Showing posts with label ‘स्वामीधाम कलाश्रय’. Show all posts
Showing posts with label ‘स्वामीधाम कलाश्रय’. Show all posts

Tuesday, 9 April 2019

‘स्वामीधाम कलाश्रय’ ची घोषणा सहकार्यासाठी अभिनेत्री विशाखा सुभेदारचे कलाकार व रसिकांना आवाहन

कलाकार आपल्या आविष्कारातून प्रेक्षकांना आनंद देत असतो. हाच आनंद कलाकारांना त्यांच्या उतारवयात मिळावा यासाठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी एक पाऊल पुढे टाकत स्वामीधाम कलाश्रयची संकल्पना मांडत ती प्रत्यक्षात उतरवली. नववर्षाच्या शुभमुहूर्तावर स्वामीधाम कलाश्रय या वृद्धाश्रमाची मुहूर्तमेढ मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतीच रोवण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात श्रीफळ वाढवून व मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली.स्वामीधाम कलाश्रय संस्थेचे सर्वेसर्वा श्री.चिंतामणी रहातेकर काका यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. लेखक-दिग्दर्शक सचिन गोस्वामीसचिन मोटे,अभिनेते पंढरीनाथ कांबळेसुशील इनामदारनिरंजन कुलकर्णी तसेच या संस्थेच्या कामासाठी विशाखा सुभेदार यांच्या पाठीशी असणारे महेश सुभेदार,जगदीश हडपनिलेश आंबेकर आदि असंख्य मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. 
याप्रसंगी बोलताना अभिनेत्री विशाखा सुभेदार म्हणाल्या की‘अभिनय आणि सामजिक कार्य यांची सांगड घालत समाजासाठी विशेषतः कलाकारांसाठी भरीव काहीतरी करण्याचं खूप दिवसांपासून मनात होतं. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने स्वामीधाम कलाश्रय ची कल्पना सुचली आणि स्वामींच्याच इच्छेने चिंतामणी रहातेकर काका यांचा सहकार्याचा हात व अनेक मान्यवरांच्या आशीर्वादाचे पाठबळ मिळाले. आता मी हाती घेतलेल्या या कामासाठी प्रत्यक्ष मदतीचा हात देणारीया कलाश्रयसाठी झटणाऱ्या कलाकार मंडळीं व जनसामान्यांची साथ मला हवी आहे. सामाजिक कर्तव्यभावनेतून या उपक्रमाला अधिकाधिक आर्थिक पाठबळ देण्याचे आवाहन विशाखा यांनी याप्रसंगी केले.
श्री अक्कलकोट स्वामी सेवा मंडळअंबरनाथ संचालित स्वामीधाम मोग्रजआनंदवाडीकर्जत येथे या स्वामीधाम कलाश्रय वृद्धाश्रमासाठी जागा मिळाली आहे. या मान्यताप्राप्त संस्थेच्या अन्नछत्राचे उद्घाटन झाले असून भविष्यात स्वामीधाम कलाश्रय या नावाला साजेसे नाट्य कार्यशाळा,  वाचनालयबागकाम,स्विमिंग पूलपरफॉर्मिंग हॉल, विविध खेळविरंगुळा असे अनेक उपक्रम राबवण्याचा मानस आहे. त्यासाठीच कलाकारांच्या व रसिकांच्या सहकार्याची गरज आहे. या उपक्रमासाठी आवश्यक त्या कायदेशीरबाबींची पूर्तता सुरु असून vish22377@gmail.com या ईमेलआयडीवर संपर्क साधून या उपक्रमाला आर्थिक पाठबळ व नियोजनाच्या काही सूचना असल्यास त्या कळविण्याची विनंती विशाखा सुभेदार यांनी कलाकार व रसिकांना केली आहे.

Wednesday, 3 April 2019

‘स्वामीधाम कलाश्रय’ साठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा पुढाकार


वयोवृद्ध कलाकारांसाठी वृद्धाश्रम उभारणार 
कला आणि सामाजिकता यांना वेगळं करता येत नाही. कलावंत हा कलाकेंद्री असलाच पाहिजे पण त्याला सामाजिक भानही असायलाच हवे. काही जगावेगळे काम करीत आहोत असा आव न आणतासमाजाचं आपण काही देणं लागतो या जाणिवेतून अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी एका सामाजिक उपक्रमाची जबाबदारी घेत ५० वर्षांपुढील कलाकारांसाठी ‘ ‘स्वामीधाम कलाश्रयच्या निर्मितीचा ध्यास घेतला आहे.
आपल्या या ध्यासाबद्दल बोलताना त्या सांगतात कीअनेक वयोवृध्द कलाकार वाईट अवस्थेत दिसले. आपण बऱ्याचदा कामामधे व्यस्त असल्याने नातेवाईकांशी संबंध ठेवले जात नाहीतकुंटुंबातील केवळ पोरंबाळं, बायको वगळता तसा जवळचा संबंध कोणाशी ठेवला जात नाही..शुटिंग युनिट आपलं कुटुंब होतं..! एकदा वय व्हायला लागलं की आधारा ला पटकन कोणी भं रहात नाही..तर आपणच आपला आधार व्हावं असं मनात आल.. अनेक वृद्धाश्रम असूनही कलाकारांसाठी वृध्दाश्रम असावं असं वाटलं आणि त्यातूनच ‘स्वामीधाम कलाश्रय’ ची कल्पना सुचली. आमच्या या कल्पनेला मूर्त रूप देण्यासाठीश्री.चिंतामणी रहातेकर (काका) यांनी मदतीचा हात पुढे केला. श्री. अक्कलकोट स्वामी सेवा मंडळ, अंबरनाथ संचालित स्वामीधाम मोग्रज, आनंदवाडी, कर्जतयेथे कलाकार वृद्धाश्रमासाठी दीड एकर जागा दिलेली आहे. विशेष म्हणजे या संस्थेचे सर्वेसर्वा चिंतामणी रहातेकर यांचा त्याच ठिकाणी स्वत:चा वृद्धाश्रम असूनही केवळ कलेच्या प्रेमापोटी व कलाकारांनाही स्वत:च असं वास्तव्य असावं या आगळ्या कल्पनेकरिता त्यांनी हा मदतीचा हात पुढे केला आहे.‘स्वामीधाम कलाश्रय’ साठी चिंतामणी रहातेकर यांचा भक्कम पाठिंबा मिळाल्यामुळेच हे पाऊल उचलू शकल्याचे विशाखा सुभेदार सांगतात.
श्री. स्वामी समर्थांच्या कृपेने ६ एप्रिलला याच ठिकाणी अन्नछत्राचे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. त्याचवेळी ‘स्वामीधाम कलाश्रयवृद्धाश्रमाचा श्रीगणेशा होणार आहे. हा  केवळ वृद्धाश्रम नाही तर ‘स्वामीधाम कलाश्रय’ या नावाला साजेसे अनेक उपक्रम या ठिकाणी राबवण्याचा मानस असून त्यात नाट्य वर्कशॉप्सपरफॉर्मिंग हॉलवाचनालयबागकाम,स्विमिंग पूलखेळविरंगुळा अशा अनेक गोष्टींचा समावेश असणार आहे.