Monday 14 October 2024

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबईने अत्याधुनिक फिजिकल रिहॅबिलिटेशन सेंटर सुरु केले

रुग्णांसाठी क्रिटिकल केयर 

रिहॅबिलिटेशन सेवांचा विस्तार

नवी मुंबई14 ऑक्टोबर 2024: कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलनवी मुंबईने रुग्णांची काळजी घेणारे अत्याधुनिक फिजिकल रिहॅबिलिटेशन सेंटर सुरु केले आहे. ब्रेन स्ट्रोकरस्त्यावरील दुर्घटनाकार्डियाक आजारांतून रिकव्हर होत असलेल्या रुग्णांना मदत करणे या सेंटरचा उद्देश आहे. कोणत्याही रुग्णाच्या रिकव्हरी दरम्यान रिहॅबिलिटेशनच्या भूमिकेचे महत्त्व या सेंटरने अधोरेखित केले आहे. नवीन सेंटरमध्ये प्रगत तंत्रज्ञान आणि नवीन थेरपीज आणल्या आहेतज्यामध्ये अनवेइंग सिस्टीम देखील आहे जी मॅन्युअल हँडलिंग आणि पडण्याचा धोका कमी करतेउपचारांची कार्यक्षमता वाढवतेतसेच थेरपिस्ट एर्गोनॉमिक्सला प्राधान्य देते.

हॉस्पिटलमध्ये रिहॅबिलिटेशनमध्ये उपयोगात आणल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये अनवेइंग सिस्टीम आहेजी पडणे कमी करतेस्थिरतेसाठी यामध्ये बॅलन्स ट्रेनर आणि फंक्शनल व्यायामासाठी रोबोटिक ट्रेनर असतो. दुसरी टूल्स जसे कीमोटराइज्ड पॅरलल बार आणि टिल्ट टेबल चालण्यात आणि अपराईट पोझिशनिंगमध्ये मदद करतात,एडीएल थेरपी दैनंदिन कामे करण्याला प्रोत्सहन देतेपीडियाट्रिक रिहॅब सेरेब्रल पाल्सी सारख्या परिस्थितींमध्ये मदत करते आणि शॉकवेव थेरपी प्लांटर फॅसिटीससारख्या समस्यांमध्ये होणाऱ्या वेदना शमवण्यात मदत करते.

 

नवीन सेंटरमधील सर्वसमावेशक रिहॅबिलिटेशन सेवा अनेक प्रकारच्या आजारांमध्ये सहायक ठरतातज्यामध्ये स्ट्रोक रिकव्हरीकार्डियाक रिहॅबिलिटेशनऑर्थोपेडिक समस्याब्रेन आणि स्पायनल कॉर्डला होणाऱ्या दुखापती आणि खेळांदरम्यान होणाऱ्या दुखापती यांचा समावेश आहे. महिलांच्या आरोग्यासाठी विशेष देखभालऑपरेशननंतर ऑन्कोलॉजी फिजिओथेरपी आणि पीडियाट्रिक रिहॅबिलिटेशन यामुळे सर्व रुग्णांना व्यक्तिगत आणि उच्च श्रेणीची देखभाल मिळते. रिहॅबिलिटेशनला आरोग्य देखभालीचा "चौथा स्तंभ" मानले जाते. आणीबाणीची परिस्थितीआपत्ती आणि आजारांच्या काळात रिहॅबिलिटेशन सेवा उपलब्ध होणे किती महत्त्वाचे आहे ते समजते. 

फिजिकल रिहॅबिलिटेशन सेंटरच्या उदघाटन प्रसंगीकोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे फिजिकल मेडिसिन आणि रिहॅबिलिटेशनचे हेड आणि डायरेक्टर डॉ अभिषेक श्रीवास्तव यांनी सांगितले"आपल्या देशात अशा प्रकारच्या रिहॅबिलिटेशन आणि पेशंट केयर सेवांची आवश्यकता वाढत आहे. रिहॅबिलिटेशन रुग्णांच्या रिकव्हरीमध्ये मदत करते आणि त्यांना दीर्घआनंदीसक्रिय व गुणवत्तापूर्ण जीवन जगण्यात सक्षम बनवते. हे नवे सेंटर लोकांना त्यांचे आयुष्य पुन्हा उभे करण्यात आणि आरोग्याचे जास्तीत जास्त चांगले परिणाम मिळवण्यात मदत करण्यासाठी समर्पित आहे."

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या सिनियर फिजिओथेरपिस्ट डॉ दीपिका तावडे (PT), यांनी सांगितले, "रिहॅबिलिटेशन हा युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेजचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि सर्वांसाठी निरोगी जीवन सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. नवीन सेंटरची घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होत आहेहे सेंटर रुग्णांचे आरोग्य आणि कल्याण यावर सार्थक प्रभाव निर्माण करण्यासाठी काम करेल."

रुग्णांना जोखमीच्या परिस्थितींमधून रिकव्हर होण्यात आणि आपले स्वातंत्र्य पुन्हा मिळवण्यातजीवन गुणवत्तेमध्ये लक्षणीय सुधारणा घडवून आणण्यात मदतीसाठी हे नवीन सेंटर दर्जेदारविशेष रिहॅबिलिटेशन सेवा उपलब्ध करवून देईल.

No comments:

Post a Comment