'झी युवा' वाहिनीवरील 'युवा सिंगर एक नंबर' या नव्याकोऱ्या कार्यक्रमाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या कार्यक्रमाची एक नवी आणि हटकेसंकल्पना हे या लोकप्रियतेचे मुख्य कारण आहे. स्पर्धकांसाठी वयाचे आणि संख्येचे कुठलेही बंधन नसणे, हा या संकल्पनेतील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. याशिवाय,स्पर्धकांमधील होतकरू तरुणांना करण्यात येणार असलेली आर्थिक मदत हीदेखील या कार्यक्रमाची एक खासियत आहे. या आर्थिक मदतीचा लाभ घेतलेला स्पर्धक,कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागात पाहायला मिळाला.
परभणीहून आलेल्या शुभम म्हस्के याने आपल्या अप्रतिम सादरीकरणातून परीक्षकांची मने जिंकली. आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने त्याला त्याचे शिक्षण सुद्धा पूर्ण करताआलेले नाही. अर्थातच, गाण्याचे शास्त्रोक्त शिक्षण घेणे सुद्धा त्याला शक्य झालेले नाही. असे असूनही, गुणवत्तेच्या जोरावर त्याने आपल्यातील गाणे जोपासले आहे. उत्तमआवाज आणि त्याला चांगल्या सादरीकरणाची जोड याच्या जोरावर त्याने परीक्षकांना प्रभावित केले. त्याच्या प्रभावशाली कामगिरीनंतर, कार्यक्रमाच्या नियमानुसार, 'एक लाखरुपयांची आर्थिक मदत स्वीकारून हा मंच सोडणे' किंवा 'मानाच्या 'गुरुकिल्ली'चा स्वीकार करून, आपली वाटचाल पुढे सुरु ठेवणे' असे दोन पर्याय त्याच्यासमोर ठेवण्यात आले.वेगवेगळे ऑर्केस्ट्रा व कार्यक्रमांमध्ये गाणे सादर करत आपला चरितार्थ चालवणाऱ्या शुभम म्हस्के याने, आर्थिक मदतीचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतला. एक लाख रुपयांचाधनादेश शुभमने स्वीकारला, त्यावेळी त्याची आईदेखील मंचावर उपस्थित होती. याआधी कुठल्याही कार्यक्रमात हा पर्याय देम्यात आलेला नाही. 'युवा सिंगर एक नंबर'मधीलहा पैलू कौतुकास्पद ठरतो.
आज परिस्थितीपुढे झुकत, आर्थिक मदत स्वीकारण्याचा निर्णय शुभमने घेतला असला, तरीही, पुढच्या दोन वर्षांत त्याने पुन्हा एकदा या मंचाचा भाग होण्याची संधी मिळवावीअशी अपेक्षा वैभव मांगले यांनी व्यक्त केली. एवढेच नाही, तर शुभमला तशी शपथ घेण्यास भाग पाडले. आर्थिक साहाय्य आणि परीक्षकांच्या आशीर्वादाचे पाठबळ घेऊन, 'एकाडोळ्यात आसू व एका डोळ्यात हसू' ठेवत, शुभम म्हस्के याने 'युवा सिंगर'चा मंच सोडला.
No comments:
Post a Comment