Showing posts with label 'एक नंबर'. Show all posts
Showing posts with label 'एक नंबर'. Show all posts

Friday, 8 November 2019

'एक नंबर' स्पर्धेची धमाकेदार अंतिम फेरी!!!!

एक वेगळी आणि आकर्षक संकल्पना घेऊन ऑगस्ट महिन्यात 'झी युवावाहिनीवर 'एक नंबरकार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आलाया 'युवा सिंगर्स'नी अल्पावधीतच सगळ्यांच्या मनात घर केलं आणि 'युवा सिंगर एक नंबरहा कार्यक्रम लोकांचा लाडका झालानिराळी संकल्पना आणि संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिभावान गायकांचा सहभाग असलेली ही स्पर्धा पहिल्या दिवसापासूनच रंगतदार ठरली आहेया चुरशीच्या स्पर्धेची अंतिम फेरी१० नोव्हेंबरला संध्याकाळी  वाजता पाहायला मिळणार आहे.
या महाअंतिम फेरीत एमएचफोक, पूर्वा-पल्लवीदर्शन-दुर्वांकुरजगदीश चव्हाणओंकार कानिटकर आणि अनिमेश ठाकूर हे सहा स्पर्धक आपले सादरीकरण करतीलमनातील धाकधूक आणि उत्सुकताअंतिम फेरीचा ताण अशी संमिश्र भावना असणारे हे सारे स्पर्धक 'एक नंबर'चा 'युवा सिंगरठरण्यासाठी उत्कृष्ट परफॉर्मन्स देताना पाहता येतील
अंतिम फेरीतील स्पर्धकांच्या दमदार सादरीकरणाच्या बरोबरीनेच इत अनेक खास गोष्टी या सोहळ्यात पाहायला मिळणार आहेतकाही विशे पाहुण्यांची उपस्थिती सुद्धा या कार्यक्रमात असणार आहेहे खा अतिथी सोहळ्याची रंगत आणखी वाढवणार आहेत. 'युवा सिंगर'मधील स्पर्धक या मंचावरील आपले शेवटचे गाणे सादर रत असतानाचपरीक्षक सावनी शेंडे सुद्धा आपल्या मधुर आवाजाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेनिवेदिका मृण्मयी देशपांडे हिच्या हातातील सूत्रं काही काळासाठी राधिका पवार हिने आपल्या हाती घेतलेलं असल्याचं सुद्धा या सोहळ्यात पाहायला मिळेलस्पर्धेतील या गुणी गायिकेला एका नव्या भूमिकेत पाहता येईलमंचावर वेगवेगळे गेटअप घेऊन अवतरणारा 'मूर्ती लहान पण कीर्ती महानअसलेला ओंकार कानिटकरआपले गाणे सादर करून झाल्यावर मुख्यमंत्री पदावर दावा सांगताना पाहता येणार आहे.

एकूणच 'युवा सिंगरस्पर्धेची ही अंतिम फेरी, 'एक नंबरमनोरंजन घेऊन येणार आहेरविवार१० नोव्हेंबर रोजी हा धमाकेदार सोहळा पाहायला विसरू नकासंध्याकाळी  वाजताफक्त आपल्या लाडक्या 'झी युवावाहिनीवर!!!!!

Thursday, 12 September 2019

गणेशोत्सवाचा 'एक नंबर' उत्साह!!

गणेशोत्सव हा उत्साहाचा आणि आनंदाचा सोहळा असतो. आपल्या घरी बाप्पाचे आगमन व्हावे, त्याचे वास्तव्य आपल्या घरी असावे ही अनेकांची इच्छा असते. मग, 'झी युवा' वाहिनीवरील 'युवा सिंगर एक नंबर' या गाण्याच्या कार्यक्रमाचे कुटुंब यात मागे कसे असेल!! या स्पर्धेच्या सेटवर सुद्धा गणेशोत्सवाचा प्रसन्न आणि उत्साहपूर्ण माहोल होता. अवघ्या काही अवधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या स्पर्धकांनी, गणपती बाप्पाची गाणी सादर करत गणेश चतुर्थी साजरी केली. परीक्षक वैभव मांगले आणि सावनी शेंडे, यांच्या बरोबरीने निवेदिका मृण्मयी देशपांडे यांची सुंदर वेशभूषा या सर्व आनंदमयी वातावरणाला साजेशी होती. आपल्या उत्तम सादरीकरणाने हे जल्लोषाचे वातावरण स्पर्धकांनी आणखीन फुलवले. विशाल सिंग आणि जगदीश चव्हाण या स्पर्धकांनी सर्वोत्तम गाणी सादर करत, परिक्षकांकडून मानाचा ब्लास्ट मिळवला. त्यांच्यासाठी ही आनंदाची पर्वणी फारच मोठी ठरली. सूरताल यांच्या स्पर्धेच्या या सेटवर आणखी एक स्पर्धा सुद्धा या निमित्ताने रंगली. वैभव आणि मृण्मयी यांनी चक्क स्पर्धकांची भूमिका बजावली. बाप्पासाठी मोदक बनवण्याच्या या स्पर्धेचे परीक्षण सावनीने केले. सावनीने, वैभवला या गमतीदार स्पर्धेचा विजेता घोषित केले. सेटवरील सर्वांनीच या सर्व हलक्याफुलक्या आणि मजेशीर वातावरणात गणेशोत्सव साजरा केला. अर्थात, 'युवा सिंगर' च्या सेटवर नेहमीच अशी धमाल आणि मजा सुरू असते. ही गम्मत अनुभवण्यासाठी पाहत रहा, 'युवा सिंगर एक नंबर', बुधवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता, फक्त आपल्या लाडक्या 'झी युवा' वर!!

Friday, 16 August 2019

'एक नंबर' स्पर्धेच्या माध्यमातून होतकरू स्पर्धकांना मिळणार मदतीचा हात !!!

'झी युवावाहिनीवरील 'युवा सिंगर एक नंबरया नव्याकोऱ्या कार्यक्रमाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांच्या मनात घर केले आहेया कार्यक्रमाची एक नवी आणि हटकेसंकल्पना हे या लोकप्रियतेचे मुख्य कारण आहेस्पर्धकांसाठी वयाचे आणि संख्येचे कुठलेही बंधन नसणेहा या संकल्पनेतील एक महत्त्वाचा मुद्दा आहेयाशिवाय,स्पर्धकांमधील होतकरू तरुणांना करण्यात येणार असलेली आर्थिक मदत हीदेखील या कार्यक्रमाची एक खासियत आहेया आर्थिक मदतीचा लाभ घेतलेला स्पर्धक,कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागात पाहायला मिळाला.
परभणीहून आलेल्या शुभम म्हस्के याने आपल्या अप्रतिम सादरीकरणातून परीक्षकांची मने जिंकलीआर्थिक स्थिती हलाखीची असल्याने त्याला त्याचे शिक्षण सुद्धा पूर्ण करताआलेले नाहीअर्थातचगाण्याचे शास्त्रोक्त शिक्षण घेणे सुद्धा त्याला शक्य झालेले नाहीअसे असूनहीगुणवत्तेच्या जोरावर त्याने आपल्यातील गाणे जोपासले आहेउत्तमआवाज आणि त्याला चांगल्या सादरीकरणाची जोड याच्या जोरावर त्याने परीक्षकांना प्रभावित केलेत्याच्या प्रभावशाली कामगिरीनंतरकार्यक्रमाच्या नियमानुसार, 'एक लाखरुपयांची आर्थिक मदत स्वीकारून हा मंच सोडणेकिंवा 'मानाच्या 'गुरुकिल्ली'चा स्वीकार करूनआपली वाटचाल पुढे सुरु ठेवणेअसे दोन पर्याय त्याच्यासमोर ठेवण्यात आले.वेगवेगळे ऑर्केस्ट्रा  कार्यक्रमांमध्ये गाणे सादर करत आपला चरितार्थ चालवणाऱ्या शुभम म्हस्के यानेआर्थिक मदतीचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतलाएक लाख रुपयांचाधनादेश शुभमने स्वीकारलात्यावेळी त्याची आईदेखील मंचावर उपस्थित होतीयाआधी कुठल्याही कार्यक्रमात हा पर्याय देम्यात आलेला नाही. 'युवा सिंगर एक नंबर'मधीलहा पैलू कौतुकास्पद ठरतो
आज परिस्थितीपुढे झुकतआर्थिक मदत स्वीकारण्याचा निर्णय शुभमने घेतला असलातरीहीपुढच्या दोन वर्षांत त्याने पुन्हा एकदा या मंचाचा भाग होण्याची संधी मिळवावीअशी अपेक्षा वैभव मांगले यांनी व्यक्त केलीएवढेच नाहीतर शुभमला तशी शपथ घेण्यास भाग पाडलेआर्थिक साहाय्य आणि परीक्षकांच्या आशीर्वादाचे पाठबळ घेऊन, 'एकाडोळ्यात आसू  एका डोळ्यात हसूठेवतशुभम म्हस्के याने 'युवा सिंगर'चा मंच सोडला.  

Friday, 9 August 2019

प्रेक्षकांना पाहायला मिळणार 'एक नंबर' कार्यक्रम!!!

छोट्याशा विश्रामानंतर झी युवा वाहिनीवर पुन्हा एकदा कथाबाह्य कार्यक्रमांची मेजवानी सुरु झाली आहे. 'युवा सिंगर एक नंबर' हा नवाकोरा आणि थोडा निराळा कार्यक्रम नुकताच सुरु झाला आहे. बुधवार, ७ ऑगस्ट रोजी पहिला भाग प्रसारित झाला आहे. वैभव मांगले आणि सावनी शेंडे या कार्यक्रमात परीक्षकांच्या भूमिकेत आहेत. अष्टपैलू अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत पाहायला मिळेल. स्पर्धकांसाठी वयाचे कुठलेही बंधन नसलेल्या या स्पर्धेत १६ गायक पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून विविध वयोगटातील स्पर्धक यात सहभागी झाले आहेत. परीक्षण करतांना दोन्ही परीक्षकांचा नक्कीच कस लागणार आहे. एक वेगळी संकल्पना घेऊन आलेला हा कार्यक्रम, संगीत क्षेत्रातील स्पर्धांना मिळालेल्या एका कलाटणीची नांदी ठरू शकतो.
पहिलाच भाग अगदी दणक्यात पार पडला. स्पर्धकांनी सादर केलेल्या गाण्यांवर वैभव मांगले व मृण्मयी देशपांडे हेदेखील थिरकतांना पाहायला मिळाले. सर्वच स्पर्धकांचे उत्तम सादरीकरण पहिल्या भागात पाहायला मिळाले. या कार्यक्रमाची संकल्पना, संगीतातील उत्तम प्रतिभा आणि आर्थिक परिस्थिती यांची सांगड घालणारी असणार आहे. प्रतिभावान परंतु गरजू असणाऱ्या व्यक्तींना एक लाख रुपयांची आर्थिक मदत देऊ केली जाणार आहे. स्पर्धेचा भाग होऊन, आपली प्रतिभा सादर करत राहणे किंवा ती आर्थिक मदत स्वीकारणे, असे दोन पर्याय या गायकापुढे असतील. आर्थिक मदत स्वीकारणाऱ्या कलाकाराला, पुढील स्पर्धेचा भाग होता येणार नाही. ही आर्थिक मदत स्वीकारणारा एक स्पर्धक सुद्धा पहिल्या भागात पाहायला मिळाला. याशिवाय प्रत्येक स्पर्धकाला एक विशिष्ट रक्कम  देण्यात येईल. ही रक्कम जतन करण्याचे काम सुद्धा स्पर्धकांना आपल्या प्रतिभेच्या माध्यमातून करायचे आहे. प्रत्येक आठवड्याच्या शेवटी सर्वोत्तम स्पर्धकासह, सर्वांत कमी ठरलेल्या स्पर्धकाचे नावही जाहीर करण्यात येईल. आठवड्यातील सर्वांत कमी दर्जाचे सादरीकरण करणाऱ्या स्पर्धकाच्या खात्यातील पैसे सर्वोत्तम स्पर्धकाला मिळतील. त्यामुळेच आपल्याला मिळालेली रक्कम टिकवून ठेवणे सुद्धा स्पर्धकांच्या हातात असेल. उत्तम सादरीकरण करणाऱ्या स्पर्धकाला त्याचा फायदा निश्चितपणे मिळेल. पूर्णपणे नव्या संकल्पनेसह सुरु झालेला या कार्यक्रम संगीत क्षेत्रातील स्पर्धांचा चेहरामोहरा बदलणारा ठरेल.
झी युवावरील मालिकांमधील कलाकारांनीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आवडत्या गाण्याचे व्हिडिओ तयार करून या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत.
हा आगळावेगळा कार्यक्रम बघायला, तुम्हीही विसरू नका, बुधवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता, आपल्या लाडक्या झी युवा वाहिनीवर!!! 

Wednesday, 31 July 2019

मृण्मयी देशपांडे करणार 'एक नंबर' सूत्रसंचालन!!!

'युवा सिंगरएक नंबरया कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या 'एक नंबरगोष्टी पाहण्याची प्रेक्षकांना संधी मिळणार आहे. 'झी युवा'वरील या गाण्याच्या स्पर्धेतगायिका सावनी शेंडेसह अभिनेतावैभव मांगले हे परीक्षकाच्या खुर्चीत बसलेले पाहायला मिळतीलया कार्यक्रमाची संकल्पना सुद्धा फार निराळी आणि आगळीवेगळी असणार आहेमहाराष्ट्रातील निरनिराळ्या भागातून आलेल्यातरुण गायकांची ही स्पर्धा नेमकी कशी असेलहे पहिला एपिसोड पाहिल्यावरच प्रेक्षकांना कळणार आहेसंकल्पना गुलदस्त्यात असलीतरीही या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका कोण आहेहे जाणूनघेताना रसिकांना नक्कीच आनंद होईलसर्वांची लाडकी अभिनेत्रीमृण्मयी देशपांडे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेया गुणी अभिनेत्रीला सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहण्याची संधी 'युवासिंगरएक नंबरया कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळेल.
मालिका किंवा चित्रपटांमध्ये अभिनय करण्यापेक्षासूत्रसंचालन अधिक आव्हानात्मक असतेहे मृण्मयी आवर्जून नमूद करतेप्रेक्षकस्पर्धक आणि परीक्षक यांच्यातील दुवा साधण्याची कलाअवगत असणे यासाठी गरजेचे असतेतिच्या सूत्रसंचलनाची पद्धतस्वाभाविक शैलीस्पर्धकांना तिच्याकडून मिळणारे प्रोत्साहन यामुळे कार्यक्रमाची रंगत आणखी वाढणार आहेही भूमिका उत्तमतर्हेने पार पाडण्यासाठी  'युवा सिंगर्स'च्या मंचावर 'एक नंबरधुमाकूळ घालण्यासाठी ही अभिनेत्री सज्ज आहेही गुणी अभिनेत्री बऱ्याच कालावधीनंतर सूत्रसंचालनाच्या भूमिकेत आपल्याला  झीयुवावरील युवा सिंगर एक नंबर या कार्यक्रमाच्या माध्यमातुन बुधवार ते शुक्रवार रात्री  वाजता भेटायला येईलवैभव मांगलेसावनी शेंडे आणि मृण्मयी देशपांडे यांचा सहभाग असलेल्या याकार्यक्रमाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता आता आणखी वाढली आहे.