Showing posts with label बिग बॉस. Show all posts
Showing posts with label बिग बॉस. Show all posts

Tuesday, 18 June 2019

महागायिका वैशाली म्हाडे झाली बिग बॉसच्या घराची पहिली महिला कॅप्टन

बिग बॉसच्या घरात चौथ्या आठवड्यात महागायिका वैशाली म्हाडे कॅप्टन झाली आहे. बिग बॉसने दिलेल्या सही रे सही ह्या टास्कमध्ये जिंकून वैशाली कॅप्टन झाली आहे.  वैशालीने फळ्यावर सर्वाधिक ऑटोग्राफ म्हणजेच 276 स्वाक्ष-या करून कार्य जिंकले.
झीमराठीवरच्या सारेगमप ह्या रिएलिटी शोव्दारे सिनेसृष्टीला ही महागायिका मिळाली. त्यानंतरही वैशाली दरवर्षी एक रिएलिटी शोव्दारे आणि मराठी-हिंदी टिव्ही आणि सिनेसृष्टीत गायलेल्या आपल्या एकाहून एक सुमधूर गाण्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
हिंदी-मराठी टेलिव्हीजनवर 10 रिएलिटी शो केल्यावर वैशालीचा बिग बॉस हा अकरावा रिएलिटी शो आहे.  वैशाली बिग बॉसच्या घरात जाताना म्हणाली होती, मी जशी आहे, तशीच बिग बॉसच्या घरात राहून घरातल्यांची आणि माझ्या चाहत्यांची मनं जिंकण्याचा मी प्रयत्न करेन.
वैशालीने पहिल्या दिवसापासूनच कोणताही मुखवटा न घालता खरेपणाने ह्या रिएलिटी शोमध्ये आपले  वेगळे स्थान निर्माण केले. म्हणूनच जेव्हा वैशाली कॅप्टन झाली तेव्हा शिवने आणि संपूर्ण घरच्यांनी तिचे कॅप्टन रूममध्ये थाटात स्वागत केले. 

Friday, 7 June 2019

बिग बॉस घेणार कठोर निर्णय... शिवानी आणि वीणा बिग बॉसच्या घरात रहाण्यास अपात्र ...

मुंबई ७ जून२०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये चोर बाजार हे साप्ताहिक कार्य कालच संपले... या टास्क दरम्यान घरामध्ये खूप क्लेशहातापायी आणि भांडण झाली... सदस्यांनी एकमेकांचे कपडेसामान उधळून लावले. प्रत्येक सदस्य आपल्या टीमला टास्क मध्ये जिंकवण्याच्या मागे होता... परंतु यामध्ये सदस्य बिग बॉसच्या घराच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसले... वेळोवेळी बिग बॉस यांनी ताकीद देऊन देखील पूर्ण टास्क मध्ये सदस्यांनी हे सुरूच ठेवले... समंजस आणि सुज्ञ सदस्यांकडून अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन होणे अनपेक्षित आहे... याच चोर बाजार या टास्क दरम्यान काल शिवानी आणि वीणामध्ये शाब्दिक चकमकी बरोबरच एकमेकांवर त्यांनी हात देखील उचलले ... बिग बॉसच्या घरात मारहाणी करणे अथवा कुठल्याही प्रकारची हिंसा अमान्य आहे हे सदस्यांना माहिती असून देखीलही त्यांचा रागावर ताबा नसल्याने हे कृत्य शिवानी आणि वीणाकडून घडले... आता बिग बॉस या कृत्यावर घेणार कठोर निर्णय हे नक्की.
 शिवानी आणि वीणा बिग बॉसच्या घरात रहाण्यास अपात्र...
बिग बॉसच्या घरातील नियमांची पूर्णपणे कल्पना असूनही या दोघींनी हिंसक कृत्य या टास्क दरम्यान केले. या दोघींनी नियम तोडले आणि त्याचे समर्थन देखील केले. अशा वागण्यातून या दोघींची अखेळाडू वृत्ती दिसून येते आणि अशा प्रकारची हिंसा सुज्ञपणाच्या व्याख्येत मोडत नाही असे बिग बॉस यांनी दोघींनाही निक्षून सांगितले... अशा प्रकारच्या कोणत्याही घटना बिग बॉसच्या घरात घडू नये अथवा अशा घटना घडण्यासाठी त्याला चालना मिळू नये म्हणून बिग बॉसनी याससंदर्भात कठोर निर्णय सुनावला... आणि तो म्हणजे शिवानी आणि वीणा बिग बॉसच्या घरात रहाण्यास अपात्र आहेत... बिग बॉस च्या या निर्णयाने सगळ्या सदस्यांन आश्चर्याचा धक्का बसला आहे... आजच्या भागामध्ये काय घडेल हे नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.