Showing posts with label बिग बॉस मराठी सीझन 2. Show all posts
Showing posts with label बिग बॉस मराठी सीझन 2. Show all posts

Monday, 29 July 2019

बिग बॉस मराठी सीझन 2 – वीणा आणि शिवमध्ये कोण दिसत आहे गोड ? वीणाकडून शिवला मिळाली कॉमप्लिमेन्ट...


मुंबई २९ जुलै, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये ज्यांची चर्चा विशेष रंगते ते सदस्य म्हणजे वीणा आणि शिव... त्यांच्यामध्ये असलेल्या मैत्रीची चर्चा चांगलीच रंगत आहे... वीणासाठी शिवने म्हंटले बेखयाली हे गाणे... या दोघांमधील मैत्री अजूनच दृढ होत जाते आहे... या दोघांचे एकमेकांशिवाय पान हलत नाही... वीणाला जेंव्हा शिवची गरज असते तेंव्हा तो तिच्यासाठी खंबीरपणे उभा असतो... आज शिवला वीणाकडून कॉमप्लिमेंट मिळाली आहे... वीणा शिवला म्हणाली “तू आज छान दिसतो आहे” त्यावर शिवचे म्हणणे आहे, तू जास्त गोड दिसते आहे एकदम कडक, रापचिक दिसते आहेस... आणि मग वीणाने शिवला सांगितले मी तर गोड आहे तू तर छान आहेस. वीणाचे म्हणणे आहे काल महेश सर म्हणाले जो विजेता असेल त्याला मी परफ्यूम देणार आणि मला माहिती आहे कोणाला मिळणार... वीणाल वाटते आहे ती विजेती आहे आणि तिला परफ्यूम मिळणार आहे...
आता बघूया कोणाला गिफ्ट मिळणार ... वीणा आणि शिवमधील मैत्री अशीच टिकेल का ? की यांच्यामध्ये गैरसमज होतील ? हे कळेलच... तेंव्हा नक्की बघा

Saturday, 20 April 2019

बिग बॉस मराठी सीझन 2लवकरच कलर्स मराठीवर !

मुंबई २० एप्रिल, २०१९:बिग बॉस मराठीच्या पहिल्या यशस्वी सीझननंतर, कलर्स मराठी आता घेऊन येत आहे बिगबॉस मराठी कार्यक्रमाचा सीझन दुसरा. पहिल्या पर्वामध्ये सूत्रसंचालनाच्या अनोख्या स्टाईलने ज्यांनी प्रेक्षक आणि सदस्य सगळ्यांचीच मने जिंकली असे आपल्या सगळ्यांचे आवडते महेश मांजरेकर बिग बॉस मराठी सीझन 2 चे सूत्रसंचालन करणार आहेत. महेश मांजरेकर नुकतेच या कार्यक्रमाच्या एका प्रोमोचे शूट करताना दिसले.महेश मांजरेकरया प्रोमोमध्ये राजकीय नेत्याच्या वेशभूषेत दिसणार आहेत. आता हा प्रश्न प्रेक्षकांना नक्कीच प्रेक्षकांना पडू शकतो कि, या वेळेस बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एखादी राजकीय क्षेत्रातील व्यक्ती तर दिसणार नाही ना !
संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षक खूप उत्सुक आहेत या कार्यक्रमाच्या नव्या सीझनसाठी. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या वेळेस कोणते ख्यातनाम व्यक्ती जातील याविषयाचे तर्क बांधण्यास देखील सुरुवात झाली आहे. “बिग बॉस” हा कार्यक्रम भारतातील सगळ्यात उत्कंठावर्धक कार्यक्रम आहे ज्याची वाट प्रेक्षक मोठ्या आतुरतेने बघत असतात, जो अनेक प्रादेशिक भाषा म्हणजेच हिंदी, मराठी, कन्नड आणि तमिळ मध्ये देखील लोकप्रिय आहे. हिंदी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुपरस्टार सलमान खान करतो.