~ वाशीतील नवे नेत्र रुग्णालय हे एएसजीचे मुंबई महानगर क्षेत्रातील दुसरे आणि महाराष्ट्रातील सहावे रुग्णालय आहे. ~
नवी मुंबई, ६ डिसेंबर २०२२: भारतातील आघाडीची नेत्र रुग्णालय शृंखला, एएसजी आय हॉस्पिटल्सने (एएसजी) नवी मुंबईत वाशीमध्ये आपले नवे नेत्र रुग्णालय सुरु केले आहे. हे नवे सुपर स्पेशालिटी नेत्र रुग्णालय मुंबई महानगर क्षेत्रातील एएसजीचे दुसरे आणि महाराष्ट्रातील सहावे रुग्णालय आहे. अनुभवी नेत्रचिकित्सक याठिकाणी नेमण्यात आले असून, डोळ्यांमधील साध्या त्रासांपासून ते मोठ्या, गंभीर आणि किचकट विकार व आजारांपर्यंत सर्वांवर अत्याधुनिक पद्धतीने निदान व सर्वसमावेशक उपचार केले जावेत यासाठी या रुग्णालयामध्ये अत्याधुनिक पायाभूत सोयीसुविधा आणि सर्वोत्तम वैद्यकीय तंत्रज्ञान उपलब्ध करवून देण्यात आले आहे. वाशीमध्ये सेक्टर १७ मध्ये मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या रुग्णालयामध्ये डोळ्यांवरील आघातांवर तातडीने उपचारांसाठी संपूर्ण दिवसभर उपलब्ध असलेल्या इमर्जन्सी सेवा आणि २४X७ नेत्रपेढी सुविधा दिल्या जात आहेत. देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये सुरु करण्यात आलेल्या या नव्या रुग्णालयामुळे भारत, युगांडा आणि नेपाळ या देशांमधील १६ राज्यांमध्ये एएसजी आय हॉस्पिटल्सच्या नेटवर्क मधील रुग्णालयांची संख्या ५५च्या वर पोहोचली आहे.
एएसजी आय हॉस्पिटल्स, वाशी (नवी मुंबई) चे वैद्यकीय संचालक डॉ. पवन लोहिया म्हणाले, "नवी मुंबईची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे अनेक नेत्र समस्या आणि आजार होत आहेत. वाशीतील नव्या हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे सर्वोत्तम डॉक्टर्स आणि अत्याधुनिक नेत्रचिकित्सा तंत्रज्ञान यांचा मिलाप घडून आल्यामुळे वाशी आणि नवी मुंबईतील रहिवाशांना जागतिक दर्जाची सर्वसमावेशक नेत्रचिकित्सा सेवा उपलब्ध होईल. डोळ्यांच्या सर्व समस्यांवर तातडीने प्रभावी उपचार सेवा उपलब्ध व्हाव्यात जेणेकरून डोळ्यांचे गंभीर आजार टाळले जावेत हे आमचे उद्दिष्ट पूर्ण करण्यामध्ये या रुग्णालयाचे खूप मोठे योगदान असणार आहे."
वाशीतील नव्या रुग्णालयामध्ये प्रगत तंत्रज्ञान आणि रोगनिदान उपकरणांचा वापर करून सर्वसमावेशक सेवा पुरवल्या जातील, यामध्ये कॉर्नियल (Corneal) विकारांवरील उपचारांचा, कॉर्नियल (Corneal) प्रत्यारोपण आणि केराटोकोनससाठी (keratoconus) C3R थेरपी, ओलोजेन (Ologen) असिस्टेड फिल्टरिंग सर्जरीसहित संपूर्ण ग्लॉकोमा व्यवस्थापन, इंट्रा ऑक्युलर प्रेशर कमी करण्यासाठी ग्लॉकोमा व्हॉल्व यांचा समावेश आहे. प्रगत फॅको (Phaco) यंत्रणा आणि आधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सिस्टिम, रेटिनल लेजर/अँटी व्हीईजीएफ (VEGF ) औषधांचा आणि स्यूटयूरलेस २३/२५ G व्हिट्रेक्टॉमी Vitrectomy उपचारांचा वापर करून सर्वात आधुनिक डायबेटिक रेटिनोपॅथी मॅनेजमेंट, व्हिट्रेक्टॉमी (Vitrectomy) प्रक्रिया आणि न्यूमॅटिक रेटिनोपेक्सी (pneumatic retinopexy) प्रक्रिया याठिकाणी उपलब्ध आहेत. अत्याधुनिक फोर्निक्स (fornix) पद्धतीसह नॉन-सर्जिकल व सर्जिकल उपचारांचे सर्वात आधुनिक स्क्विन्ट व्यवस्थापन पर्याय या रुग्णालयात उपलब्ध आहेत. अँब्लिओपिया (Amblyopia), ज्याला लेझी आय असे देखील म्हणतात, ज्यामुळे स्क्विन्ट आणि इतर समस्या होतात, या विकारावर देखील विविध उपचार पर्याय उपलब्ध आहेत. या हॉस्पिटलमध्ये क्यू-लेसिक (Q-Lasik) हे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे, ज्याच्या साहाय्याने चष्मा व कॉन्टॅक्ट लेन्सेसपासून कायमस्वरूपी सुटका मिळवता येते.
एएसजी आय हॉस्पिटल्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ अरुण सिंघवी यांनी सांगितले, "वाशीमध्ये नवे ग्रीनफील्ड आय हॉस्पिटल सुरु करून विस्तारावर भर देण्याचे धोरण आम्ही कायम ठेवले आहे. सुपर-स्पेशालिटी नेत्रचिकित्सा हॉस्पिटल्सची शृंखला संपूर्ण देशभरात उभारून छोट्यातल्या छोट्या शहरांमध्ये, अंतर्गत भागांमध्ये सर्वोत्तम नेत्र देखभाल देऊन रुग्णांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करवून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. याला अनुसरून आम्ही भागीदारी मॉडेलमार्फत ग्रीनफील्ड सुविधांमध्ये आणि ब्राऊनफील्ड अधिग्रहणांमध्ये गुंतवणुकीसह आम्ही धोरणात्मक वाटचाल करत आहोत."
No comments:
Post a Comment