Thursday, 4 February 2021

Zee Talkies - Maharashtracha Favorite Kon? Suvarna Dashak Sohla

 यंदाचा झी टॉकीजचा ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ पुरस्कार सोहळा ठरणार खास

झी टॉकीजचा भव्यदिव्य पुरस्कार सोहळा ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ मधून कलाकारांना त्यांच्या कामाची पोचपावती मिळते. कलाकारांचं, प्रेक्षकांचं अतुट नातं या वाहिनीशी जोडलं गेलं आहे. दरवर्षी ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ हा पुरस्कार सोहळा पाहत असताना त्याचा प्रत्यय आपल्याला येतोच. झी टॉकीज वाहिनी यावर्षी पुन्हा एकदा नव्या उत्साहासह ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ हा धमाकेदार पुरस्कार सोहळा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यंदाचा ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ हा पुरस्कार सोहळा सुवर्णदशक सोहळा म्हणून साजरा केला जाणार आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये ज्या चित्रपटांनी, कलाकारांनी ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ हा पुरस्कार पटकावला आहे त्यांना यंदाच्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ पुरस्कार सोहळ्यात नामांकन मिळणार आहे. आपल्या लाडक्या कलाकारांना तसेच आवडत्या चित्रपटांना विजेता म्हणून निवडण्याची संधी प्रेक्षकांना या सोहळ्यानिमित्ताने मिळते. यंदा सुवर्णदशक सोहळ्याच्या निमित्ताने गेल्या दहा वर्षात ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’पुरस्कार पटकावलेल्या सैराट, दुनियादारी, लय भारी आणि अशा अजून ब्लॉकबस्टर चित्रपटांमधून सुवर्णदशकाचा फेवरेट महाविजेता चित्रपट निवडणं म्हणजे प्रेक्षकांसाठी मोठा टास्क असणार आहे.
महाराष्ट्राचा फेवरेट कोण?मध्ये दिग्गज कलाकारांची मांदियाळी तर पाहायला मिळतेच पण त्याचबरोबरीने रेड कार्पेटवर अवतरलेल्या तारे तारकांचा ग्लॅमरस अवतार प्रेक्षकांना भुरळ घालणारा असतो. या पुरस्कार सोहळ्याचं यंदाच तेरावं वर्ष असून यावर्षीचा महाराष्ट्राचा फेवरेट कोण? हा दशकतला सर्वात मोठा पुरस्कार सोहळा असेल यात शंकाच नाही. गेलं दशक हे मराठी सिनेसृष्टीसाठी खूपच अविस्मरणीय ठरलं. या दशकात अनेक उत्तमोत्तम चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस तर आलेच पण त्याचसोबत मराठी चित्रपटाने बॉक्सऑफिसवर कल्ला करून यशाचं शिखर देखील गाठलं. दुनियादारी, सैराट या सारख्या चित्रपटांनी करोडोंमध्ये कमाई करून हिंदी चित्रपटांना देखील टक्कर दिली. अशाच या मराठी सिनेसृष्टीच्या यशस्वी दशकाची वाटचाल यंदा महाराष्ट्राचा फेवरेट कोण?मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल त्यामुळे या नयनरम्य सोहळ्याकडे सिनेरसिकांच लक्ष लागून राहिलं आहे. प्रेक्षकांचा हक्काचा असलेला हा सोहळा लवकरच संपन्न होणार असून यंदा त्यात सुवर्णदशकाचा उत्सव असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. धमाल-मस्ती, मनोरंजनाचा जबरदस्त तडका प्रेक्षकांना या पुरस्कार सोहळ्यात अनुभवायला मिळेल यात शंकाच नाही.
निखळ हास्य आणि मनोरंजनाचा डबल डोस प्रेक्षकांना झी टॉकीजवर अनुभवायला मिळतो. गेले कित्येक वर्षे झी टॉकीज वाहिनी प्रेक्षकांच सातत्याने मनोरंजन करत आहे. ही वाहिनी मराठी चित्रपटसृष्टीमधील सुपरहीट चित्रपट सिनेरसिकांपर्यंत पोहचवते. खरंतर हे चित्रपट म्हणजे सिनेरसिकांसाठी फिल्मी मेजवानीच. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारी ही वाहिनी चित्रपटसृष्टीमधील कलाकारांचा, मराठी चित्रपटांचा सन्मान सातत्याने करत आली आहे.
झी टॉकीज वाहिनीच्या नावाजलेल्या आणि सुप्रसिद्ध ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ या सुवर्ण दशक पुरस्कार सोहळ्यासाठी तुम्हीही तयार व्हा

No comments:

Post a Comment