Tuesday 9 August 2022

जागतिक दर्जाचे रुग्णालय व आरोग्यसेवा संकुल विकसित करण्याच्या वचनासह अपोलो हॉस्पिटल्सचे हरयाणामध्ये पदार्पण

9 ऑगस्ट 2022राष्ट्रीय: आरोग्यसेवा क्षेत्रातील प्रणेते आणि रुग्णालयांची भारतातील पहिली मल्टीस्पेशालिटी शृंखलाअपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेड (बीएसई: 508869/ एनएसई: APOLLOHOSP) (AHEL - एएचईएल) ने आज घोषणा केली की त्यांनी नयती हेल्थकेयर अँड रिसर्च एनसीआर प्रायव्हेट लिमिटेडकडून हॉस्पिटल झोन जमिनीवर७ लाख चौरस फुटांपेक्षा जास्त ६५० खाटांच्या क्षमतेसहगुरुग्राम येथे हॉस्पिटलची मालमत्ता अधिग्रहीत विकत घेतली आहे. या व्यवहाराचे एकूण मूल्य जवळपास ४५० कोटी रुपये आहे. या विक्रेत्यांनी ही जमीन डीएलएफ कुतुब एन्क्लेव्ह कॉम्प्लेक्स मेडिकल चॅरिटेबल ट्रस्टने २०११ साली विकत घेतली होती.

हे अधिग्रहण म्हणजे भारतामध्ये आरोग्यसेवा क्षेत्रात अपोलो हॉस्पिटल्सच्या उच्च दर्जेदार वाटचालीतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून हरयाणा राज्यात अपोलो हॉस्पिटल्सचे हे पहिले पाऊल आहे. भारतातील सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेल्या शहरांपैकी एकगुरुग्राम या मिलेनियम शहरामध्ये हे रुग्णालय अपोलो ग्रुपचे स्थान निर्माण करेल.  या क्षेत्रामध्ये अपोलो हॉस्पिटल्सच्या सध्याच्या उपस्थितीमुळे त्यांच्यासाठी ही लक्षणीय ब्रँड इक्विटी ठरेल. गुरुग्राममधील गोल्फ कोर्स रोडवर नवे इंटिग्रेटेड हेल्थकेयर कॉम्प्लेक्स २४ महिन्यांमध्ये सुरु करण्यात येईल.  अनुभवी फॅकल्टी आणि आंतरराष्ट्रीय सहयोगातून राज्यातील व देशातील नागरिकांना अत्याधुनिक क्लिनिकल सुविधा आणि सेवा याठिकाणी उपलब्ध करवून दिल्या जातील आणि एक इंटरनॅशनल हेल्थकेयर डेस्टिनेशन ही या शहराची ठळक ओळख निर्माण केली जाईल.

डिजिटल हेल्थकेयरहेल्थकेयर एक्सिलिरेटर्स आणि स्टार्ट-अप्समध्ये प्रगतीला खतपाणी घालण्याचे काम देखील गुरुग्राममधील या रुग्णालयातून केले जाईल व अशाप्रकारे हे रुग्णालय देशाच्या हेल्थकेयर इको सिस्टिममध्ये योगदान देईलआघाडीच्या प्रथा व जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवांमध्ये देशाचे व हरयाणा राज्याचे नाव मोठे करेल.

अपोलो हॉस्पिटल्स ग्रुप ज्या-ज्या ठिकाणी कार्यरत आहे तिथे संपूर्णतः ऑपरेटिंग इकोसिस्टिम निर्माण करण्यासाठी सतत काम केले आहे. हरयाणा राज्याच्या सर्व कानाकोपऱ्यांमध्ये आधुनिक आरोग्यसेवांचे लाभ पोहोचवण्यासाठी अपोलो हॉस्पिटल्स काम करेल. राज्याच्या आरोग्य धोरण व्हिजनमध्ये सरकारने आखलेली उद्दिष्ट्ये व लक्ष्ये पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला खूप जवळून सहयोग प्रदान करेल.

५.६३ एकर जमिनीवर६५० संभाव्य खाटांच्या क्षमतेसह अपोलो हॉस्पिटल्स सेंटर्स ऑफ एक्सेलेन्सअत्याधुनिक तंत्रज्ञानसब-स्पेशालिटीज आणि आपल्या उपजत क्लिनिकल उत्कृष्टतेमध्ये आपले खऱ्या अर्थाने अनोखे क्लिनिकल प्रोग्राम्स प्रस्तुत करेल. या शहरात राहणाऱ्या लोकांबरोबरीनेच एनसीआर व परदेशातील सर्व लोकांसाठी ही सुविधा खूपच लाभदायक ठरेल.

अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपचे चेअरमन डॉ. प्रताप सी रेड्डी यांनी सांगितले"आमच्यासाठी एक महत्त्वाचे क्षेत्र असलेल्या उत्तर भारतामध्ये अपोलो हॉस्पिटल्सने आपली उपस्थिती अजून जास्त मजबूत केली याचा मला खूप आनंद होत आहे. आमचे स्वागत केल्याबद्दल हरयाणा सरकारचे आम्ही आभारी आहोत. जिथे-जिथे आम्ही कार्यरत आहोत त्या प्रत्येक ठिकाणी सर्वसमावेशक आरोग्यसेवा देण्यासाठी अपोलो हॉस्पिटल्स ग्रुप सतत प्रयत्नशील असतो.  या राज्यामध्ये सर्वसमावेशक आरोग्यसेवा प्रदान करण्यासाठी आणि मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हलमध्ये आघाडीचे राज्य अशी हरयाणाची ओळख निर्माण करण्यासाठी भारतातील सर्वात मोठा डिजिटल आरोग्यसेवा प्लॅटफॉर्म अपोलो २४/७ मार्फत प्रतिबंधात्मक आरोग्यफार्मसीजडे सर्जरी सेंटर्सबर्थिंग सेंटर्सप्राथमिक देखभाल सुविधा आणि डायग्नॉस्टिक्सहोम केयरगेरियाट्रिक केयररिहॅबिलिटेशनअसिस्टेड लिविंग इत्यादी अपोलो हॉस्पिटल्स इकोसिस्टिममधील सर्व घटकांसह लक्षणीय क्लिनिकल परिणामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आम्हाला पक्की खात्री आहे की आमच्या याठिकाणच्या उपस्थितीमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला अजून जास्त प्रोत्साहन मिळेलकुशल व प्रशिक्षित आरोग्यसेवा आणि पूरक नोकऱ्या निर्माण होतील.  नावीन्यपूर्णतेला वाव देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि उत्कृष्टतासंशोधनशिक्षण व उपचार यांचे अतुलनीय वातावरण निर्माण करू. जीवन गुणवत्तेमध्ये आणि हरयाणातील नागरिकांच्या कल्याणामध्ये सुधारणा घडवून आणण्यात लक्षणीय योगदान देण्यासाठी आम्ही सुसज्ज आहोत." 

हा व्यवहार अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेडच्या १००% मालकीची उपकंपनी अपोलो हॉस्पिटल्स नॉर्थ लिमिटेडमार्फत केला गेला असून यासाठी समूहाकडील अतिरिक्त फंड्सचा वापर करण्यात आला आहे.

ही रुग्णालय मालमत्ता विकत घेतल्यामुळे उत्तर भारतामध्ये अपोलो हॉस्पिटल्सच्या स्थानाचा पाया अजून जास्त मजबूत झाला आहे शिवाय सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये अत्याधुनिक क्लिनिकल प्रोग्राम्सतंत्रज्ञानआंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय भागीदारी आणि संशोधन यांना एकत्र आणून आमच्या रुग्णांसाठी श्रेणीतील सर्वोत्तम क्लिनिकल परिणाम प्रदान केले जातीलसमाजाच्या आरोग्य व कल्याणमध्ये सुधारणा होतीलस्थानिक पातळीवर प्रशिक्षितांसाठी नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होतील.

रुग्णालय मालमत्तेच्या विक्रीसाठी आवश्यक असलेल्या सर्व मंजुऱ्या कर्जदारसमभागधारक व न्यायालयाकडून घेण्यात आल्या होत्या त्यामुळे अपोलो हॉस्पिटल्सला गुरुग्राममधील रुग्णालयाची विक्री नियमानुसार पार पडलेली आहे.

ऍटलास लॉ पार्टनर्सने या व्यवहारामध्ये अपोलो हॉस्पिटल्स नॉर्थ लिमिटेडचे कायदा सल्लागार म्हणून काम पाहिले तर मेसर्स नयती हेल्थकेयर व रिसर्च एनसीआर प्रायव्हेट लिमिटेडचे कौन्सेल ऍडव्होकेट श्री. गिरीराज सुब्रमणियम हे होते.      

No comments:

Post a Comment