Monday, 22 February 2021

नामवंत दिग्दर्शक ‘झी टॉकीज कथायण चषक’ स्पर्धेच्या परीक्षकाची धुरा सांभाळणार

भविष्यात लेखक म्हणून नावलौकीक मिळविण्यासाठी आज बरेच जण धडपड करीत आहेत. अशाच नव्या दमाच्या लेखकांसाठी झी टॉकीज वाहिनीने ‘झी टॉकीज कथायण चषक’ स्पर्धेची घोषणा केली आणि या स्पर्धेला उत्तम प्रतिसादही मिळाला आहे. सर्वच वयोगटातील व्यक्तींनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. अगदी वय वर्ष 12 असललेल्या मुलीने देखील या स्पर्धेत सहभाग घेत बाल लेखकांसाठी नवा आदर्श तयार केला आहे. आता हजारो स्पर्धकांमधून सर्वोत्तम लेखकांची निवड करण्यात येणार आहे. झी टॉकीज कथायण चषक स्पर्धा म्हणजे लेखकांसाठी सुवर्णसंधी आहे.
या स्पर्धेच्या परीक्षक पदी नामवंत दिग्दर्शकांची निवड करण्यात आली आहे. १९८० पासून नाटक क्षेत्रात कार्यरत असलेले आणि चित्रपट, नाटक, दूरदर्शन, साहित्य, जाहिरात अशा विविध माध्यमात उल्लेखनीय कामगिरी केलेले दिग्दर्शक-पटकथाकार संजय पवार, नॉट ओन्ली मिसेस राऊत आणि शेवरी यासारख्या सुपरहिट चित्रपटांसाठी नॅशनल अवॉर्ड पटकावले लोकप्रिय दिग्दर्शक-पटकथाकार गजेंद्र अहिरे, नॅशनल अवॉर्ड विनर आणि बंदिशाळा व दशक्रिया या सारखे चित्रपट प्रेक्षकांसाठी सादर करणारे दिग्दर्शक-पटकथाकार संजय पाटील ही कलाक्षेत्रामधील नावजलेली मंडळी या स्पर्धेच्या परीक्षक पदी असणार आहेत. या मंडळींनी आजवर उत्तमोत्तम कलाकृती मराठी चित्रपटसृष्टीला दिल्या आहेत. त्याचबरोबरीने झी टॉकीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर देखील या अनोख्या स्पर्धेचे परीक्षक असणार आहेत.
हजारोच्या संख्येने लेखकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यामुळे यामधून सर्वोत्तम लेखक निवडणं परीक्षकांसाठी मोठा टास्क असणार आहे. या स्पर्धेनिमित्त हॉरर, ड्रामा, विनोदी अशा अनेक प्रकारच्या कथा मराठीमध्ये लिहून पाठवण्याची मुभा स्पर्धकांना मिळाली होती. ही स्पर्धा म्हणजे नवोदीत लेखकांच्या यशाची पहिली पायरी आहे. प्रत्येकामध्ये दडलेल्या लेखकाला झी टॉकीज वाहनीने हक्काचा मंच उपलब्ध करुन दिला आहे. आता या वर्षी ‘झी टॉकीज कथायण चषक’ कोण पटकावणार आणि कोणाचं नशीब उजळणार याकडे साऱ्यांच लक्ष लागून राहिलं आहे.

No comments:

Post a Comment