रेड बल्ब म्युझिकचं तिसरं गाणं देखील आहे खास! नक्की पाहा ‘येशील ना’ हे रोमँटिक अनप्ल्गड गाणं
OR
प्रिय व्यक्तीच्या भेटीची ओढ वाढणार... ‘येशील ना’ रोमँटिक अनप्ल्गड गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भेटीची ओढ तुम्हांलाही कधी ना कधी लागली असेलच ना ? त्यांनी दिलेली वचनं, त्यांच्या आठवणी सतत स्मरत असतील... त्यांना डोळे भरुन पाहण्यासाठी मन आसुसले असेल... त्यांचा स्पर्श हवाहवासा वाटत असेल... प्रेमाने मारलेली हाक ऐकण्यासाठी कान आतुर झाले असतील... प्रेम म्हटलं की या सर्व भावना आपसूकपणे आल्याच. या भावना व्यक्त करण्यासाठीच रेड बल्ब म्युझिक ‘येशील ना’ हे रोमँटिक अनप्ल्गड गाणं नुकतंच आपल्यासाठी घेऊन आले आहेत.
हे रोमँटिक गाणं अभिनेत्री पल्लवी पाटीलवर चित्रित करण्यात आलं आहे. या गाण्यात टिपलेली पल्लवीची अदा , तिच्या चेह-यावरील भाव, तिचे सौंदर्य तिच्या चाहत्यांना पुन्हा एकदा नव्याने तिच्या प्रेमात पाडतील असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गाण्यातील सूर आणि त्या सोबतचे शब्द आणि पल्लवीच्या चेह-यावरील अचूक भाव; हे पाहून असं वाटतं की हे गाणं जणू केवळ तिच्यासाठीच बनलं आहे.
ज्याप्रमाणे ‘येशील ना’ या रोमँटिक अनप्ल्गड गाण्याचे बोल आणि गीत थेट मनाला भिडतात त्याचप्रमाणे या गाण्याचे व्हिज्युअल्स देखील मनावर एक वेगळीच जादू करुन जातात. गाण्यातील एकूण एक फ्रेम अतिशय बोलकी आणि आकर्षक वाटते आणि याचे संपूर्ण श्रेय या गाण्याचे दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर अभिषेक जावकर यांना जाते. डॉ. श्रीहरी गोकर्णकर यांनी लिहिलेल्या या गाण्यातील प्रत्येक शब्द हे मनातल्या सर्व भावनांना जागे करतात आणि आपण नकळतपणे गाण्यांच्या शब्दांत गुंग होऊन जातो. तसेच मंत्रमुग्ध करणारा आवाज आणि संगीत दोन्ही केवल वाळंज यांचे आहे आणि संगीत पाटील हे म्युझिक प्रोग्रामर आहेत.
रेड बल्ब मुव्हिज प्रा. लि. निर्मित “येशील ना” या गाण्यात रमून जाण्यासाठी तयार आहात ना...
