Sunday, 7 January 2024

५५ वा महाराष्ट्र राज्य पुरस्कार विजेता 'कॉपी' चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर

मुंबई: दहावी बारावीच्या मुलांना उघडउघड कॉपी करण्यास मुभा देणाऱ्या आज कित्येक शाळा अस्तित्वात असून त्यावर खूप दुर्मिळ बोललं जातं. परंतु दयासागर वानखेडे आणि हेमंत धबडे या लेखक दिग्दर्शकाच्या जोडीने कॉपी या चित्रपटातून या दुर्मिळ भाष्याला छेद देऊन समाजासमोर एक अत्यंत गंभीर प्रश्न उभा केला आहे. चित्रपटाचा ८  जानेवारी २०२४  रोजी अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार असून चित्रपट प्रेक्षकांचं चित्त वेधून घेणार आहे.

कॉपी हा चित्रपट ५५ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट पदार्पण१० व्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट बाल कलाकार आणि इतर अनेक नामांकित चित्रपट महोत्सवात पुरस्कृत झाला आहे. लोकप्रिय अभिनेते मिलिंद शिंदेअंशुमन विचारे,  कमलेश सावंतअनिल नगरकरजगन्नाथ निवांगुणेविपुल साळुंखेराहुल बेलापूरकरआशुतोष वाडकरपूनम राणेसौरभ सुतारप्रवीण कापडेरवी विरकरश्रद्धा सावंत या कलाकारांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. दया प्रभाआश्रू वानखेडे आणि हेमंतकुमार धाबडे या त्रिकुटाने कॉपीचे दिग्दर्शन केले आहे.

चित्रपटाच्या कथेतून ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापनाकडून होणाऱ्या भ्रष्टाचाराचा उलगडा केला आहे. शिवाप्रकाश आणि प्रिया एका खेड्यात राहत असून अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेत आहेत. एकीकडे शाळेतील इतर मुले कॉपी करून परीक्षा देत आहेत तर दुसरीकडे कित्येक मैल चालत येऊन हे गरीब त्रिकुट प्रामाणिकपणे परीक्षा देत आहे. पण त्याचवेळी शिक्षण अधिकारी कॉपीचे दृश्य बघून शाळा बंद करण्याचे आदेश देतो. चित्रपटाच्या या वळणावर मूळ कथानक सुरू होऊन पुढे काय घडते हे चित्रपटात पहायला मिळणार आहे.  

प्रत्येक मुलाचा जन्मसिद्ध हक्क असणारा शिक्षण हा अतिशय संवेदनशील आणि महत्वपूर्ण विषय कॉपी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवताना आम्हाला अभिमानास्पद भावना आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री.सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी :- https://www.ultrajhakaas.com/marathi-movies

No comments:

Post a Comment