Showing posts with label ‘एबी आणि सीडी’. Show all posts
Showing posts with label ‘एबी आणि सीडी’. Show all posts

Tuesday, 3 March 2020

मराठी कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला ‘एबी आणि सीडी’चा ट्रेलर प्रकाशन सोहळा

Here's the trailer link- https://bit.ly/38kT4EK  
आता होणार चर्चा एबी आणि सीडीची
OR
प्रत्येक घराघरांत घडणारी आजची गोष्ट असलेल्या एबी आणि सीडीचा ट्रेलर प्रदर्शित
अमिताभ बच्चन आणि चंद्रकांत देशपांडे यांची दाट मैत्री आहे म्हणे”, या वाक्याची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रात होणार आणि ही केवळ वरवरची चर्चा नसून यातला एक अन् एक शब्द खरा आहेतसा ठोस पुरावा प्रेक्षकांकडे आहे. आता हा पुरावा म्हणजे नेमकं काय तर... मिलिंद लेले दिग्दर्शित एबी आणि सीडी’ सिनेमाचा ट्रेलर.
अक्षय बर्दापूरकरप्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित एबी आणि सीडी’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच मुंबई येथे पार पडला. ट्रेलर प्रकाशन सोहळ्यात सिनेमाची टीम आणि मराठी सिनेसृष्टीतील कलाकार अमृता खानविलकरश्रेयस तळपदेप्रसाद ओक उपस्थित होते.
सुख आणि दु:ख सगळ्याची भरपूर आवर्तने झाली माझ्या आयुष्यात” या भावनिक संवादाने सुरु झालेला एबी आणि सीडीचा ट्रेलर हळूहळू सिनेमाच्या कथेची झलक दाखवतो. प्रत्येक घराघरांत घडणारी ही आजची गोष्ट आहे.
जुन्या गोष्टी अडगळीत टाकल्या जातात तसे वृद्धापकाळात घरातील वृद्धांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते. पण या कठीण परिस्थितीत ७५ वर्षांचे चंद्रकांत देशपांडे यांच्या मदतीला फक्त त्यांचा मित्र धावून येतो आणि तो मित्र म्हणजे एबी’ अर्थात अमिताभ बच्चन’. अमिताभजींकडून आलेले एक पत्र सीडी’ चंद्रकांत देशपांडेच्या आयुष्यात नवेउत्सुकतेचे आणि आनंदाचे रंग भरायला मदत करते. एका पत्रामुळे सुरु झालेला एबी आणि सीडीचा याराना प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करेल हे मात्र नक्की. पण आमची ओळख नाही’ असे सीडीने म्हटल्यावर देखील चंदू मी आलोय’ अशी एबीची हाक प्रेक्षकांची सिनेमाप्रती उत्सुकता दुप्पट तिप्पट पध्दतीने वाढवणार याची खात्री वाटते.  
सायली संजीवअक्षय टंकसाळेसाक्षी सतिशसुबोध भावे, शर्वरी लोहोकरेनीना कुळकर्णीलोकेश गुप्तेसीमा देशमुखसागर तळाशीकर या कलाकारांच्या सुंदर अभिनयाने नटलेला हा सिनेमा येत्या १३ मार्चला प्रदर्शित होत आहे. ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सीडीच्या ७५ व्या वाढदिवसासाठी आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याला एबी’ ची उपस्थिती लाभते का हे प्रेक्षकांना १३ मार्चलाच कळेल.

Monday, 24 February 2020

आजोबांना आले अमिताभजींचे पत्र आणि ‘एबी आणि सीडी’चा टीझर पाहून वाढणार प्रेक्षकांची उत्सुकता

प्रत्येकाची कल्पनाशक्ती ही भन्नाट असते. एकदा कल्पना करुन पाहा ना, 'जर तुमच्या आजोबांचे वर्गमित्र हे अमिताभजी बच्चन असतील तर...तर कायसगळीकडे नुसता आनंदाचा गोंधळ उडेलकुटुंबातील सदस्यांचेमित्र परिवारांकडून सतत कुतूहलाचे प्रश्न उपस्थित होतील. तुमच्या मैत्रीचेशाळेतील किस्से सांगा’, ‘अमिताभजी शाळेत असताना कसे होते’, ‘कसे वागायचे’, ‘नेमके काय बोलायचे’ यांसारखे अनेक शंभर प्रश्न तुमच्या आजोंबाना विचारले जातील. असंच काहीसं घडलंय एबी आणि सीडी’ या सिनेमातील चंद्रकांत देशपांडे’ यांच्या बाबतीत.
आजी-आजोबा आणि नातवंड यांच्यामधील नातं हे फारच हलकंफुलकं असतं. आपल्या हक्काची आणि तितकीच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत समजून घेणा-या व्यक्ती म्हणजे आजी-आजोबा असं प्रत्येक नातवाला वाटत असतं आणि ते तितकंच खरंही असतं. जसजसं म्हातारपण येतं तसतसं घरातल्यांना म्हातारे व्यक्ती या अडचण वाटू लागतात किंवा त्यांच्याकडे फार लक्ष द्यावसं नाही वाटत आणि याचवेळी त्यांचा खंबीर आधार बनतात त्यांची नातवंड. अशीच विक्रम गोखलेअक्षय टंकसाळेसाक्षी सतिश यांची आजोबा-नातवंडांची जोडी एबी आणि सीडी’ मध्ये पाहायला मिळणार आहे.एबी आणि सीडीच्या पोस्टरनंतर आता या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे आणि आजोबांना अमिताभजींकडून आलेलं पत्रंतसेच त्यांच्याकडून सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आलेला होकारपण नंतर चंद्रकांत देशपांडे यांनी स्वत: आज अमिताभ बच्चन सोहळ्याला येणार नाही’ हे केलेले वक्तव्य आणि अमिताभजींच्या दमदार आवाजातील चंदू मी आलोय’ हा डायलॉग’....या सर्व गोष्टी प्रेक्षकांची सिनेमाप्रती उत्सुकता वाढवणार यात बिलकुल शंका नाही.
अमिताभजींनी गेली अनेक वर्षे सिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकाराच्या आणि सिनेरसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे आणि त्यामुळेच अमिताभ बच्चन’ म्हटलं की सर्वप्रथम कुतुहल वाटतं आणि जर अमिताभजी तुमच्या आजोबांचे वर्गमित्र असतील तर बातच निराळी होऊन जाते...
अक्षय विलास बर्दापूरकरप्लॅनेट मराठीगोल्डन रेशो फिल्म्स निर्मित आणि पीव्हीआर प्रदर्शित आणि मिलिंद लेले दिग्दर्शित एबी आणि सीडी’ मध्ये अमिताभजी बच्चनविक्रम गोखले यांच्यासह सुबोध भावेसायली संजीवअक्षय टंकसाळेसाक्षी सतिशशर्वरी लोहोकरेनीना कुळकर्णीलोकेश गुप्तेसीमा देशमुखसागर तळाशीकर यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.
आता खरंच उत्कंठा ताणली जातेय की 'येतील का बिग बी उर्फ एबी सोहळ्याला?
अमिताभ बच्चन आणि चंद्रकांत देशपांडे उर्फ एबी आणि सीडीचा याराना बघेल सारा जमाना१३ मार्चला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात.
Click the link: https://t.co/1QKBD0jaee