Wednesday, 8 November 2023

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील नर्सेसनी स्तनांच्या आरोग्यविषयी जागरूकता अभियानामध्ये आदर्श कामगिरी बजावली



कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने स्तनांच्या आरोग्यविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठीच्या अभिनव अभियनामार्फत लवकरात लवकर आजार निदानाचे महत्त्व पटवून दिले

मुंबई नोव्हेंबर २०२३:  कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलनवी मुंबईने स्तन आरोग्य जागरूकता हे परिवर्तनात्मक अभियान चालवून समाजासाठी राबवल्या जाणाऱ्या आरोग्य उपक्रमांमध्ये प्रगत भरारी घेतली आहेयावेळी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या नर्सिंग टीमने सादर केलेली अनोखी नाटिका संपूर्ण उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरलीया नाटिकेमध्ये स्वयं-परीक्षणाची तंत्रे दाखवण्यात आलीतसेच कॅन्सरचे लवकरात लवकर निदान केले जाणे रुग्णाचा जीव वाचवला जाण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित करण्यात आलेही नाटिका पाहणाऱ्यांसोबत समोरासमोर संवाद आणि प्रतिसादांची देवाणघेवाण यांचा देखील समावेश यामध्ये असल्याने उपस्थितांना स्वयं परीक्षण प्रक्रिया संपूर्णपणे समजून घेण्यात मदत मिळाली.    

५ नोव्हेंबर २०२३ रोजी अतिशय माहितीपूर्ण अशा या उपक्रमात कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या स्पेशलिस्ट्ससह ७० पेक्षा जास्त जणांनी भाग घेतला होता. तज्ञांमध्ये सर्जिकल ऑन्कोलॉजीचे कन्सल्टन्ट डॉ तुषार जाधवमेडिकल ऑन्कोलॉजीचे कन्सल्टन्ट डॉ पुष्पक चिरमाडेऑब्स्टेट्रिक्स आणि गायनॅकॉलॉजीच्या कन्सल्टन्ट डॉ बंदिता सिन्हाऑब्स्टेट्रिक्स आणि गायनॅकॉलॉजीच्या कन्सल्टन्ट डॉ रेणुका बोरिसा आणि डाएटिशियन कन्सल्टन्ट श्रीमती प्रतीक्षा कदम यांचा समावेश होतासंवादात्मक सत्रांमध्ये त्यांनी आपले माहितीपूर्ण विचार मांडलेस्तनांमधील विकार लवकरात लवकर लक्षात येण्यासाठी नियमितपणे स्वयं परीक्षण करत राहणे महत्त्वाचे असल्याचे या सत्रांमध्ये अधोरेखित करण्यात आले.

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलनवी मुंबईचे डायरेक्टर आणि हेड डॉ बिपीन चेवले यांनी सांगितले"स्तनाचा कॅन्सर लवकरात लवकर ओळखला जाणे महत्त्वाचे असल्याबाबत जागरूकता निर्माण करण्याची आमची वचनबद्धता दृढ आहेआमच्या हॉस्पिटलकडून राबवले जाणारे अनेक उपक्रम स्तनाच्या कॅन्सरवर विजय मिळवण्याचा आमचा सामूहिक निर्धार दर्शवतातआमचा ठाम विश्वास आहे की ज्ञान ही सशक्तीकरणाची पहिली पायरी आहेया प्रयत्नांद्वारे आम्ही महिलांना त्यांचे स्तनाचे आरोग्य व्यवस्थित राखले जावे यासाठी सक्रिय होण्यात सक्षम बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोतकारण आजार लवकरात लवकर ओळखला गेल्यास जीव वाचण्याची शक्यता असते."

कॅन्सर रिबनच्या आकारात मानवी साखळी निर्माण करण्यात आली जी या उपक्रमाचे एक ठळक वैशिष्ट्य ठरलीस्तनाच्या कॅन्सरवर विजय मिळवण्याचा सामूहिक निर्धार दर्शवण्यासाठी त्याचे प्रतीक म्हणून आकाशात गुलाबी फुगे सोडण्यात आलेविविध कॉर्पोरेट्सनिवासी सोसायट्या आणि कम्युनिटी सेंटर्समध्ये विशेष माहितीपूर्ण सत्रांचे आयोजन करून कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने या उपक्रमाची व्याप्ती वाढवतआपला आरोग्य उपक्रम संपूर्ण समाजापर्यंत पोहोचवला आहे.

स्तनाच्या कर्करोगाच्या विरोधातील लढा पुढे देखील चालू ठेवला जाईल या प्रतिज्ञेचे प्रतीक म्हणून अभियानाच्या सांगता प्रसंगी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या संपूर्ण दर्शनी भागावर गुलाबी लाईट्स सोडण्यात आले होते.

No comments:

Post a Comment