Showing posts with label वच्छीला होणार शोभाचा भास?. Show all posts
Showing posts with label वच्छीला होणार शोभाचा भास?. Show all posts

Tuesday, 12 November 2019

वच्छीला होणार शोभाचा भास?

झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसंच या २ भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. याचं बहुतांश श्रेय हे मालिकेतील कलाकारांनाही जातं. मुख्य म्हणजे 'रात्रीस खेळ चाले २', मधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळत आहे. ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे.
प्रेक्षकांनी नुकतंच मालिकेत पाहिलं कि, अण्णांनी काशीसारखाच शोभाचा खून देखील केला आहे. शोभा घरी परतली नाही म्हणून एकीकडे वच्छी खूपच काळजीत आहे आणि दुसरीकडे पोलिसांची चौकशी जोरात सुरु आहे. वच्छी शोभला शोधण्याचे सगळे मार्ग वापरते. इतकंच काय तर रघु गुरुजींकडे देखील जाते. तिराहित तिला शोभाचं श्राद्ध घालायला सांगतो. वच्छीचा विरोध असून देखील हे श्राद्ध होणार आहे. या श्राद्धानंतर काशी आणि शोभा दिसणार आहेत. हा भास आहे कि सत्य? पोलीस तपासानंतर अण्णांपर्यंत पोहोचू शकतील का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.