉसमध्ये आरोह वेलणकरने सांगितले दिव्यांगांसाठी काम करतानाचे अनुभव

बिग बॉस मराठीच्या दुस-या पर्वात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतलेल्या रेगे फेम अभिनेता आरोह वेलणकरने समाजसेवा करतानाचे काही अनुभव बिग बॉसच्या घरच्यांशी बोलताना शेअर केले. बिग बॉस मराठीच्या अनसीन अनकट व्हिडीओमध्ये दिव्यांगांच्या असामान्य कर्तृत्वाच्या यशोगाथा आरोहने सांगितल्या.
आरोह वेलणकर म्हणाला, मी ज्या दिव्यांगांच्या संस्थेसोबत काम करतो. त्या संस्थेसोबत काम करताना दिव्यांगांच्या असमान्य कर्तृत्वाची अनेक उदाहरणं पाहायला मिळाली आहेत. एका इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांचा डान्स करताना अपघात झाला. ह्या अपघातात तो मानेखालचे शरीर निकामी होऊनही न डगमगता त्याने इंजिनिअरिंग पूर्ण करून आता एक वेबसाइट सुरू केली आहे. मला भेटलेल्या अशा अनेक असामान्य व्यक्तिंमध्ये अपघातात एमए इकॉनोमिक्स असलेला अपघातग्रस्त टॅक्सीचालक, संपूर्ण अंध असलेल्या एका महिला वकिलाची आणि पाय नसलेल्या बॉडीबिल्डर मि.ऑलिम्पियाची यशोगाथा मला भारावून टाकणारी होती.
सुत्रांच्या अनुसार, अभिनेता आरोह वेलणकर निरनिराळ्या सामाजिक संस्थांसोबत संलग्न आहे. आय व्होट’ ह्या जनजागृती मोहिमेतून त्याने नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणूकांमध्ये मतदान करण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. तसेच माय होम इंडिया ह्या सामाजिक एकात्मतेसाठी काम करणा-या संस्थेसोबतही तो संलग्न आहे. माय होम इंडियाच्या सपनों से अपनों तक ह्या मोहिमेत त्याचा सक्रिय सहभाग होता. बिग बॉसमध्ये आरोहने नुकतेच काही हृदयस्पर्शी अनुभव सांगितले. हे अनुभव त्याला नुतन गुळगुळे फाउंडेशन’ सोबत काम करताना आले होते. ह्या समाजसेवी संस्थेव्दारे काम करताना त्याला दिव्यांगाच्या असामान्य प्रतिभेची अनुभूती आली. आरोहला जेव्हा जेव्हा चित्रीकरणातून किंवा नाटकांच्या प्रयोगांमधून वेळ मिळतो तेव्हा तो सामाजिक कार्यामधे स्वतःला गुंतवतो.

Saturday, 20 July 2019

हॅंडसम हंक आरोह वेलणकरची बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री



INSTAGRAM - 

SHER AAYA SHER @arohwelankar In #biggbossmarathiseason2 as a Second Wild Card Contestant
@colorsmarathiofficial @endemolshineind
#arohwelankar #weekendchadav #biggboss #wildcardentry #sherayasher

TWITTER 

@ArohWelankar 
@EndemolShineIND @ColorsMarathi
#arohwelankar #weekendchadav #biggboss #wildcardentry #sherayasher