राधा आणि कबिरच्या व्हिक्टरी फेसेसवर चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव
देवदत्त नागे, श्वेता शिंदे आणि रोहिणी हट्टंगडी अशा दिग्गज कलाकारांचे, 'झी युवा' वाहिनीवरील 'डॉक्टर डॉन' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन झाले. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. डॉक्टर डॉनने टेलिव्हिजनवर अक्षरशः धुमाकूळ घालत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यास सुरुवात केली. मालिकेचा वेगळा विषय, डॉक्टर डॉन आणि त्याच्या पंटर मंडळींचा जलवा या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांच्या लाडक्या ठरल्या.
या मालिकेतील प्रेक्षकांची अजून एक आवडती जोडी म्हणजे राधा आणि कबिरची. या भूमिका साकारणारे कलाकार म्हणजे अभिनेता अनुराग वरळीकर आणि अभिनेत्री प्रज्ञा चवंडे हे ऑनस्क्रीन जितकी धमाल करतात तितकीच ऑफस्क्रीन देखील करतात. डॉक्टर डॉनच्या सेटवर कधी शेकोटी भोवती गप्पांची किंवा गाण्यांची मैफिल तर कधी खमंग पदार्थांचा बेत असतो. नुकतंच मालिकेच्या शूटिंग दरम्यान एक सिन शूट करण्यासाठी कलाकार सॅलोनमध्ये गेले. राधा आणि कबीर कॉलेज बंक करून बाहेर जातात आणि मोनिका व विक्रांत सुद्धा बाहेर जातात. हे चार ही जणं एकाच सॅलोनमध्ये येतात आणि त्यांच्या पासून लपण्यासाठी राधा आणि कबीर एक युक्ती लढवतात. ते तोंडावर फेस मास्क शीट लावतात. शूटिंग दरम्यात त्यांचं स्किन केअर रुटीन देखील पार पडलं असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही. त्या दोघांचा फोटो अनुरागने त्याच्या सोशल मीडियावरून चाहत्यांसाठी शेअर केला. हा त्यांचा व्हिक्टरी फेस आहे असं अनुरागने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. त्यांच्या या फोटोवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.
No comments:
Post a Comment