Friday, 3 January 2025

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक CAR-T थेरपीने रुग्णाला आक्रमक रिलॅप्स्ड लिम्फोमातून पूर्णपणे बरे केले

3९ वर्षाचे रिजेश यांच्यासाठी अत्याधुनिक CAR-T उपचारांमुळे २०२४ हे वर्ष नवीन आशेने समाप्त झाले आणि कॅन्सर मुक्त होऊन त्यांनी २०२५ चे स्वागत केले

 

नवी मुंबई03 जानेवारी2025युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेमध्ये आपल्या करियरच्या शिखरावर असलेले कॉर्पोरेट प्रोफेशनल३९ वर्षांचे रिजेश आणि त्यांच्या कुटुंबियांना आक्रमक लिम्फोमाच्या रिलॅप्सने खूप मोठा धक्का दिलाहा लिम्फोमा पारंपरिक उपचारांना प्रतिरोधक असल्याने हे सगळेच अतिशय निराश झाले होतेपण कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलनवी मुंबईमध्ये अभिनव CAR-T थेरपीने रिजेशना कॅन्सरपासून पूर्णपणे मुक्ती मिळवून दिली आणि त्यांचा जीव वाचवला.

ऑक्टोबर २०२३ मध्ये समजले की रिजेशना डिफ्युज लार्ज बी-सेल लिम्फोमा (डीएलबीसीएलझाला होताहा नॉन-हॉजकिन लिम्फोमा (एनएचएलच्या सर्वात सामान्य प्रकारांपैकी एक आहेत्यांच्यावर स्टॅन्डर्ड फर्स्ट-लाईन उपचार केले गेलेयामध्ये आर-सीएचओपी (R-CHOP) केमोथेरपीचा देखील समावेश होतायामध्ये सीएनएसमध्ये कॅन्सर पेशींना टार्गेट करण्यासाठी मेथोट्रेक्सेट थेट मणक्याच्या हाडाच्या फ्लुइडमध्ये दिले गेलेया उपचाराने सुरुवातीला काही आशाजनक परिणाम दाखवले पण दुर्दैवाने जून २०२४ मध्ये कॅन्सरने पुन्हा फणा वर काढला.

यावेळी या आजाराने अजून जास्त दुर्मिळ आणि आक्रमक स्वरूप धारण केले होते - हाय-ग्रेड डबल-हिट लिम्फोमायामधल्या आनुवंशिक असामान्यता असल्यामुळे हे स्टॅन्डर्ड उपचारांना प्रतिरोधक बनतेआजार जेव्हा दुसऱ्यांदा वर आला तेव्हा त्यामध्ये अजूनच गुंतागुंत निर्माण झालेली होती कारण लिम्फोमा मेंदू आणि मणक्याच्या हाडांपर्यंत पोहोचलेला होताआता हा आजार उपचारांसाठी एक सर्वात कठीण कॅन्सर बनलेला होतातेव्हा रिजेश कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलनवी मुंबईमध्ये हेमेटॉलॉजिस्ट आणि हेमेटो-ऑन्कोलॉजिस्टकन्सल्टन्ट बीएमटी आणि सेल्युलर थेरपी (सीएआर-टीडॉ कुणाल गोयल यांच्याकडे उपचारांसाठी आले.

रिजेश यांच्यावर अतिशय काटेकोरपणे बहु-आयामी उपचार सुरु करण्यात आलेयामध्ये हाय-डोस मेथोट्रेक्सेटवर आधारित केमोथेरपी (MTR), CNS बूस्टसोबत संपूर्ण ब्रेनची रेडिओथेरपी (WBRT) आणि एक टार्गेटेड थेरपी एकलाब्रुटिनिब यांचा समावेश होता. MTR ला ब्लड ब्रेन बॅरियर भेदण्यासाठी आणि सेंट्रल नर्व्हस सिस्टिममध्ये लिम्फोमा पेशींना टार्गेट करण्यासाठी डिझाईन करण्यात आले होते. WBRT चा उपयोग संपूर्ण मेंदूमध्ये रेडिएशन पोहोचवण्यासाठी करण्यात आला होतातर "बूस्टने अशा विशिष्ट भागांवर अतिरिक्त रेडिएशन केंद्रित केले जिथे कॅन्सर होताइतके सगळे प्रयत्न करून देखील लिम्फोमा तसाच राहिला आणि मग टीमने एक दुसरा दृष्टिकोन अवलंबिण्याचा निर्णय घेतलाया निर्णयाने आधुनिक वैद्यकशास्त्राच्या सीमा रुंदावल्या.

डॉ कुणाल गोयल यांनी (कैमेरिक अँटीजेन रिसेप्टर टी-सेल थेरपी) Chimeric Antigen Receptor T-cell किंवा CAR-T थेरपीचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला. CAR-T एक प्रगत इम्युनोथेरपी आहेयामध्ये कॅन्सर पेशी ओळखून नष्ट करण्यासाठी रुग्णाच्या रोगप्रतिकार पेशींमध्ये बदल केले जातातडॉ कुणाल गोयल यांनी आपल्या निर्णयाविषयी सांगितले"CAR-T थेरपी कॅन्सरच्या उपचारांमध्ये एक नवी क्रांती घेऊन आली आहेज्यांच्यासाठी उपचारांचे इतर पर्याय समाप्त झाले आहेत अशा आक्रमक आणि रिलॅप्स्ड लिम्फोमाच्या रुग्णांसाठी हे खूपच उपयुक्त आहे. CAR-T मध्ये रुग्णांच्या रोगप्रतिकार शक्तीचा उपयोग केला जातोया प्रक्रियेमध्ये रुग्णाच्या टी-पेशींना सहभागी केले जातेया सफेद रक्तपेशी असतातज्या शरीराला संसर्ग आणि आजारांविरोधात लढण्यासाठी मदत करतातप्रयोगशाळेमध्ये या पेशींना कॅन्सर पेशींना टार्गेट करण्यासाठी तयार केले जाते आणि पुन्हा रुग्णाच्या रक्तप्रवाहामध्ये पुन्हा सोडले जाते."

रिजेशच्या टी-पेशी काढून एका विशेष प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्यायाठिकाणी त्यांच्या पृष्ठभागावर कैमेरिक अँटीजेन रिसेप्टर (CAR) हा एक सिंथेटिक रिसेप्टर एक्स्प्रेस करण्यासाठी अनुवांशिक पद्धतीने इंजिनीयर करण्यात आलेया CAR ला लिम्फोमा पेशींच्या पृष्ठभागावर आढळणारे प्रोटीन ओळखण्यासाठी आणि त्याच्याशी जोडले जाण्यासाठी डिझाईन करण्यात आले होते. T-पेशींना CAR सोबत बदलले गेल्यानंतर त्यांना प्रयोगशाळेमध्ये मल्टिप्लाय केले गेले आणि पुन्हा त्यांच्या शरीरातील रक्तप्रवाहामध्ये सोडले गेलेया "री-इंजिनीयर्ड" CAR-T पेशी आता लिम्फोमा पेशींना अचूकपणे टार्गेट करून नष्ट करू शकत होत्या.

१९ नोव्हेंबर २०२४ रोजी रिजेशवर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलनवी मुंबईमध्ये CAR-T थेरपी केली गेली आणि बदलण्यात आलेल्या CAR-T पेशींना त्यांच्या शरीरातील रक्तप्रवाहामध्ये सोडण्यात आलेरिजेशसाठी ही जीव वाचवण्याची शेवटची आणि कदाचित सर्वात चांगली संधी होती. CAR-T थेरपीमुळे घडून आलेला परिणाम हा निव्वळ एक चमत्कार होताएका महिन्यानंतर पीईटी सीटी स्कॅनमध्ये (PET CT scan) समजले की कॅन्सर पूर्णपणे बरा झाला होता आणि रिजेशच्या शरीरामध्ये लिम्फोमा आढळून आला नाही!

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलनवी मुंबईचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ शशिकांत पवार यांनी सांगितले, "कॅन्सर पूर्णपणे बरा होणे ही बाब वैद्यकीय तंत्रज्ञानातील प्रगतीबरोबरीनेच आधुनिक उपचारांची शक्ती देखील दर्शवतेकॅन्सरवरील उपचारांमध्ये CAR-T थेरपी सर्वात आघाडीवर आहे आणि आम्ही प्रयत्न करत आहोत की रिजेशसारख्या रुग्णांना आधुनिक वैद्यकीय प्रगतीचे सर्वात चांगले लाभ मिळावेतजेणेकरून ते सर्वात गंभीर आणि गुंतागुंतीच्या आजारातून बाहेर यावेतया केसने रुग्ण आणि कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईची टीम या दोघांनाही वर्ष २०२४ ला अतिशय आनंदाने निरोप देण्याची संधी दिलीही केस आठवण करून देते कीवैद्यकीय क्षेत्राचे भवितव्य हेच असणार आहे आणि ते उज्वल आहे."

No comments:

Post a Comment