Showing posts with label ‘मन उधाण वारा’. Show all posts
Showing posts with label ‘मन उधाण वारा’. Show all posts

Friday, 27 September 2019

‘मन उधाण वारा’ लवकरच भेटीला

जगण्याच्या रोजच्या संघर्षाशी, त्यांच्या जाणिवांशी साधर्म्य असलेल्या वेगळ्या वळणाच्या विचारांच्या चित्रपटांची निर्मीती मराठीत सातत्याने होत आहे. याच पठडीतला मन उधाण वारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा शानदार ट्रेलर व संगीत अनावरण सोहळा नुकताच संपन्न झाला. द सतीश कौशिक एंटरटेनमेंट प्रोडक्शन्स’ आणि लोका एंटरटेनमेंट’ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पेन मुव्हीज्चे जयंतीलाल गडा यांच्या प्रस्तुतीखाली मन उधाण वारा हा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
मराठी चित्रपटांनी नेहमीच पठडीबाहेरच्या विषयांना हात घालतमराठी चित्रपटांना एका वेगळ्या उंचीवर पोहोचवलं आहे. मन उधाण वारा या चित्रपटातूनही वेगळा विचार सांगण्याचा प्रयत्न आम्ही केला असल्याचे निर्माते सतीश कौशिक यांनी यावेळी सांगितले. वाट्यास आलेले आयुष्य जगताना सकारात्मक जगण्याचा प्रयत्न केला, तर त्यातला खरा आनंद आपल्याला घेता येऊ शकतो, हे मन उधाण वारा या चित्रपटातून अधोरेखित करण्यात आलं आहे. एका उत्तम चित्रपटाचा भाग होता आल्याचा आनंद कलाकारांनी व्यक्त केला.
वेगवेगळ्या पठडीतील चार गाणी या चित्रपटात आहेत. अजय गोगावले, आदर्श शिंदे, सोनू निगम, हर्षवर्धन वावरे, कस्तुरी वावरे, सतीश चक्रव्रती, अनिशा सायिका या गायकांनी ही गीते स्वरबद्ध केली असून अमितराज, हर्ष,करण, आदित्य (त्रीनिती ब्रोस) सतीश चक्रव्रती या संगीतकारांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे.
निशांत कौशिकअक्षय गडाधवल गडा चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा प्रदीप कुरबा यांची असून पटकथा-संवाद सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी लिहिले आहेत. छायांकन मिलिंद जोग तर संकलन कृष्णत घार्गे यांचे आहे.
११ ऑक्टोबरला मन उधाण वारा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Monday, 23 September 2019

‘मन उधाण वारा’ चित्रपटात दिसणार नवी जोडी

चित्रपटातल्या नव्या जोड्यांची चर्चा नेहमी होत असते. एखादी नवी जोडी येणार असेल तर प्रेक्षकही त्या जोडीची उत्सुकतेने वाट पाहतात. मोनल गज्जरऋत्विज वैद्य ही अशीच एक नवी जोडी मन उधाण वारा या चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. येत्या ११ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. द सतीश कौशिक एंटरटेनमेंट प्रोडक्शन्स’ आणि लोका एंटरटेनमेंट’ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पेन मुव्हीज्चे जयंतीलाल गडा यांची प्रस्तुती असलेला हा चित्रपट सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे यांनी दिग्दर्शित केला आहे.
गुजराती कौटुंबिक पार्श्वभूमी असललेली मोनल ब मध्यप्रदेशातल्या भोपाळ मध्ये शिकलेला ऋत्विज यांचा मराठीशी तसा फारशा संबध नसल्याने मन उधाण वारा हा चित्रपट त्यांच्यासाठी एक आव्हान होते. मोनलने याआधी गुजराती, तामिळतेलगू अशा बऱ्याच भाषांमध्ये काम केलं आहे. तर ऋत्विजने अनेक हिंदी लघुपटांचे दिग्दर्शन व त्या लघुपटांमध्ये अभिनयसुद्धा केला आहे. या दोघांचे काम पाहिल्यानंतर निर्माते सतीश कौशिक यांनी या दोघांची निवड चित्रपटासाठी केली.
आपल्या या अनुभवाबद्दल बोलताना मोनल व रित्विज सांगतात की ‘आम्ही नेहमीच आशयसंपन्न भूमिकांना प्राधान्य दिलं असल्याने सतीशसरांनी आम्हाला या भूमिकेबद्दल विचारल्यानंतर आमच्यासाठी ही निश्चितच आनंदाची बाब होती. नात्यातील हळूवार क्षणांना रेखाटणारा हा चित्रपट असून फ्रेश जोडी ही या चित्रपटाची गरज होती. त्यानुसार या चित्रपटासाठी आमची निवड झाली. आमच्या केमिस्ट्री बाबत विचाराल तर दोघंही एकमेकांना तसे नवखे असलो तरी या कला माध्यम आमच्यासाठी नवे नाही. त्यामुळे एकत्र काम करताना मजा आली. दिग्दर्शक संजय मेमाणे यांनी खूप छान पद्धतीने आम्हाला आमच्या भूमिका समजावून सांगितल्याने एकमेकांच्या कृतीला मिळणाऱ्या प्रतिक्रियांचा सूर उत्तम जुळला होता. प्रेक्षकांनाही चित्रपटात आमचा हा जुळलेला सूर नक्कीच दिसेल. तसेच अनुभवी कलाकारांबरोबर काम करताना आम्हाला खूप काही शिकायला मिळालं.
मोनल गज्जरऋत्विज वैद्य या नव्या जोडीसह या चित्रपटात किशोर कदमउत्तरा बावकरसागर कारंडेशर्वरी लोहकरेडॉ.शरद भुताडियाविनोद कुलकर्णीभारती पाटीलवैभव राजाध्यक्षसाक्षी गांधीज्युलिया मोनेअनुराधा अटलेकर या कलाकारांच्या भूमिका आहेत. निशांत कौशिक, अक्षय गडाधवल गडा चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा प्रदीप कुरबा यांची असून पटकथा-संवाद सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी लिहिले आहेत. छायांकन मिलिंद जोग तर संकलन कृष्णत घार्गे यांचे आहे.
११ ऑक्टोबरला मन उधाण वारा हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल.

Monday, 26 August 2019

‘मन उधाण वारा’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेता व दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या द सतीश कौशिक एंटरटेनमेंट प्रोडक्शन्स’ या बॅनरखाली येऊ घातलेल्या ‘मन उधाण वारा’ या मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले. या चित्रपटाच्या निमित्ताने सतीश कौशिक मराठी चित्रपटसृष्टीत निर्माते म्हणून पदार्पण करतायेत. ‘द सतीश कौशिक एंटरटेनमेंट प्रोडक्शन्स’ आणि लोका एंटरटेनमेंट’ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पेन मुव्हीज्चे जयंतीलाल गडा यांच्या प्रस्तुतीखाली मन उधाण वारा हा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
मोनल गज्जररित्विज वैद्य या नव्या जोडीसह किशोर कदमउत्तरा बावकरसागर कारंडेशर्वरी लोहकरेडॉ.शरद भुताडियाविनोद कुलकर्णीभारती पाटीलवैभव राजाध्यक्षसाक्षी गांधीज्युलिया मोनेअनुराधा अटलेकर या कलाकारांच्या ‘मन उधाण वारा’ या चित्रपटात भूमिका आहेत. निशांत कौशिक,अक्षय गडाधवल गडा चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा प्रदीप कुरबा यांची असून पटकथा-संवाद सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी लिहिले आहेत. छायांकन मिलिंद जोग तर संकलन कृष्णत घार्गे यांचे आहे.
‘आयुष्यावर प्रेम करा ते तुम्हाला भरभरुन देतच असतं. अनुभवातून बऱ्याच गोष्टींकडे आपण वेगळ्या दृष्टीने आणि वेगळ्या प्रकारे जाणीवांच्या पलिकडे पाहू शकतो’, हे प्रेमकथेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न ‘मन उधाण वारा’ या चित्रपटातून केला असल्याचे दिग्दर्शक संजय मेमाणे सांगतात.
आशयाच्या बाबतीत मराठी चित्रपट कायमच समृद्ध राहिला आहे. या समृद्धतेमुळे अनेक चांगले विषय मराठीत पहायला मिळतात एक वेगळा दृष्टीकोन देणारा ‘मन उधाण वारा’ चित्रपट प्रत्येकाला नक्कीच भावेल असा विश्वास सतीश कौशिक यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

Wednesday, 21 August 2019

सतीश कौशिक मराठी चित्रपट निर्मितीत ‘मन उधाण वारा’ ११ ऑकटोबरला प्रदर्शित होणार - Satish Kaushik in Marathi Film Production MAN UDHAAN VARA Releasing on 11thOctober

ज्येष्ठ अभिनेता व दिग्दर्शक सतीश कौशिक हे हिंदी चित्रपटसृष्टीतलं नावाजलेलं नाव. आजवर आपल्या वैविध्यपूर्ण भूमिका आणि चतुरस्त्र दिग्दर्शनातून त्यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. रंगमंच, छोटा पडदा आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजविल्यानंतर सतीश कौशिक आता मराठी चित्रपटसृष्टीत निर्माते म्हणून पदार्पण करतायेत. मन उधाण वारा’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे. द सतीश कौशिक एंटरटेनमेंट प्रोडक्शन्स’ आणिलोका एंटरटेनमेंट’ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पेन मुव्हीज्चे जयंतीलाल गडा यांच्या प्रस्तुतीखाली मन उधाण वाराहा चित्रपट येत्या११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
कोकणच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर अतिशय तरल आणि सुंदर प्रेमकथा या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहे. या चित्रपट निर्मितीबद्दल बोलताना सतीश कौशिक सांगतात की संहिता व आशय या दोन गोष्टी मराठी चित्रपटाच्या बलस्थान राहिल्या आहेत. एक वेगळा दृष्टीकोन देणाऱ्या या मराठी चित्रपटाची निर्मिती आपण करावी असं मला वाटलं त्यातूनच मन उधाण वारा’ ही हळवी प्रेमकथा मराठी रसिकांसाठी आणली आहे. ही प्रेमकथा असली तरी आयुष्याचे वेगवेगळे पदर यातून अनुभवायला मिळणार आहेत. 
निशांत कौशिकअक्षय गडाधवल गडा चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा प्रदीप कुरबा यांची असून पटकथा-संवाद सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी लिहिले आहेत. छायांकन मिलिंद जोग तर संकलन कृष्णत घार्गे यांचे आहे. किशोर कदमउत्तरा बावकरसागर कारंडेशर्वरी लोहकरेमोनल गज्जररित्विज वैद्यडॉ.शरद भुताडियाविनोद कुलकर्णीभारती पाटीलवैभव राजाध्यक्षसाक्षी गांधीज्युलिया मोनेअनुराधा अटलेकर या कलाकारांच्या यात भूमिका आहेत.
Actor-Director Satish Kaushik is a renowned name in entertainment world. He has proved his uniqueness with his varied roles and fabulous direction skills. After having been tremendously successful in Theatre, Television and Hindi Films, Satish Kaushik makes his debut as a producer in Marathi film industry. He has taken the lead in producing the film ‘Man Udhaan Vara’. Renowned cinematographer Sanjay Memane has taken charge of the direction of the film. Produced by ‘SatishKaushik Entertainment Productions’ and ‘Loka Entertainment’ and presented by Pen Movies Jayantilal Gada, the movie ‘Man Udhaan Vara’ is releasing on 11th October.
With a very fluid and beautiful story, the movie is produced with the enchanting landscape of Konkan as the backdrop. The all-encompassing nature and intent have always been the strength of Marathi films. Satish Kaushik said that ‘he felt he should produce a film which had a very different viewpoint’; hence he produced ‘Man Udhaan Vara’, a soft and emotional film. He also said that even though it is a love story, we will experience a different aspect of life.
NishantKaushik, AkshayGada and Dhaval Gada are the producers of the film. The story is by Pradeep Kurba, the screenplay and dialogues are written by Sumitra Bhave and Sunil Sukhtankar. Cinematography is by Milind Jog and editing by Krishnath Gharge. Kishor Kadam, Uttara Bavkar, SagarKarande, Sharvari Lohkare, Monal Gajjar, RitwijVaidya, Dr.Sharad Bhutadia, Vinod Kulkarni, Bharati Patil, Vaibhav Rajadhyaksha, Sakshi Gandhi, Julia Mone and Anuradha Atlekar are the various actors who have enacted the different roles in the film.
‘Man UdhaanVara’ is Releasing on 11th Oct. all over.