सोशल मीडियापासून लांब, पुस्तकांच्या जवळ...
‘अग्गंबाई सासूबाई’ मालिका हि अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली. सध्या या मालिकेला आणि त्यातील कलाकारांना सर्वजण मिस करत आहेत. या मालिकेतील शुभ्रा म्हणजे अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या काय करतेय हे जाणून घायची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. तेजश्री सध्या वाचनात व्यस्त आहे. लॉकडाऊनमुळे मिळालेल्या या मोठ्या सुट्टीमध्ये ती अवांतर वाचन करतेय. सोशल मीडियापासून लांब राहून तेजश्री हा वेळ स्वतःसाठी देतेय. सोशल मीडियावर वेळ न दवडता तोच वेळ सत्कारणी लावायचं तेजश्रीने ठरवलंय आणि म्हणूनच ती पुस्तकांच्या प्रेमात रमली आहे. पुस्तकांच्या जवळ गेलेली तेजश्री सोशल मीडियापासून सध्या लांब असल्यामुळे तिचे चाहते मात्र तिला मिस करत आहेत.
No comments:
Post a Comment