Tuesday, 28 January 2025

अक्षरभारती' भारतीय सुलेखन सौंदर्याचे दर्शन घडविणारे प्रदर्शन आणि पुस्तकाचे अनावरण - महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते

'अक्षरभारती' भारतीय सुलेखन सौंदर्याचे दर्शन घडविणारे प्रदर्शन आणि पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे अनावरण 
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जहागीर आर्ट गॅलरीत करण्यात आले यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, राज्यमंत्री आशीष जैसवाल, नवनीत प्रकाशनचे अनिल गाला,  पद्मश्री अच्युत पालव आणि जहागीर आर्ट गॅलरी च्या मिस मेनन उपस्थित होत्या.
यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, म्हणाले महाराष्ट्र शासनाने अच्युत पालव याना पद्मश्री दिल्याबद्दल मी त्यांचे गौरव करतो, त्यांनी ही कला जोपासली अणि अक्षरकलेला जनसामान्यां पर्यंत पोहोचवले अणि सगळ्यां कलावंताना ह्या पुस्तकाच्या माध्यमातून सामावून घेतल. 
अक्षर लिपि ही आपल्या भारताची खूप प्राचीन आहे. लिपि ही आपल्याला जिवंत ठेवायला मदत करते. आपली ही संस्कृति पुढच्या पिढी पर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे  आणि हे काम पद्मश्री अच्युत पालव खूप चांगल्या प्रकारे करत आहेत.
नवनीत प्रकाशनचे अनिल गाला म्हणाले अच्युत पालव माझ्याकडे पुस्तकांबद्दल म्हणाले लिपि पुढे कशी घेऊन जाऊया त्यावेळी मी म्हणालो आपण प्रयत्न करा मी तुमच्या सोबत आहे 
पद्मश्री अच्युत पालवांनी  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना विनंती केली की,  प्रत्येक मराठी भाषाचे संग्रहालय निर्माण व्हावे, त्यामुळे सगळ्यांना लिपिचे ज्ञान होईल कारण भारत हा जसा शेती प्राधान देश आहे तसा तो लिपि प्रधान ही देश आहे.
'अक्षरभारती' या पुस्तकात प्राचीन ब्राह्मी, खरोष्ठी, ग्रंथी, शारदा, मोडी, अवेस्तन, सिद्धम पासून ते देवनागरी, गुजराती, उर्दू, गुरमुखी, कन्नड, तेलगु, मल्याळम या लिप्यांविषयी कलात्मक आढावा घेण्यात आला असून देशातील ३६ सुलेखनकारांची २३६ अक्षरचित्रे या पुस्तकात आहेत. याशिवाय श्री गणेश देवी, डॉ. संतोष क्षिरसागर, डॉ. बलसेकर, जी.व्ही. श्रीकुमार, नारायण भट्टाथिरी आणि अशोक परब यांचे अभ्यासपर लेख या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत. या पुस्तकाची संकल्पना आणि प्रकाशनाची जबाबदारी श्री अच्युत पालव यांची आहे. यासोबतच काही निवडक चित्रांचं प्रदर्शन जहांगीरच्या कला दालनात मांडण्यात येणार असून २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत रसिकांसाठी खुले राहणार आहे. 
नेहमी लिहील्या जाणार्‍या लिप्यांचं सौंदर्य वेगळ्या आणि मोठ्या प्रमाणात कसं दिसतं हे पाहण्यासाठी रसिकांबरोबरच शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी यावं असं आवाहन सुलेखनकार अच्युत पालव यांनी केलं आहे.
Heena Khopkar - PR
8879144338

No comments:

Post a Comment