आता पर्यंत "टॉकीज प्रीमियर लीग" मध्ये प्रेक्षकांनी दर रविवारी विविध चित्रपटांचा आस्वाद घेतला आहे. या रविवारी टॉकीज प्रीमियर लीग मध्ये झी टॉकीज घेऊन येत आहे स्वप्नांन मधून खडाडून जागं करणारा चित्रपट परी हूं मैं .हा चित्रपट बच्चे कंपनी साठी तर आहेच पण त्यांच्या पालकांना एका सत्य परिस्तिथीची जाणीव करून देणारा हा चित्रपट आहे.
साजिरी (श्रुती निगडे) शाळेतल्या एका नाटकात काम करण्याची संधी तिला मिळते . त्या नाटकात साजिरी सुरेख अभिनय करते.तिचा अभिनय पाहून एका हिंदी मालिकेचे दिग्दर्शक तिला चक्क 'परी हूँ मैं' या हिंदी मालिकेत काम करण्याची सुवर्ण संधी देतात . तिची आई (देविका दफ्तरदार) याला विरोध करते. पण त्यातून मिळणारी प्रसिद्धी आणि पैशाला परीचे बाबा (नंदू माधव) भुलतात. सेटवर साजिरी एक खास मैत्रीण (जान्हवी) बनवते. पण तारखांच्या फासामुळे जान्हवी मालिकेतून बाहेर पडते. त्यामुळे दिग्दर्शक मालिकेचे कथानक बदलतात आणि साजिरी सुद्धा ही भूमिका गमावते. या सगळ्याचा तिच्या मनावर विपरीत परिणाम होतो. झगमगत्या दुनियेत प्रवेश केल्या नंतर लहान मुलं त्यांचं लहानपण आणि निरागसता कशाप्रकारे हरवतात याचं उत्तम चित्रण "परी हूं मैं" या चित्रपटात करण्यात आलेलं आहे.
साजिरी याचा सामना करण्यास सक्षम असेल का ? तिचे आई वडील तिचं हरवलेलं बालपण परत मिळविण्यासाठी मदत करतील का?
या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी पाहायला विसरु नका "परी हूं मैं" या रविवारी म्हणजेच १७ मे २०२० रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता फक्त आपल्या झी टॉकीज वर.
No comments:
Post a Comment