Showing posts with label माधव देवचके. Show all posts
Showing posts with label माधव देवचके. Show all posts

Wednesday, 4 September 2019

गणेशोत्सवाच्या निमित्ताने माधव देवचकेच्या घरी झालं बिग बॉस मराठीचं रियुनियन

बिग बॉस मराठी संपल्यानंतरही माधव देवचकेनेहा शितोळेहिना पांचाळ, आरोह वेलणकर आणि शिवानी सुर्वेने आपली मैत्री जपली आहे.
माधव देवचकेच्या घरी गणपती
 बाप्पाच्या दर्शनासाठी नेहा आणि हिना आल्या होत्या. बाप्पाच्या दर्शनानंतर माधवने आरोह वेलणकर आणि शिवानी सुर्वेला व्हिडीयो कॉल केला आणि मग हिना, माधव, नेहा, आरोह आणि शिवानीच्या बराचवेळ गप्पा रंगल्या. ह्या गप्पांनंतर माधव, हिना आणि नेहाने घरात खूप धमाल केली. 
सूत्रांच्या अनुसार, अभिनेता माधव देवचकेच्या घरी दरवर्षी गणपती दर्शनाला त्याचे शाळा-कॉलेजपासून ते फिल्म इंडस्ट्रीतल बरेच मित्र-मैत्रिणी येतात. आता ह्यामध्ये हिना, नेहाचीही भर पडलीय. त्याला बिग बॉसमध्ये मिळालेल्या ह्या दोन मैत्रिणींशी त्याचे ऋणानुबंध आयुष्यभरासाठी जुळले. ह्या नेहा-हिनाने माधवच्या घरी खूप धमाल केली. त्याच्या सर्व घरच्यांसोबत भरपूर गप्पा मारण्याशिवाय त्या तिघांनी एक मस्त डान्सही केला. ज्याचा व्हिडीयो माधवने नंतर आपल्या सोशल मीडियावर टाकला.
नेहा आणि हिना गणपती दर्शनासाठी घरी भेटायला आल्या त्यामुळे माधवला खूप आनंद झाला. तो म्हणतो, "गेल्या 60 वर्षांपासून आमच्या घरी गणपती बसत आहे पण हे वर्ष आमच्यासाठी अधिक खास आहे कारण बिग बॉसच्या घरातल्या दोन नव्या मैत्रिणी माझ्या घरी आल्या आहेत. बाप्पाच्या दर्शनासाठी आल्या आहेत."
माधव आणि त्याच्या घरच्यांना भेटून नेहा म्हणाली, "माधवच्या घरी मी पहिल्यांदाच गणपतीसाठी आले आहे. पण माधवच्या घरची मंडळी इतकी गोड आहेत की मला अजिबात असं वाटत नाहीये की मी पहिल्यांदाच त्यांना भेटते आहे. मुंबईतलं माझं घर सोडून आता अजून एक नविन घर मला मिळालयमी बऱ्याचदा कामानिमीत्त मुंबईत असल्यामुळे घरात गणपती बसवणे खूप मिस करते पण यावर्षीपासून आता माधवच्या घरी गणपती येत असल्याने घरी नसणे मी मिस करणार नाही."
हिना आणि माधवचे बिग बॉसच्या घरात काही वेळेला मतभेदकडाक्याची भांडणं झाली होती. परंतू बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर ते सारे रुसवे फुगवे विसरून ते पुन्हा नव्याने मित्र म्हणून भेटले. त्याविषयी हिना म्हणते, "बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली तेव्हा कुठल्याच स्पर्धकांशी माझी ओळख नव्हती. पण बिग बॉसच्या घरातून परत आल्यावर बाहेरच्या जगात त्यांच्या बरोबर जगणं खूप वेगळी आणि मस्त फिलींग आहे. बिग बॉसच्या घरामूळे मला खास दोस्तबेस्ट बडीज मिळाले. बिग बॉसच्या घरात स्पर्धकांबरेबर भांडणं होतात पण बाहेर आल्यावर ते विसरून सगळे पुन्हा खूप छान मित्र होतात." 

Tuesday, 2 July 2019

माधव देवचके बनला बिग बॉस मराठीच्या घराचा कॅप्टन

बिग बॉसमराठीच्या दूस-या पर्वात ह्या आठवड्यात  अभिनेता माधव देवचके घराचा कॅप्टन बनला आहे. बिग बॉसने दिलेल्या सहनशक्ती टास्कमध्ये आपल्या खिलाडुवृत्तीने तो जिंकला. आणि कॅप्टन बनला. 
बिग बॉसच्या घरच्यांनी कॅप्टनपदासाठी वीणा जगताप आणि माधव देवचकेला उमेदवारी घोषित केली होती. ह्या दोन्ही उमेदवारांसाठी  स्विमींग पूलमधल्या खांबावर जास्तीत जास्त वेळ उभे राहून कॅप्टन बनण्यासाठीचे कार्य दिले होते. ह्या कार्यात जास्त वेळ उभे राहून माधव जिंकला. आणि त्याला कॅप्टनपद मिळाले. 
माधव देवचकेच्या जवळच्या सूत्रांच्या अनुसार, "बिग बॉस मराठीच्या घरात गेल्या आठवड्यात झालेल्या तणावमय वातावरणानंतर आता घराला सर्वांचे समजून घेणारा आणि सर्वांशी जुळवून घेणारा कॅप्टन हवा होता. आणि माधवच्या कॅप्टन बनण्याने घरातले वातावरण शांत राहण्यास नक्कीच मदत होईल." 
ह्या आठवड्यातल्या 'विकेन्डच्या वार'ला महेश मांजरेकरांनीही माधवच्या शांत स्वभावाचीच स्तूती केली होती. महेश मांजरेकर म्हणाले होते, "ही डोन्ट हॅव एनी बॅड ब्लड इन दि बॉडी. माधव खूप भोळा आहे . तो कोणालाच वाईट बोलत नाही. कोणालाच दुखवत नाही. हे खरं तर ह्या गेममध्ये करून चालत नाही." 

Thursday, 20 June 2019

मी बाथरूम सिंगर आहे – माधव देवचके

बिग बॉस मराठीच्या दुस-या पर्वात असलेल्या कन्टेस्टंट अभिनेता माधव देवचकेला संगीतची विशष गोडी आहे. माधवला संगीताचे शास्त्रशुध्द शिक्षण न घेताही तो अनेकदा ताना आणि हरकती चांगल्या घेतो, असे त्याच्या जवळची लोकं म्हणतात.
बिगबॉसच्या घरात जाण्याअगोदर आपल्या गाण्याविषयीच्या आवडीविषयी माधव सांगतो, मी प्रचंड फिल्मी आहे. त्यामुळे मी फिल्मीसंगीतावरच वाढलो. आयुष्यातल्या प्रत्येक सिच्युएशनवेळी मला साजेसे गाणे पटकन सुचते. किशोरकुमार हे माझे सर्वात आवडते गायक. त्यांची गाणी तर आपल्या प्रत्येक मुडसाठी आहेत.
माधव आपल्या गायनाच्या आवडीविषयी सांगतो, मी खरं तर बाथरूम सिंगर आहे. संगीताविषयीची आवड आहे. पण मी शास्त्रशुध्द शिक्षण घेतले नाही. मी स्वत:ला गानसेन नाही, तर कानसेन म्हणेन.