Showing posts with label ‘जंगजौहर’. Show all posts
Showing posts with label ‘जंगजौहर’. Show all posts

Saturday, 11 July 2020

‘जंगजौहर’ चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षक भेटीला

अतुलनीय शौर्याचा आणि अजोड स्वामीनिष्ठेचा पावनखिंडीतला थरार रुपेरी पडद्यावर
१३ जुलै १६६०
आषाढ शुद्ध पौर्णिमा
मराठेशाहीच्या इतिहासातील रक्तरंजित अध्याय याचदिवशी घोडखिंडीत लिहिला गेला.
अतुलनीय शौर्याचा आणि अजोड स्वामीनिष्ठेचा हा ठसठशीत वस्तूपाठ जगासमोर साकारला गेला.
बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या पराक्रमाचा हा थरार ‘जंगजौहर’ या मराठी चित्रपटाच्या रुपात लवकरच रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ अशा शिवचरित्रावर आधारीत यशस्वी चित्रपटांच्या मालिकेतील पुढचं सुवर्णपान युवा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आपल्यापुढे उलगडणार आहेत. अजय आणि अनिरुद्ध आरेकर यांच्या ‘आलमंड्स क्रिएशन्स’ने या भव्य चित्रपटाची निर्मिती केली आहे.
पावनखिंडीतल्या या रक्तरंजित संघर्षाला आता ३५० हून अधिक वर्षे उलटून गेलीत. हा शिवकाळ पुन्हा जिवंत करणं अतिशय आव्हानात्मक होतं. त्यासाठी आवश्यक भव्य सेट्स, अतिशय अवघड साहसदृश्ये आणि तांत्रिक कौशल्य यांची मोट बांधणं जिकीरीचं होतं. हे शिवधनुष्य   दिग्पाल लांजेकर आणि त्यांच्या टीमने नेहमीच्या अभ्यासू वृत्तीने आणि मेहनतीने उचलले आहे. आधीच्या सिनेमांच्या अद्भुत अनुभवामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
यात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर  यांच्यासह  सुमारे २१ कलाकारांची भली मोठी मांदियाळी दिसणार आहे. लहानपणापासून ऐकलेला पावनखिंडीतील दिव्य पराक्रमाचा इतिहास पडद्यावर अनुभवणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ‘जंगजौहर’ चित्रपटाचे चित्रीकरण संपवून लवकरच प्रदर्शनासाठी सज्ज होत आहे. त्याआधी १३ जुलैला, सोमवारी या चित्रपटाची पहिली झलक पोस्टर आणि टीझर रुपात आपल्याला पहायला मिळणार आहे.
Thekhind thriller with its incomparable courage and unparalleled loyalty to the king
First Teaser of ‘JUNGJAUHAR’ on Sliver Screen 
13th July 1660,
Ashad Shudh Pournima 
On this day, the blood soaked chapter of Maratha history was written at Pavankhind.
An event of incomparable courage and unparalleled loyalty to the king was written.
The bravery of Baji Prabhu Deshpande and the army of Bandal comes to the screen as the thriller ‘JungJauhar’. After the grand success of ‘Farzand’ and ‘Fatteshikast’, the movies based on the life of Chhatrapati Shivaji Maharaj , the next film in the series is being presented by the young writer-director Digpal Lanjekar. ‘Almonds Creations’ of Ajay and Anirudh Arekar, has produced this film.
More than 350 years have passed since the bloody battle of Pavankhind. To once again enact this episode of Chhatrapati Shivaji’s time, was extremely challenging. To co-ordinate the necessary grand sets, extremely difficult stunt scenes and the technical expertise, was a very daunting task. with the same attitude and effort This extraordinary challenge was successfully executed by Digpal Lanjekar and his team. Because of the amazing experience of earlier films, expectation among the cinegoers is very high.
Along with Mrinal Kulkarni and Chinmay Mandlekar there are another 21 actors who will grace the screen. Since childhood we have been hearing about the astounding battle of Pavankhind, The expectation of watching the battle on the screen is mind blowing. Very soon the shooting of the film will be completed and it will be ready for release. Before that, on Monday 13th of July the first presentation, in the form of a poster and a teaser, of ‘JungJauhar’.  will be Released all over.

Wednesday, 11 December 2019

‘जंगजौहर’ उलगडणार अतुलनीय पराक्रमाची यशोगाथा बाजीप्रभू देशपांडेच्या अमर बलिदानाची गाथा रुपेरी पडद्यावर

मराठेशाहीच्या इतिहासातील प्रत्येक पान अनेक शूर योद्ध्यांच्या पराक्रमाने सजलेलं आहे. हा सगळा इतिहास केवळ पुस्तकरूपात न राहता पुढच्या पिढीपर्यंत पोहचविणे हे आपले कर्तव्य आहे. ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटाच्या माध्यमातून हा ऐतिहासिक ठेवा यशस्वीपणे पोहचविल्यांतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर ‘जंगजौहर’ या मराठी चित्रपटातून आणखी एका अजोड पराक्रमाची गाथा जून २०२० मध्ये मराठी रुपेरी पडद्यावर साकारणार आहेत.
बाजीप्रभू देशपांडे हे शब्द म्हणजे निस्पृह स्वामीनिष्ठा आणि अजोड पराक्रमाचे प्रतिक..! पन्हाळगडाला सिद्दी जोहरने वेढा दिला, तेव्हा छत्रपती शिवाजीराजे यांनी मोठ्या शिताफीने स्वत:ची सुटका करुन घेऊन विशालगडाकडे कूच केली. पाठलागावर असलेल्या विजापूरी सैन्याचा धोका लक्षात घेत बाजींनी महाराजांना पुढे जाण्यास सांगितले. बाजी व फुलाजी हे दोन्ही बंधू बांदल सेनेसह घोडखिंडीत सिद्धीच्या सैन्याविरोधात महाकाळ म्हणून उभे ठाकले. हजारोच्या सैन्याचा मुकाबला करताना बाजी आणि ३०० बांदल सेनेच्या वीरांनी पराक्रमाची शिकस्त करत महाराज विशालगडावर पोहचेपर्यंत घोडखिंड प्राणप्रणाने लढवली. अविस्मरणीय पराक्रमाचा हा अध्याय ‘जंगजौहर’ या ऐतिहासिकपटातून लवकरच रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. छत्रपतींना वाचवताना बांदल सेना व बाजीप्रभू पन्हाळगडाच्या थरारात धारातीर्थ झाले आणि घोडखिंडीतला हा लढा बाजीप्रभू यांच्या स्वराज्यनिष्ठेच्या पवित्र रक्ताने ‘पावन’ झाला.
अनेक ऐतिहासिक मूळ कागदपत्रे व ऐतिहासिक ग्रंथाच्या संशोधनातून हा चित्रपट साकारला जाणार आहे. या चित्रपटाच्या संशोधनासाठी वेगवेगळ्या तत्कालीन घराण्यांच्या वंशजाकडून अधिकृत कागदपत्रांची मदत झाली आहे. ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटाच्या प्रारंभी ‘जंगजौहर’ ची पहिली झलक दिसल्यापासूनच या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आता ‘आलमंड्स क्रिएशन्स’चे अजय-अनिरुद्ध आरेकर यांनी ‘जंगजौहर’ चित्रपटाच्या निर्मितीची अधिकृत घोषणा केली आहे.
बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या अतुलनीय पराक्रमाची ‘जंगजौहर’ मधून उलगडणारी बलिदानगाथा प्रत्येकासाठी स्फूर्तीदायक असेल.