Showing posts with label हे मन बावरे आणि घाडगे & सून. Show all posts
Showing posts with label हे मन बावरे आणि घाडगे & सून. Show all posts

Wednesday, 14 August 2019

कलर्स मराठी रंगणार रक्षाबंधन विशेष आठवडा ! बाळूमामाच्या नावानं चांगभलं, सुखाच्या सरींनी हे मन बावरे आणि घाडगे & सून मालिकांचे खास भाग


 
मुंबई १४ ऑगस्ट, २०१९ : रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन… भाऊ आणि बहिणीचे नाते निस्वार्थी आणि पवित्र असते... कलर्स मराठीवरील मालिकांमध्ये देखील रक्षाबंधन हा सण साजरा होणार आहे. बाळूमामाच्या नावानं चांगभलं, घाडगे & सून आणि सुखाच्या सरींनी हे मन बावरे या मालिकांचे रक्षाबंधन विशेष भाग या आठवावड्यामध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. मालिकेतील लाडक्या नायिका म्हणजेच अनु,अमृता रक्षाबंधन हा सण साजरा करणार आहेत. तेंव्हा नक्की बघा मालिकांचे विशेष भाग या आठवडयामध्ये सोम ते शनि संध्या ७.३० वाजल्यापासुन आपल्या कलर्स मराठीवर.
बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेमध्ये देखील गंगी बाळूमामांना राखी बांधणार आहे..बाळू सत्यवाच्या लग्नापासून गंगी आणि बाळूच्या नात्यात ताण आला होता... त्यानंतरही गंगीचा सांभाळ करण्यासाठी घरच्यांमुळे बाळूला अक्कोळ सोडून याव लागलं. हा राग बाळूच्या मनात आहेच. पण गंगी- बाळू मधल्या ह्या वादावर रक्षाबंधांनाच्या गोड क्षणांनी पडदा पडणार आहे... सगळा राग विसरून अखेर भाऊ-बहीण पुन्हा नव्याने नात्यातला ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.... बाळूममा गंगीला धीर देत सत्यवाची काळजी करू नकोस असे, सगळे नीट होईल पांडूरंगाचे नामस्मरण कर असा मोलाचा सल्ला देणार आहेत.  
घाडगे & सून मालिकेमध्ये काही महिन्यांपासून बर्‍याच घटना होत आहेत... भाग्यश्रीने अमृतावर असलेल्या विश्वासाखातर बाळाला सांभाळण्याची खूप मोठी जबाबदारी सोपावली आहे... यामुळेच घाडगे सदनात नवं गोड नात निर्माण होणार आहे.. आजवर अमृताने घाडगे कुटुंबातल्या अनेक व्यक्तींना मायेने आपलस करून घेतलंय... अमृताने घाडगे सदनमध्ये पाऊल ठेवल्यापासून अनंतच्या मनात अमृताबद्दल अढी आहेत... परंतु अमृता घेत असलेली बाळाची काळजी अनंतला अखेर दिसली... यामुळेच यावर्षी अमृताने आपल्याला राखी बांधावी अशी ईच्छा अनंतने अमृताजवळ व्यक्त केली... याचाच मान ठेवत अमृता यावर्षी अनंतला राखी बांधणार आहे... “मी बाळाची आणि आईची भेट घडवून आणेन” आणि ही माझ्याकडून माझ्या भावाला भेट असेल” असे याक्षणी अमृता अनंतला वचन देणार आहे ज्यापासून तो अनभिज्ञ आहे
सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेमध्ये नुकतेच अनु आणि सिद्धार्थ लग्न बंधनात अडकले आहेत... अनुचा गृहप्रवेश झाला आहे. अनुचे लग्नानंतर पहिलेच रक्षाबंधन असल्याने दुर्गा अनुकडे ईच्छा व्यक्त करणार आहे की, तिने यावर्षीचे रक्षाबंधन तत्ववादीच्या घरी साजरी करावे...आणि याला अनु होकार देते... दीक्षित कुटुंब पहिल्यांदाच तत्ववादींच्या घरी येणार आहे.पुढे काय घडेल ? दुर्गा हे रक्षाबंधन निर्विघ्नपणे पार पडू देईल ? हे बघणे रंजक असणार आहे.