Showing posts with label बिग बॉस मराठी सिझन 2... Show all posts
Showing posts with label बिग बॉस मराठी सिझन 2... Show all posts

Thursday, 1 August 2019

बिग बॉस मराठी सिझन 2 – शिवानीला कोणी मारला टोंबणा ? अभिजीत बिचुकलेंना शिवानीचा सल्ला ...


 
मुंबई १ ऑगस्ट, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये शिवानी आणि अभिजीत बिचुकले यांचे पहिल्यापासूनच चांगले आहे... काल शिवानीचे वडील घरामध्ये येऊन गेले... त्यांनी देखील बिचुकलेंना सांगितले तुमचं आणि शिवानीचं टुयनिंग चांगलं आहे... तर अभिजीत केळकरचे देखील आभार मानले तो तिला बहिणी सारखे घरामध्ये वागतो... आज शिवानी अभिजीत बिचुकलेंवर थोडीशी चिडलेली दिसणार आहे... मुद्दा आहे कपडे सिलेक्ट करण्याचा... अभिजीत बिचुकलेंनी विणाला कपडे सिलेक्ट करायला संगीतले... आणि तिथून हा विषय सुरू झाला...  शिवानीचे म्हणणे आहे, “तुम्हाला कळत नाही का कोण तुमच्या बाजूने आहे आणि कोण तुमच्या मागे बोलते ? ती बाहेर येऊन काय बोली माहिती आहे का तुम्हाला ? उगाच तुम्ही कशाला चांगले बनायला जाता ? त्यावर बिचुकले म्हणाले मी सांगू का काय झाले ? त्यावर शिवानी म्हणाली मी काय बोलते ते पूर्ण होऊ द्या ... “तुम्ही विणाला सांगितले ना माझे कपडे सिलेक्ट कर... ती बाहेर येऊन म्हणाली, “मला इंटरेस्ट नाहीये कोणाचे कपडे सिलेक्ट करण्यात, आणि तेवढ्यात मी आले तर मला टोंबणा मारला ज्यांना असेल त्यांनी जाव”.
आता हा वाद किती वाढेल ? यावर शिवानी तिला काही म्हणाली का ? अभिजीत बिचुकलेंचे यावर काय म्हणणे आहे ? हे कळेल आजच्या भागामध्ये... तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन 2 आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर...