'कालजयी सावरकर' म्हणजे सावरकरांचे चरित्र आणि विचार मांडण्याचा एक स्तुत्य प्रयत्न!
लघुपटाच्या विशेष स्क्रिनिंग दरम्यान जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांची प्रतिक्रीया
दादर येथील प्लाझा सिनेमाचे हाऊसफुल झालेले प्रिव्हियू थिएटर आणि पत्रकारांसोबतच्या संवादातून झालेले सावरकरांच्या कालजयी विचारांचे जागरण याला निमित्त होते 'कालजयी सावरकर' या लघुपटाचे पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेले विशेष प्रिव्हियू स्क्रिनिंगचे ! या कार्यक्रमाला जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. विवेक समूहाची निर्मिती असलेल्या 'कालजयी सावरकर' या लघुपटातून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्र आणि त्यांचे प्रखर राष्ट्रवादी विचार मांडण्याचा अतिशय स्तुत्य प्रयत्न झाला आहे आणि याचा मला आनंद वाटतो अशी बोलकी प्रतिक्रीया जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी लघुपट संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
याप्रसंगी लघुपटातील अभिनेते मनोज जोशी, सौरभ गोखले आणि तेजस बर्वे यांच्यासह इतर सहकलाकार आणि तंत्रज्ञ ही उपस्थित होते. लघुपटाचे स्क्रिनिंग झाल्यानंतर प्रश्नोत्तरादरम्यान बोलताना लघुपटाचे दिग्दर्शक गोपी कुकडे म्हणाले की, 'क्रिएटीव्हीटी अर्थात कलात्मकता ही माध्यम बदललं तरी त्याचं मूळ बदलत नाही त्यामुळे गेली ३० हून अधिक वर्ष जाहिरात क्षेत्रात काम केल्यानंतर आता लघुपटाच्या माध्यमात काम करताना फारसे अवघड गेले नाही. यावेळी निर्माते आणि विवेक समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर सुद्धा उपस्थित होते त्यांनीही पत्रकारांना संबोधित करून आपली या लघुपटामागील निर्मितीची संकल्पना मांडली. लवकरच हा लघुपट विविध संस्थांच्या माध्यमातून गावा - गावात आणि शहरा - शहरात भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या वर्षाचे औचित्य साधून दाखवला जाणार आहे.
या लघुपटात पारतंत्र्यातील हिंदुस्थानच्या भूमिकेत अभिनेते मनोज जोशी यांनी तर नवभारताची भूमिका तेजस बर्वे या अभिनेत्याने साकारली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रमुख भूमिकेत सौरभ गोखले यांनी विलक्षण लीलया पेलली आहे. यासोबतच प्रमोद पवार(लोकमान्य टिळक), अपर्णा चोथे(यमुना सावरकर), पायल गोगटे(येसू वहिनी), लिना दातार(ताई दातार), शंतनू अंबाडेकर(स्वातंत्र्यवीर सावरकर - वय १७), जयोस्तु मेस्त्री(स्वातंत्र्यवीर सावरकर-वय ११), हृषिकेश भोसले(गणेश (बाबाराव) सावरकर), रुता पिंगळे(मादाम कामा), पवन वैद्य(श्यामजी कृष्ण वर्मा), मोहित वैद्य(इंग्रज गुप्तहेर), विनोद पवार, प्रितेश कोसबे आणि इतर सहकलाकारांनी अभिनय केला आहे. जेष्ठ दिग्दर्शक गोपी कुकडे यांचं दिग्दर्शन लाभलेल्या या लघुपटाची संकल्पना दिलीप करंबेळकर यांची असून सृजन-दिग्दर्शक विनोद पवार यांचे तर संहिता डॉ. समिरा गुजर, अमोघ पोंक्षे यांची आहे. छायाचित्रण दिनेश कंदरकर, पार्श्वसंगीत अमित विलास पाध्ये, संकलन समीर अन्नारकर, किरण चव्हाण, संशोधन सहाय्य अक्षय जोग, कला दिग्दर्शन अजित दांडेकर, वेशभूषा पूर्णिमा ओक, रंगभूषा सुहास गवते, केशभूषा नर्गिस आणि निर्मिती व्यवस्थापन जयेश मिस्त्री यांची आहे.

No comments:
Post a Comment