Showing posts with label ‘सूर नवा ध्यास नवा’. Show all posts
Showing posts with label ‘सूर नवा ध्यास नवा’. Show all posts

Friday, 22 November 2019

‘सूर नवा ध्यास नवा’ मध्ये महेश काळे आणि राहुल देशपांडे पहिल्यांदाच एकत्र ! दोघांच्या गायिकीचा खास नजराणा या आठवड्यामध्ये...

मुंबई २२ नोव्हेंबर, २०१९ : सूर नवा ध्यास नवाच्या मंचावर प्रेक्षकांना अनेकदा महेश काळे यांनी सादर केलेल्या गाण्याचा नजराणा मिळाला आहे... त्यांच्या गायिकेने आपल्याला अनेकदा सुखद अनुभव दिला आहे.. पण येत्या आठवड्यामध्ये मात्र सूर नवा ध्यास नवाच्या मंचावर रंगणार आहे शास्त्रीय सुरांची खास जुगलबंदी...कट्यार काळजात घुसली या चित्रपटानंतर शास्त्रीय संगितातील दोन हीर्‍यांची अजून लखलखीत ओळख महाराष्ट्राला झाली... हे दोन गायक म्हणजे महेश काळे आणि राहुल देशपांडे. आजोबा वसंतराव देशपांडे यांच्या शास्त्रीय संगीताचा वारसा राहुल देशपांडे गेले अनेक वर्ष समर्थपणे पुढे नेत आहेत. आपल्या गायकीमधील नवनवीन गोष्टी तो प्रेक्षकांसमोर सादर करत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात वा भारतातच  नव्हे तर विदेशातसुध्दा आपल्या शास्त्रीय कलेचे प्रयोग सादर करून महेश काळे जगभारतील रसिक प्रेक्षकांची माने जिंकत आहेत. या दोघांनी कट्यार काळजात घुसली या चित्रपटानंतर तरुण पिढीला शास्त्रीय संगितकडे खेचून आणण्याची किमया करून दाखविली आहे... आणि आता हे दोन दिग्गज प्रथमच सूर नवा ध्यास नवाच्या मंचावर एकत्र दिसणार आहेत... कार्यक्रमात त्यांची जुगलबंदी रंगणार आहे, गप्पा रंगणार आहेत, ते काही अनुभव, अनेक अविस्मरणीय आठवणी प्रेक्षकांना  सांगणार आहेत. तेंव्हा नक्की बघा येत्या आठवड्यातील ही सुरेल मैफल सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमामध्ये सोम ते बुध रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर. 
महेश काळे आणि राहुल देशपांडे यांची सूरेल जुगलबंदी
महेश काळे आणि राहुल देशपांडे पहिल्यांदाच मंचावर एकत्र येणार आणि गाणी सादर होणार नाही असे अशक्यच... महेश काळे आणि राहुल यांची जुगलबंदी  सुरू होताच सगळे उपस्थित मंत्रमुग्ध झाले. सुरत पिया की यावर त्यांनी जुगलबंदी सादर करून सगळ्यांची मने जिंकली... महेश काळे आणि राहुल देशपांडे यांना एकत्र एकाच मंचावर प्रेक्षकांना ऐकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमामध्ये. राहुल देशपांडे यांनी सुर से सजी हे गाणे देखील सादर करून कार्यक्रमात वेगळे रंग भरले...
आपल्या नेहमीच्या शैलीपेक्षा वेगळी शैली निवडून आणि ती तेवढ्याच उत्तम पद्धतीने सादर करून स्पर्धकांनी आपल्या कॅप्टनसना आणि राहुल देशपांडे यांची मनं जिंकले. याशिवाय या आठवड्यात मानाची सुवर्ण कट्यार कुणाला मिळणार हे बघणंही उत्सुकतेचं ठरेल.

Thursday, 22 August 2019

‘सूर नवा ध्यास नवा’ चे तिसरे पर्व कलर्स मराठीवर!


२४ ऑगस्ट रोजी पुणे येथे रंगणार ऑडिशन्सची तिसरी फेरी
  A person holding a sign

Description automatically generated
मुंबई २० ऑगस्ट, २०१९ : कलर्स मराठीवर गाण्याची मैफल पुन्हा सजणार, सुरांशी पुन्हा मैत्री होणार, वाद्य आणि सूरांची पुन्हा गट्टी जमणार कारण आपला आवडता कार्यक्रम सूर नवा ध्यास नवा लवकरच सुरू होणार आहे... कार्यक्रमाच्या प्रत्येक पर्वामध्ये गायकांनी विविध शैलींमधील सादर केलेली गाणी अजूनही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आणि म्हणूनच सूर नवा ध्यास नवाच्या दोन पर्वांच्या अभूतपूर्व यशानंतर कलर्स मराठी पुन्हा घेऊन येत आहे सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमाचे तिसरे पर्व. या पर्वाचे विशेष म्हणजे स्पर्धकांना वयाची अट नसेल. ५ ते ५५ हा वयोगट असणार आहे म्हणेजच बच्चेकपंनी पासून सगळ्या वयोगटातील प्रेक्षक या कार्यक्रमामध्ये भाग घेऊ शकतील. यावर्षी देखील उत्तमातून उत्तम सूर शोधण्याचा ध्यास असणार आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन एक नवा सूर शोधण्याचा प्रवास २१ ऑगस्टपासून  सुरु होणार आहे. तुम्ही लवकरात लवकर सुरांशी दोस्ती आणि रियाझ करायला सुरुवात करा कारण तुमचे सुरेल गाणं ऐकायला सगळेच आतुर आहेत... या पर्वाचा शुभारंभ सप्टेंबरमध्ये होणार आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातील आपल्या सगळ्यांचा लाडका स्पर्धक पुष्कर जोग प्रत्येक शहरात सुरवीरांना प्रोत्साहन तर सुप्रसिध्द संगीत संयोजक मिथिलेश पाटणकर आणि संगीत दिग्दर्शक मिलिंद जोशी प्रत्येक शहरातुन सुरवीरांचा शोध घेतील.
सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाच्या पुण्यामधील ऑडिशन्स २४ ऑगस्ट रोजी पार पडणार आहेत. स्थळ - डी. ई. एस. सेकंडरी स्कूल, १४/अलाल बहादूर शास्त्री रोडसदाशिव पेठपुणे – ४११०३०. वेळ – सकाळी ९ ते संध्या. ४ या शहरांमधून जे स्पर्धक निवडले जातील त्यांना अंतिम फेरीसाठी मुंबईमध्ये यावे लागेल.
इतर शहरांतील स्थळ आणि तारीख :
२५ ऑगस्ट रविवार (ठाणे) - जोशी बेडेकर कॉलेज (ठाणा कॉलेज)
चेंदनी बंदर रोडजांभळी नाकाठाणे (पश्चिम) - ४००६०१
२८ ऑगस्ट बुधवार (नागपूर) - अंचाबाई धर्मशाळा,
श्री महावीर हनुमान मंदिर कमिटीभक्तीधामआझाद चौकसदरनागपूर - ४४०००१
३१ ऑगस्ट शनिवार (मुंबई) -  साने गुरुजी विद्यालय
भिकोबा पाठारे मार्गदादर (पश्चिम)मुंबई - ४०० ०२८
५ सप्टेंबर गुरूवार (रत्नागिरी) -  गोगटे जोगळेकर महाविद्यालय,
कोर्ट रोडरत्नागिरी
अधिक माहितीसाठी लॉग इन करा http://www.colorsmarathi.com/shows/Sur_Nava_Dhyas_Nava_Little_Champs/  किंवा भेट द्या कलर्स मराठीच्या अधिकृत फेसबुक पेजला.

Sunday, 18 August 2019

‘सूर नवा ध्यास नवा’ चे तिसरे पर्व कलर्स मराठीवर!


२१ ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथे रंगणार ऑडिशन्सची पहिली फेरी
मुंबई २० ऑगस्ट, २०१९ : कलर्स मराठीवर गाण्याची मैफल पुन्हा सजणार, सुरांशी पुन्हा मैत्री होणार, वाद्य आणि सूरांची पुन्हा गट्टी जमणार कारण आपला आवडता कार्यक्रम सूर नवा ध्यास नवा लवकरच सुरू होणार आहे... कार्यक्रमाच्या प्रत्येक पर्वामध्ये गायकांनी विविध शैलींमधील सादर केलेली गाणी अजूनही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आणि म्हणूनच सूर नवा ध्यास नवाच्या दोन पर्वांच्या अभूतपूर्व यशानंतर कलर्स मराठी पुन्हा घेऊन येत आहे सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमाचे तिसरे पर्व. या पर्वाचे विशेष म्हणजे स्पर्धकांना वयाची अट नसेल. ५ ते ५५ हा वयोगट असणार आहे म्हणेजच बच्चेकपंनी पासून सगळ्या वयोगटातील प्रेक्षक या कार्यक्रमामध्ये भाग घेऊ शकतील. यावर्षी देखील उत्तमातून उत्तम सूर शोधण्याचा ध्यास असणार आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन एक नवा सूर शोधण्याचा प्रवास २१ ऑगस्टपासून  सुरु होणार आहे. तुम्ही लवकरात लवकर सुरांशी दोस्ती आणि रियाझ करायला सुरुवात करा कारण तुमचे सुरेल गाणं ऐकायला सगळेच आतुर आहेत... या पर्वाचा शुभारंभ सप्टेंबरमध्ये होणार आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातील आपल्या सगळ्यांचा लाडका स्पर्धक पुष्कर जोग प्रत्येक शहरात सुरवीरांना प्रोत्साहन देईल तर सुप्रसिध्द संगीत संयोजक मिथिलेश पाटणकर आणि संगीत दिग्दर्शक मिलिंद जोशी प्रत्येक शहरातुन सुरवीरांचा शोध घेतील.
सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाच्या औरंगाबादमधील ऑडिशन्स २१ ऑगस्ट रोजी पार पडणार आहेत. स्थळ - एम. जी. एम. फिल्म आर्टस्, एम. जी. एम. कॉलेज ऑफ जर्नालिझम, एम. जी. एम. कॅम्पसएन./६सिडकोऔरंगाबाद. वेळ – सकाळी ९ ते संध्या. ४ . या शहरांमधून जे स्पर्धक निवडले जातील त्यांना अंतिम फेरीसाठी मुंबईमध्ये यावे लागेल.
इतर शहरांतील स्थळ आणि तारीख :
२२ ऑगस्ट गुरूवार (नाशिक) - रुद्रा द प्रॅक्टिकल स्कूल
उपेंद्र नगर बस स्टॉपत्रिमूर्ती चौकपाथर्डीफाटा लिंक रोडनाशिक  - ४२२०१०
२४ ऑगस्ट शनिवार (पुणे) - डी. ई. एस. सेकंडरी स्कूल
१४/अलाल बहादूर शास्त्री रोडसदाशिव पेठपुणे - ४११०३०
२५ ऑगस्ट रविवार (ठाणे) - जोशी बेडेकर कॉलेज (ठाणा कॉलेज)
चेंदनी बंदर रोडजांभळी नाकाठाणे (पश्चिम) - ४००६०१
२८ ऑगस्ट बुधवार (नागपूर) - अंचाबाई धर्मशाळा,
श्री महावीर हनुमान मंदिर कमिटीभक्तीधामआझाद चौकसदरनागपूर - ४४०००१
३१ ऑगस्ट शनिवार (मुंबई) -  साने गुरुजी विद्यालय
भिकोबा पाठारे मार्गदादर (पश्चिम)मुंबई - ४०० ०२८
५ सप्टेंबर गुरूवार (रत्नागिरी) -  गोगटे जोगळेकर महाविद्यालय,
कोर्ट रोडरत्नागिरी
अधिक माहितीसाठी लॉग इन करा http://www.colorsmarathi.com/shows/Sur_Nava_Dhyas_Nava_Little_Champs/  किंवा भेट द्या कलर्स मराठीच्या अधिकृत फेसबुक पेजला.