'झी युवा' वाहिनीवरील 'युवा सिंगर एक नंबर' या नव्याकोऱ्या कार्यक्रमाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या कार्यक्रमाची एक नवी आणि हटके संकल्पना हे या लोकप्रियतेचेमुख्य कारण आहे. स्पर्धकांसाठी वयाचे आणि संख्येचे कुठलेही बंधन नसणे, हा या संकल्पनेतील एक महत्त्वाचा मुद्दा आहे.पन त्याहून जास्त एक वेगळा खेळ या वेळेला खेळला गेला . पैसा कीपॅशन ?
युवा सिंगर एक नंबर' ह्या कार्यक्रमात नवनवीन गोष्टी होत आहेत . त्याचप्रमाणे शो च्या पहिल्या आणि तिसऱ्या भागात जज वैभव मांगलेंनी आणि सावनी शेंडे यांनी वाहिनीच्या फॉरमॅट प्रमाणेएक वेगळ्या प्रकारे स्पर्धकांची स्पर्धा घेतली त्यांनी दोन स्पर्धक जे त्यांच्या अप्रतिम सादरीकरणाने जजेस ना आणि प्रेक्षकांना सुद्धा आवडले त्यांना एक पर्याय दिला . ऑडिशन दरम्यानच तुम्हीआता एक लाख रुपये पुढे काहीही न खेळता घेऊन जाऊ शकता किंवा या स्पर्धेत पुढे खेळून स्वतःच नाव आणि पारितोषिकाची अंतिम राशी जिंकून स्वतःच्या गुणवत्तेवर पुढे जाऊ शकता . जरस्पर्धकाने एक लाख रुपये घेतले तर तो स्पर्धक बाद होईल व स्पर्धेमुळें होणारे नाव , मान हे त्याला मिनार नाही . हा पर्याय केवळ अशा स्पर्धकांना दिला गेला ज्यांच्यात गुणवत्तेत्याला ची जराहीकमी नव्हती पण त्यांची घराची परिस्थिती मात्र हलाखीची आहे . त्याला कारण ही हे होतं की एखादा योग्य गुणवत्तेचा स्पर्धक त्या क्षणाला मिळणाऱ्या पैसाला नाकारून स्वतः स्वतःच नावविजेत्या ट्रॉफीवर कोरेल किंवा जर खरोखरचं त्याला त्या क्षणाला या कार्यक्रमापेक्षा पैसे महत्वाचे असतील तर तेवढी तरी मदत झी युवा करू शकेल . पण पैसे घेतल्यावर स्पर्धेच्या नियमांनुसारत्याला खेळ सोडावा लागेल अन्यथा इतर स्पर्धकांवर तो अन्याय होईल .या प्रमाणे पहिल्या भागात चेतन लोखंडे आणि तिसऱ्या भागात शुभम मस्के हा यांना हा पर्याय देण्यात आला . त्यातीलचेतन लोखंडे याने हलाखीची परिस्थिती असूनही स्वतःच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवत १ लाख नाकारले आणि स्पर्धेत स्वतःला सिद्ध करण्याचे ठरवले आणि त्याचा प्रवास आपल्याला बुधवार आणिगुरुवार रात्री ९ ते १० वाजता झी युवावर पाहायला मिळेल. मात्र शुभम मस्के ची घराची परिस्थिती आणि सध्याची त्याची पैशाची निकड लक्षात घेत स्वतःला सिद्ध करण्याची गुणवत्ता असूनसुद्धापरिस्थितीसमोर त्याला झुकावे लागले आणि सारासार विचार करून त्याने ते एक लाख रूपये स्वीकारले. मात्र तरीही, पुढच्या दोन वर्षांत त्याने पुन्हा एकदा या मंचाचा भाग होण्याची संधी मिळवावीअशी अपेक्षा वैभव मांगले यांनी व्यक्त केली. एवढेच नाही, तर शुभमला तशी शपथ घेण्यास भाग पाडले. आर्थिक साहाय्य आणि परीक्षकांच्या आशीर्वादाचे पाठबळ घेऊन, 'एका डोळ्यात आसू वएका डोळ्यात हसू' ठेवत, शुभम म्हस्के याने 'युवा सिंगर'चा मंच सोडला.
No comments:
Post a Comment