२५०० आरोग्यसेवा प्रॅक्टिशनर्सना वैद्यकीय सल्लासेवा (टेलिहेल्थ) दुर्गम भागात देता येईल
मुंबई, १७ एप्रिल २०२० – कोव्हिड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीत लोकांच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी देशात टेलिहेल्थ सेवांची विस्तृत पातळीवर अंमलबजावणी करण्यासाठी डॉक्टरांना जागरूक व प्रशिक्षित करण्यासाठी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय) आणि टेलिमेडिसीन सोसायटी ऑफ इंडिया (टीएसआय) यांनी हाती घेतलेल्या उपक्रमासाठी अपोलो हॉस्पिटल्स समूहाने आपला पाठिंबा जाहीर केला. अपोलो हॉस्पिटल्स समूहाच्या एकूण २५०० डॉक्टर्स ऑनलाइन टेलिहेल्थ ओरिएंटेशन प्रोग्रॅममध्ये सहभागी झाले त्यामुळे आरोग्यसेवा प्रॅक्टिशनर्सना दुर्गम भागात सेवा देता येईल.
अपोलो टेलिमेडिसीन नेटवर्किंग फाउंडेशचे संचालक आणि टेलिमेडिसीन सोसायटी ऑफ इंडियाचे पूर्वाध्यक्ष प्रो.के. गणपती म्हणाले, ‘'देशातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या टेलिमेडिसीन नेटवर्कने नेतृत्व करणे गरजेचे आहे. टेलिमेडिसीन सोसायटी ऑफ इंडियाने तयार केलेल्या या ऑनलाइन प्रशिक्षण उपक्रमात आमचे सर्व डॉक्टर्स सहभागी होतील याची मला खात्री आहे, लहान- मोठी सर्व हॉस्पिटल्स अपोलो हॉस्पिटल्सच्या मार्गावर चालतील आणि आपल्या डॉक्टर्सना टेलिहेल्थचा वापर करण्याविषयी जागरूक करतील.'’
कोव्हिड-१९ चे संकट आणि त्यामुळे जारी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे वाहतुकीवर निर्बंध आले असल्यामुळे टेलिमेडिसीन सेवांची मागणी वाढली आहे. त्यालाच प्रतिसाद म्हणून आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने टेलिमेडिसीन मार्गदर्शक तत्वे जारी करत सीएमआय अक्टच्या तरतुदींमध्ये औपचारिक बदल केला आहे. त्यानंतर चेअरमन बोर्ड ऑफ गर्व्हनर्स (एमसीआयने नेमल्याप्रमाणे) टीएसआयला महिन्याभरात ५ लाख डॉक्टर्सना प्रशिक्षित करून टेलिहेल्थ सुविधांचा प्रभावी वापर करण्याची विनंती केली आहे. हा हेतू साध्य करण्यासाठी खास प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आला असून अपोलो टेलिहेल्थ त्यात सक्रिय आहे.
अपोलो टेलिहेल्थ हा समूहाचा विभाग गेल्या दोन दशकांपासून दुर्गम भागात दर्जेदार आरोग्यसेवा उपल्बध करून देत आहे. अपोलो हॉस्पिटल्स समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रताप सी. रेड्डी म्हणाले, ‘१९९८ मध्ये अपोलोने टेलिमेडिसीन लाँच करण्याचा निर्णय घेतला आणि २४ मार्च २००० मध्ये आंध्र प्रदेशातील अरागोंदा येथे उभारण्यात आलेल्या जगातील पहिल्या व्हीसॅट अनेबल्ड व्हिलेज हॉस्पिटलचे तेव्हाचे अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. गेल्या दोन दशकांत अपोलो टेलिहेल्थ विभाग लक्षणीय प्रमाणात विस्तारला असून दिवसाला एकूण १० हजार टेलि-कन्सल्ट्स होतात व जगातील सर्वात मोठ्या टेलि-इमरजन्सी सेवा तसेच कित्येक पीपीपी प्रकल्प राबवले जातात. समाजाच्या सर्व स्तरांमध्ये अखंडित वैद्यकीय सेवा पुरवण्याच्या अपोलोच्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून टेलिहेल्थ सुविधांचा फायदा करून डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याच्या एमसीआयच्या उपक्रमात सहभागी होताना आनंद होत आहे.’
अपोलो टेलिहेल्थ राज्य सरकारांसह पीपीईच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरवते. कंपनीतर्फे आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड येथे टेलिहेल्थ अनेबल्ड प्रायमरी हेल्थ सेंटर्स, तर हिमाचल प्रदेशात टेली इमरजन्सी सेंटर्स चालवली जातात.
No comments:
Post a Comment