Showing posts with label 'गोल गोल गरा गरा'. Show all posts
Showing posts with label 'गोल गोल गरा गरा'. Show all posts

Friday, 13 March 2020

'झी टॉकीज'च्या साथीने, 'गोल गोल गरा गरा' करत साजरा होणार विनोदाचा रविवार!!! / ब्रह्मचारी दांडेकरांच्या घरात रंगणार प्रेमकहाणी!!!

मराठी चित्रपट म्हटलंकी 'झी टॉकीजहे नाव आपसूकच आठवतंदर्जेदारभरपूर मनोरंजन करणारेनेक अप्रतिम मराठी चित्रपट या वाहिनीवर पाहायला मिळतातम्हणूनच, 'झी टॉकीजही मराठी चित्रपटांसाठीची सर्वाधिक लोकप्रिय वाहिनी आहेजुन्या  नव्या चित्रपटांची मेजवानी 'झी टॉकीज'वर नुभवायला मिळतेउत्तम मराठी चित्रपट पाहायचा असेलतर झी टॉकीजची निवड प्रेक्षक करतातया वाहिनीवररविवार १५ मार्च रोजी, 'गोल गोल गरा गराहा टॉकीज ओरिजिनल चित्रपट पाहायला मिळणार आहेहा धमालविनोदी चित्रपट प्रेक्षकांचे  भरपूर मनोरंजन करेलस्त्रियांचा अत्यंत तिरस्कार करणाऱ्या दादा दांडेकर या व्यक्तीची आणि दादांच्या तीन मुलांची ही विनोदी कथा आहेदांडेकरांच्या मनात स्त्रियांविषयी तिरस्कार असलातरीही हा चित्रपट प्रेक्षकांना हसवून लोटपोट करेलत्यामुळे प्रेक्षकांचे भरभरून प्रेम या चित्रपटाला लाभणार आहे.
दादा दांडेकर स्त्रीवर्गाचा खूप तिरस्कार करतातभाईभाऊ आणि बाळ या आपल्या तिन्ही मुलांना सुद्धा त्यांनी याबाबतीत धाकात ठेवले आहेवडिलांचा आदर करणारे हे तिघे भाऊ वडिलांच्या शब्दाबाहे नाहीतसुप्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक यांनी दादा दांडेकर ही भूमिका उत्तम रंगवली आहेअभिनेता सुशांत शेलार यानेही भाईची भूमिका उत्तमप्रकारे निभावली आहे. गिरीश ओक आणि उदय टिकेकर या कलाकारांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्याची संधी 'झी टॉकीज'च्या 'गो गोल गरा गराया सिनेमातून मिळणार आहे.
दांडेकरांच्या घरात स्त्रियांना प्रवेश नाहीकुटुंबप्रमुख असणाऱ्या दादांचं शेंडेफळअर्थात बा दांडेकर मात्र एका मुलीच्या प्रेमात पडतोप्राचीवर मनापासून प्रेम करणारा बाळ आता त्याच्या प्रेमासाठी वडिलांच्या आणि दोन मोठ्या भावांच्या विरोधात उभा ठाकणार कात्याला त्याचे प्रेम मिळणार काया प्रश्नांची उत्तरं येत्या रविवारी १५ तारखेला मिळतीलस्त्रीविरोधी दांडेकर घरातील ही विनोदी प्रेमकहाणी पाहायला विसरू नकारविवारी १५ मार्चलादुपारी १२ आणि संध्याकाळी  वाजताफक्त आपल्या लाडक्या 'झी टॉकीज'वर!!!! 

Thursday, 5 March 2020

'गोल गोल गरा गरा'मध्ये अशी असणार बाळ दांडेकर ही भूमिका!!!

'झी टॉकीज' ही मराठी चित्रपट वाहिनी 'गोल गोल गरा गरा' हा टॉकीज ओरिजिनल चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. स्त्रियांचा अत्यंत तिरस्कार करणाऱ्या दादा दांडेकर या व्यक्तीची आणि दादांच्या तीन मुलांची ही विनोदी कथा आहे. यात बाळ दांडेकर या दादांच्या शेंडेफळाची भूमिका साकारणारा अभिनेता प्रतीक देशमुख याच्याशी मारलेल्या खास गप्पा; 
. 'गोल गोल गरा गरा' सिनेमातील तुझ्या भूमिकेबद्दल आम्हाला थोडंसं सांग.या चित्रपटात मी 'बाळ दांडेकर' ही भूमिका साकारतो आहे. दादा दांडेकरांच्या तीन मुलांपैकी हे शेंडेफळ आहे. पुढच्या पिढीतील असल्यामुळे, तो थोडा मॉडर्न आहे. शहरात वावरल्यामुळे त्याला नव्या जगाची जाण आहे. त्याच्या वागण्याबोलण्यात आणि नियमित आयुष्यात शहरी मानसिकतेचा प्रभाव जाणवतो.याआधी मी विनोदी भूमिका केलेली नाही. त्यामुळे बाळची भूमिका साकारण्यासाठी मला मेहनत घ्यावी लागली आहे. 
२. गिरीश ओक  या अभिनेत्यांसह काम करण्याची संधी तुला 'झी टॉकीज' मुळे मिळाली आहे. त्याविषयी काय सांगशील?कुठल्याही नव्या चित्रपटात काम करायला मी खूप उत्सुक असतो. नव्या टीमसोबत काम करण्याची संधी त्यामुळे मिळत असते. 'गोल गोल गरा गरा'मधील कलाकारांपैकी, गिरीश सरांसोबत मी आधी एकदा काम केलेले आहे. त्यामुळे त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल थोडीफार माहिती होती. विनोदी सीन करत असताना कलाकाराला मजा आलेली असेल, तर प्रेक्षक सुद्धा निश्चितपणे त्या सीनचा आनंद घेतात, ही शिकवण मला गिरीश ओक सरांकडून मिळाली आहे. या चित्रपटाच्या टीममध्ये मी सगळ्यात लहान आहे, त्यामुळे सगळ्याच कलाकारांच्या अनुभवाचा मला फायदा झाला. 
३. तुझी भूमिका आणि तुझं आयुष्य यात काही साधर्म्य आहे, असं तुला वाटतं का?बाळ दांडेकर आणि प्रतीक देशमुख यांच्यात कुठल्याही प्रकारचे साम्य नाही. पण, खरंतर यामुळेच मला ही भूमिका साकारताना खूप मजा आली. एक नवी आणि वेगळी व्यक्ती स्क्रीनवर उभी करण्यासाठी मला मेहनत घ्यावी लागली.बाळ नेमका कुठल्या परिस्थितीत लहानाचा मोठा झाला आहे, ते समजून घेऊन त्यानुसार हे पात्र साकारायचे होते. अभिनेत्याची अशा भूमिकांमध्ये खरी परीक्षा असते. अर्थात, विविध भूमिका साकारत असताना, वेगवेगळ्या प्रकारचे आयुष्य जगण्याची संधी आम्हा कलाकारांना मिळत असते. म्हणूनच, अशी वेगळ्या प्रकारची भूमिका करायला मला आवडतं. 
४. प्रेक्षकांनी हा सिनेमा का पाहावा?रविवार १५ मार्च रोजी, हा सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एक नवा कोरा चित्रपट, तिकिटाचे पैसे खर्च न करता, घरबसल्या बघण्याची संधी 'झी टॉकीज'ने प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. संपूर्ण कुटुंबासोबत बसून, या विनोदी चित्रपटाचा आस्वाद घेणे शक्य आहे. त्यामुळे ही संधी प्रेक्षकांनी अजिबात सोडू नये, व चित्रपट नक्की पाहावा.