Saturday 6 August 2022

स्थलांतरित नाटकाचा मुंबई प्रीमिअर | रविवार दिनांक ऑगस्ट ७, २०२२ | सायंकाळी ६.०० वाजता

 

स्थलांतरित – थिएटर अकादमी, पुणे यांच्या सहकार्याने एनसीपीएची प्रस्तुती

एका समृद्ध देशातील इमारतीतील अंधारी तळघर. या तळघरात राहणारे ते दोघे. असे दोन स्थलांतरित, जे केवळ योगायोगाने एकत्र आले आहेत. त्यांच्या स्वतःच्या देशामध्ये त्यांची कधीही भेट झाली नाही. एकाचे हात एवढे बळकट आहेत की दिवसभर इमानदारीने काम करण्यासाठी ते कचरत नाहीत तर दुसऱ्याकडे अप्रतिम विचार करण्याची क्षमता असलेले डोके आहे. पण त्यांचा देश ना त्या बळकट हातांसाठी काही काम देतो आणि ना विचार मांडण्यासाठीचे स्वातंत्र्य. त्यामुळे ह्या दोन विरूद्ध शक्ती एकाच छताखाली एकत्र येतात. त्यानंतर निर्माण होतो तो एक कष्टकरी आणि बुद्धिवंत यांच्यातील न सोडवता येणारा आणि अगम्य संघर्ष. त्यात असेल समाजातील एकमेकांसाठी वेळ नसलेल्या दोन घटकांचे प्रतिनिधित्व करणारा विनोदी, उत्कट आणि अनेकदा आपली बाजू उघड करणारा संवाद.

या स्थलांतरितांच्या संवादातुन दर्शविले जाणार आहे, मातृभूमीच्या स्वातंत्र्यापासुन, व्यक्तीस्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य आणि त्या पलीकडे जाऊन माणुस म्हणुन जगताना स्वीकारलेले मानसिक पारतंत्र्याचे विविध पैलु. पुण्यातील शुभारंभाच्या प्रयोगानंतर, उद्या रविवार दिनांक ऑगस्ट ७, २०२२ ला एनसीपीएच्या माध्यमातुन या नाटकाचा मुंबईतील पहिला प्रयोग गोदरेज डान्स थिएटर एनसीपीए येथे सायंकाळी ६.०० वाजता रंगणार आहे. 

स्लावोमीर म्रोझेक (पोलिश) यांच्या इमिग्रंट्‌स ह्या नाटकावर आधारित

लेखन: माधुरी पुरंदरे

दिग्दर्शन: शिवराज वायचळ

कलाकारः चिन्मय पटवर्धन आणि गौरव बर्वे

*दिनांक – ऑगस्ट ७, २०२२*

*वेळ - संध्याकाळी ६ पासून*

*गोदरेज डान्स थिएटर*

मेम्बर प्राईज - Rs.३१५/-              
नॉन मेम्बर प्राईज - Rs. ३५०/-
कालावधी - ११० मिनिट

No comments:

Post a Comment