१४ ऑगस्ट, २०२२: बिग बॉस मराठीचं चौथ पर्व प्रेक्षकांच्या भेटीस येणार हे कळताच सगळयांनाच उत्सुकता होती हे जाणून घेण्याची कि, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोण कोण असणार आणि मुख्य म्हणजे त्याचा सूत्रधार कोण असणार याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचली होती. त्या प्रश्नाचं उत्तर आता प्रेक्षकांना मिळालं आहे. केवळ मराठीच नाही तर हिंदीमध्येही आपल्या कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने आणि अभिनयाने वेगळी छाप सोडणारे मराठी माणसांना कायम आपलेसे वाटणारे महेश मांजरेकर या कार्यक्रमाच्या सूत्रधाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. एका विशेष प्रोमोमधून महेश मांजरेकरच या पर्वाचे सूत्रसंचालन करणार असल्याचे वाहिनीने जाहीर केले.
बिग बॉस मराठीचा सीझन नवा, घर नवे, खेळाडू देखील नवे... पण, होस्ट मात्र तोच, महेश वामन मांजरेकर ! लवकरच येणार नव्या कोऱ्या पर्वासोबत तुमच्या भेटीला ... असा प्रोमो काल आला आणि सगळीकडे एकच चर्चा ! महेश मांजरेकरच आहेत नव्या पर्वाचे सूत्र सूत्रसंचालक. बिग बॉस मराठीच्या तीनही पर्वांच्या अभूतपूर्व यशानंतर कलर्स मराठी आता घेऊन येत आहे बिग बॉस मराठी कार्यक्रमाचा सीझन चौथा. मागील पर्वामध्ये सूत्रसंचालनाच्या अनोख्या स्टाईलने महेश मांजरेकर यांनी प्रेक्षक आणि सदस्य सगळ्यांचीच मने जिंकली. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये ते सांगताना दिसले, बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये मी घेणार आहे "वेगळी" शाळा ! आता नक्की काय घडणार ? कशी घेणार महेश मांजरेकर स्पर्धकांची शाळा ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.
बिग बॉस आदेश देत आहेत ! हे वाक्य जेव्हा कानावर पडतं तेव्हा त्या घरातील सदस्यांसोबतच प्रेक्षकांचंही लक्ष त्या आवाजाच्या दिशेनं वळतं आणि आता काय घडणार याची उत्सुकता लागते. हे सर्व आता पुन्हाएकदा घडणार आहे. या आवाजासोबतच घरातील सदस्यांशी बाहेरून संवाद साधणारी एकमेव व्यक्ती म्हणजे या कार्यक्रमाचा सूत्रधार. या सदस्यांना कधी प्रेमाने समजावणे तर कधी आपला धाकही निर्माण करण्याचं काम सूत्रधार शनिवार रविवारच्या भागात करत असतो. ही भूमिका महेश मांजरेकर पार पाडणार आहेत.
या घरात किती सदस्य असतील कोण कोण असतील त्यांच्यामध्ये काय काय घडेल या प्रश्नांची उत्तरे लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत. कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बघत राहा कलर्स मराठी.
No comments:
Post a Comment