Tuesday, 19 May 2020

Zee Yuva | झी युवावर मनोरंजनाची मेजवानी

प्रेत्येक रविवारी करा झी युवा बिंज-वॉच

लॉकडाउनमुळे सर्व मालिकांचं चित्रीकरण पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे मालिकांचे जुने भाग, जुन्या काही मालिकांचं पुनःप्रक्षेपण आणि पूर्वीचे पुरस्कार सोहळे यांचं प्रक्षेपण सध्या वाहिन्यांवर होत आहे. पण झी युवा वाहिनी या लॉकडाऊनच्या काळात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी काहीतरी नवीन सादर करणार आहे. सोफ्यावर रीलॅक्स बसून, मूडनुसार हातात कोल्डड्रिंक किंवा कॉफी घेऊन आवडत्या मुव्हीज किंवा मालिकेचे एकापाठोपाठ एक सलग एपिसोड्सवर एपिसोड्स, सीझन्सवर सीझन्स बघण्याची मजा काही औरच! म्हणूनच झी युवा आपल्या लाडक्या प्रेक्षकांसाठी बिंज-वॉच करण्यासाठी काही नवीन कथा सादर करण्यास सज्ज आहे. १७ मे पासून ते ३१ मे पर्यंत प्रत्येक रविवारी दुपारी १२ ते ३ वाजता प्रेक्षकांना ३ नवीन कथांचा आस्वाद झी युवा वाहिनीवर घेता येईल. जोडप्याच्या नात्यातला गोडवा असलेली एक गोड कथा प्रिया बापट आणि उमेश कामत 'आणि काय हवं..?' प्रेक्षकांसाठी सादर करणार आहेत. ही गोष्ट ३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येईल. आपल्याला आपल्या जोडीदाराच्या काही गोष्टी माहीत नसतात पण या कथेमध्ये प्रिया आणि उमेश साकारत असलेले जुई आणि साकेत मात्र वेगळे आहे. त्या दोघांचं नातं हे प्रेम आणि विश्वास आणि थोड्या मस्तीने परिपूर्ण आहे. जुई आणि साकेत त्यांच्या लग्नानंतरच्या जिव्हाळ्याच्या आणि मस्तीच्या नात्याची सुवर्ण आणि गोड सफर प्रेक्षकांना या गोष्टीतून अनुभवायला मिळेल. खाकी वर्दीतील आनंदी माणसाची गोष्ट 'पांडू' या कथेमधून २४ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येईल. या कठीण प्रसंगी आपले पोलीस बांधव दिवस रात्र बाहेर झटत कोरोनावर मत करत आहेत. वेळी ते प्रेमाने समजावतात किंवा प्रसंगी ते खूप कठोर देखील होतात. पोलिसांची वेगळी बाजू 'पांडू' या कथेतून प्रेक्षकांना अनुभवता येईल. रात्रीस खेळ चाले मालिकेतील दत्ता म्हणजेच अभिनेता सुहास शिरसाट यामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. निपुण धर्माधिकारी याची ‘वन्स अ इयर' हि कथा प्रेमातल्या अविस्मरणीय क्षणांचा प्रवास प्रेक्षकांना घडवेल. यामध्ये निपुण धर्माधिकारी सोबत अभिनेत्री मृण्मयी गोडबोले असून ही गोष्ट रावी आणि अरिहंत या त्यांच्या व्यक्तिरेखांभोवती फिरते. या दोघांच्या नात्याचा सहा वर्षांचा प्रवास ३१ मे रोजी प्रेक्षकांना या गोष्टीतून अनुभवायला मिळेल.  
काही निवडक कथा झी युवाने या लॉकडाउनच्या काळात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सादर करण्याचं पाऊल उचललं आहे. लॉकडाऊनमुळे घरी राहून संपूर्ण परिवारासोबत या मनोरंजनाच्या मेजवानीचा आस्वाद घेण्यासाठी प्रेक्षक देखील सज्ज असतील यात शंकाच नाही.

No comments:

Post a Comment