Tuesday, 11 January 2022

Indian calligraphy honours in 18th "Cheongju Jikji" International Calligraphy Binale (Competition) of korea - भारतीय सुलेखन कलेचा कोरियाच्या १८ व्या “चिऑन्गजू जिकजी” या आंतरराष्ट्रीय कॅलिग्राफी बिनाले मध्ये (स्पर्धेमध्ये) गौरव

Calligraphers Achyut Palav, Narayana Bhattathiri, Akshaya Thombre, Rupali Thombare and Shubhangi Gade win Awards
Indian calligraphy was honoured in the 18th International Calligraphy Binale(Competition) "Cheongju Jikji" of Korea.  The competition was held at the Korean Art Museum from 23-12-2021 to 28-12-2021. A total of 71 works of art were submitted by 40 calligraphers in different Indian languages in this calligraphy competition. Apart from calligraphers Achyut Palav and Narayan Bhattathiri, the works of Akshay Thombre, Rupali Thombre and Shubhangi Gade have also receivedawards.
This competition was based on the theme Peace, Unity, Love.  Especially, Korean paper sent to participating artists to preserve the Korean traditional method, therefore it created enthusiasm between Indian calligraphers.
The “Cheongju Jikji” World Calligraphy Competition is not only to introduce the cities of Jikji and Hangul to the world, but also to convey to the new generation the only one heritage of calligraphy of their central region. Calligraphers in many countries presented their arts in their own script.
“Cheongju Jikji” has gotten a status of World Heritage and its name is also included in the UNESCO world list. In addition, it is affiliated with ICDH (International Written Heritage Center).
कोरियाच्या १८ व्या “चिऑन्गजू जिकजी” आंतरराष्ट्रीय कॅलिग्राफी बिनाले मध्ये (स्पर्धेमध्ये) भारतीय सुलेखन कलेचा गौरव
अच्युत पालव, नारायण भट्टाथिरी, अक्षया ठोंबरे, रूपाली ठोंबरे आणि शुभांगी गाडे यांना पारितोषिके
कोरियाच्या १८ व्या ”चिऑन्गजू जिकजी" आंतरराष्ट्रीय कॅलिग्राफी बिनाले मध्ये (स्पर्धेमध्ये ) भारतीय सुलेखन कलेचा गौरव करण्यात आला. 'कोरियन आर्ट म्युझिअम' या कलादालनात २३-१२-२०२१ ते २८-१२-२०२१ या दरम्यान आयोजित केल्या गेलेल्या १८व्या `चिऑन्गजू जिकजी' जागतिक अक्षर सुलेखन स्पर्धेमध्ये भारतातील ४० सुलेखनकारांनी मिळून विविध भाषेतील ७१ कलाकृती पाठविल्या होत्या यापैकी सुलेखनकार अच्युत पालव, नारायण भट्टाथिरी यांच्याबरोबरच अक्षया ठोंबरे, रूपाली ठोंबरे आणि शुभांगी गाडे या भारतीय कलाकारांच्या कलाकृतींना पारितोषिके मिळालेली आहेत.
या स्पर्धेसाठी शांती, ऐक्य, प्रेम अशा विविध विषयांवर चित्रे मागविली होती. विशेष म्हणजे कोरियाची पारंपारिक पद्धत जपण्यासाठी कोरियन पेपर सहभागी कलाकारांसाठी खास पाठविण्यात आला होता, त्यामुळे भारतीय कॅलिग्राफरना काम करण्यासाठी उत्साह आला. 
`चिऑन्गजू जिकजी' जागतिक अक्षर सुलेखन स्पर्धा फक्त जिकजी आणि हंन्गूल या शहरांचा जगाला परिचय करुन देण्यासाठी नसुन सुलेखन या त्यांच्या केंद्रीय प्रदेशातील एकमात्र सांस्कृतिक वारसा असलेल्या कलेला नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे. यात अनेक देशांतील सुलेखनकारांनी आपापल्या लिपीत कलाकृती सादर केल्या.
`चिऑन्गजू जिकजी'ला जागतिक वारसा हा दर्जा मिळालेला असून युनेस्कोच्या जागतिक यादीत त्याची नोंद आहे. यासोबतच ते ICDH ( आंतरराष्ट्रीय लिखित वारसा केंद्र) सोबत निगडीत आहे.

No comments:

Post a Comment