Tuesday, 23 February 2021

‘भारतीय आर्किटेक्चर व कॅनेडियन वूड’ चा वेबिनार संपन्न

फेस्टिव्हल ऑफ आर्किटेक्चर अॅंड इंटिरियर डिझाईन मध्ये आर्किटेक्चर क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींनी सादरीकरण केले

मुंबई, २३ फेब्रुवारी २०२१:- कॅनेडियन वूडने संपूर्ण भारतातील नामांकित आर्किटेक्ट, इंटिरियर डिझाइनर्स, बिल्डर्स आणि डेव्हलपर यांच्यासह काम केले आहे. त्यांच्या प्रकल्पांमध्ये त्यांना तांत्रिक सहाय्य आणि हाताळणीसाठी मदत करून मनुष्यबळ व ‘स्ट्रक्चरल अॅप्लिकेशन्स’ या दोहोंवर काम केले आहे.‘कॅनेडियन वूड’ तर्फे अनेकदा विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी वेबिनार आयोजित केली जातात. या मालिकेत, ‘भारतातील आर्किटेक्चर व कॅनेडियन वूड’ या विषयावर नववा वेबिनार नुकताच आयोजित करण्यात आला. या लाकडाच्या प्रजातींसह शक्य असलेल्या विविध अॅप्लिकेशन्सची पुष्टी या ‘वेबिनार’मध्ये करण्यात आली. ‘कॅनेडियन वूड’ वर काम करणाऱ्या आणि ‘कॅनेडियन वूड’ च्या प्रजातींसह आपल्या कामाचे प्रदर्शन करणाऱ्या प्रख्यात आर्किटेक्ट्सचे प्रथमदर्शनी अनुभव हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते.

एफओएआयडी (फेस्टिव्हल ऑफ आर्किटेक्चर अॅंड इंटिरियर डिझाईन) यांच्या संयुक्त विद्यमाने सादर झालेल्या या वेबिनारमध्ये, आर्किटेक्चर क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींनी सादरीकरण केले व चर्चासत्रात भाग घेतला. यामध्ये, वास्तुशिल्प कन्सल्टंट्सचे आर्किटेक्ट सोन्के हूफ, स्टुडिओ लोटसचे आर्किटेक्ट सिद्धार्थ तलवार आणि स्टुडिओ के-7 मधील केतन जावडेकर यांचा समावेश होता. ‘एफआयआय’च्या ‘मार्केट डेव्हलपमेंट’ विभागाच्या संचालिका निर्मला थॉमस यांचे स्वागतपर भाषण झाले. ‘एफआयआय’ चे तांत्रिक सल्लागार पीटर ब्रॅडफिल्ड यांनी सूत्रसंचालन केले.

एफआयआय चे कंट्री डायरेक्टर प्रणेश छिब्बर म्हणाले, “आमच्या नवव्या वेबिनारमध्ये या उत्कृष्ट व्यावसायिकांनी येऊन आपले सर्वोत्कृष्ट काम मांडले व विचार व्यक्त केले, हा आमचा मोठाच बहुमान आहे. या प्रख्यात आर्किटेक्ट्सनी आणि त्यांच्या ग्राहकांनी इतर अनेक उपलब्ध पर्यायांपेक्षा ‘कॅनेडियन वूड’ निवडल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. या व्यावसायिकांच्या प्रकल्पांसाठी आवश्यक असणाऱ्या ‘कॅनेडियन वूड’च्या प्रजाती व त्यांचा दर्जा यांची व्यवस्था करून त्यांना मदत करण्यास आम्ही उत्सुक आहोत. तसेच त्यांच्या कंत्राटदारांना गरज पडल्यास, कधीही व कोठेही तांत्रिक सहाय्य करण्यास आम्ही तयार आहोत.”

कलाकार आणि व्यवसायाने आर्किटेक्ट असलेले केतन जावडेकर हे किमान 45 आंतरराष्ट्रीय पारितोषिकांचे विजेते आहेत. ‘पॅलेट – ब्रूअरी अॅंड किचन’ या बंगळुरूमधील प्रीमियम दर्जाच्या पबचे उदाहरण त्यांनी या सत्रात प्रामुख्याने दिले. बंगळुरू हे ‘पॅलेट्स’चे एक प्रमुख उत्पादन केंद्र असल्याने, उपलब्ध जागेत डिझाईनच्या विचारांना जावडेकर यांना प्रेरणा मिळाली. ‘एसपीएफ’ चा वापर करून उभारण्यात आल्या. या प्रकल्पाला ‘इंटरनॅशनल ए ’डिझाइन अॅवॉर्ड’, तसेच ‘हरित इंटिरियर्स’ या कॅटेगरीमधील ‘इंटरनॅशनल डिझाइन अॅवॉर्ड’ यांसारखी अनेक पारितोषिके मिळाली आहेत.

आर्किटेक्ट सिद्धार्थ तलवार यांनी आपले प्रात्यत्क्षिक सादर केले. तलवार हे जागरूक डिझाइनवर विश्वास ठेवणारे, म्हणजे स्थानिक सामग्री, सांस्कृतिक प्रभाव आणि तपशीलांकडे लक्ष देणारा एक समावेशक दृष्टीकोन बाळगणारे आहेत. अनेक प्रीमियम स्वरुपाच्या निवासी व आतिथ्य प्रकल्पांमध्ये तलवार यांनी ‘कॅनेडियन वूड’ च्या प्रजातींचा वापर केलेला आहे. त्यांच्या सादरीकरणात त्यांनी या प्रकल्पांचा समावेश केला. उत्तराखंडमधील कुमाऊँ येथे असलेल्या ‘व्हिला इन वूड्स’ असे नाव असलेला सध्या चालू असलेला प्रकल्प त्यांनी या सादरीकरणात प्रामुख्याने मांडला.

या व्यतिरिक्त, तलवार यांनी लाकडी कामावर आधारीत आपले काही प्रकल्प, उदा. ‘ताज थिओ’ (सिमला), ‘रास छत्रसागर’ (निमज), ‘हाईड पार्क रेसिडेन्स’ (दिल्ली), आदी प्रेक्षकांपुढे सादर केले. यांतील काही प्रकल्पांमध्ये त्यांनी ‘कॅनेडियन वूड’ लाकडाच्या प्रजातींचा वापर केलेला आहे, तर इतर काही प्रकल्पांमध्ये स्थानिक ‘नक्काशी’ (नक्षी) कामाचा / कलाकुसरीचा वापर केला आहे.

सुप्रसिद्ध आर्किटेक्ट सोन्के हूफ यांनी सादर केले. अनेक प्रतिष्ठित पुस्तके आणि मासिकांमध्ये सोनके हूफ यांच्या प्रभावी कामांचा विशेष उल्लेख आढळतो. त्यांनी अहमदाबादमधील एका निवासी प्रकल्पाविषयीचे सादरीकरण केले. या बंगल्यामध्ये राहती जागा वाढविण्यावर मर्यादा येत असल्याने, हूफ यांनी बंगल्याच्या छतावर एक मोठा बॉक्स तयार करून बसवला. त्याच्या चहुबाजूंनी ‘लुव्र’ ची रचना करण्यात आली आहे. अहमदाबादमधील प्रकल्पात ‘अॅडजेस्टेबल लुव्र’मुळे या बंगल्याचे सौंदर्य वाढले आहे. त्याशिवाय, घरात असह्य, तीव्र सूर्यप्रकाश येऊ नये, याचीही सुरेख व्यवस्था त्यांनी केली आहे. 

हा वेबिनार पाहण्यासाठी, क्लिक करा :- https://www.youtube.com/watch?v=xajKyaa29x8&t=1076s

No comments:

Post a Comment