Showing posts with label आशुतोष पत्की. Show all posts
Showing posts with label आशुतोष पत्की. Show all posts

Thursday, 7 November 2019

दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची सुवर्णसंधी मिळाली - आशुतोष पत्की

'अग्गंबाई सासूबाईया मालिकेला पाहता पाहता प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलंमालिकेचं नाविन्यत्याची आगळी-वेगळी कथामालिकेचं वेगळं टेकिंगनिवेदिता सराफ-गिरीश ओक ही जोडीइत्यादीया सगळ्यामुळे मालिकेने अल्पशा कालावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली आहेया मालिकेमुळे अनेक तरुणींच्या गळ्यातला ताईत बनलेला प्रेक्षकांचा लाडका सोहम म्हणजेच अभिनेता आशुतोष पत्की याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेतत्याच्यासोबत या मालिकेबद्दल साधलेला हा खास संवाद
सोहम या व्यक्तिरेखेसोबत तू किती रिलेट करतोस?
काही काही सोहममधील गुण माझ्यामध्ये आहेत जस कि सोहमचा आळशीपणा काही प्रमाणात माझ्यामध्ये आहेतसेच सोहमची आई जशी त्याची काळजी घेण्यासाठी तत्पर असते तसंच काहीसं चित्र माझ्या घरी देखील आहेसकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आई मला काय हवं नको त्याची काळजी घेतेमाझ्या डाएट आणि जिममुळे दर  तासांनी मला हेल्दी मिल्स खायचे असतात त्यासाठी रोज सकाळी मला आई डबा देतेत्यामुळे जेव्हा या मालिकेचा पहिला एपिसोड पाहिला तेव्हा 'हे तर काहीसं आपल्याच घरचं चित्र आहेअशी माझ्या आईची प्रतिक्रिया होतीपण सोहम थोडा उद्धट आहेआपली आई आपल्यासाठी जे काही करते त्याची त्याला कदर नाहीयेयाबाबतीत मी सोहमच्या विरुद्ध आहे.   
या व्यक्तिरेखेसाठी तुझी निवड कशी झाली?
या व्यक्तिरेखेसाठी मी ऑडिशन दिलीआमच्या मालिकेचे प्रोड्युसर सुनील सर यांनी माझं नाव या व्यक्तिरेखेसाठी सुचवलं होतंत्यांनी मला ऑडिशनसाठी बोलावलंमी ऑडिशन दिलीमाझी लुक टेस्ट झाली आणि त्यानंतर मला कॉल आला कि माझी निवड झाली आहे.
तू या व्यक्तिरेखेसाठी काय तयारी केली?
माझी या व्यक्तिरेखेसाठी जेव्हा निवड झाली तेव्हा मला सुनील सरांनी सांगितलेला कि सोहम थोडा उद्धट आहेत्याला आईने इतकं लाडात वाढवलं आहे कि तो फक्त स्वतःचा विचार करतोदुसऱ्यांसाठी विचार करणं त्याला जमत नाहीत्यामुळे आपल्या आजूबाजूला देखील अशी काही माणसं असतात त्यांचं मी खूप निरीक्षण केलंत्यांच्या फटकळ बोलण्याची शैली पाहिली आणि याच निरीक्षणातून सोहमच्या व्यक्तिरेखेसाठी मी तयारी केली.
चाहत्यांकडून तुला काय प्रतिक्रिया मिळत आहेत?
लोकांना सोहम खूप आवडतोयप्रेक्षकांकडून मला खूप चांगल्या प्रतिक्रिया येत आहेतमी कुठे हि गेलो कि लोक आपुलकीने बोलायला येतातत्यांना आवडलेल्या प्रसंगाबद्दल गप्पा मारतातत्यामुळे मला खूप छान वाटतंतसंच सोहमचा स्वभाव काही प्रेक्षकांना खटकतो त्यामुळे काही प्रेक्षक माझ्याकडे रागाने बघतातजे लोक मला ओळखतात पण मी त्यांना नेहमी भेटत नाही आणि मालिकेत रोज मला पाहून काहींना असं वाटतं कि माझा खऱ्या आयुष्यात देखील स्वभाव असाच आहेत्यामुळे त्यांची माझ्याशी बोलायची पद्धत बदलली आहेहि माझ्या कामाची पावती आहेत्यामुळे मी या प्रतिक्रिया पॉझिटिव्हली घेतोकॉलेजमध्ये जाणारा तरुणवर्ग देखील हि मालिका पाहतो आणि सोहमला पाहून त्यांना कळतं कि आम्ही सुद्धा नकळतपणे आईला दुखावतो त्यामुळे हे वागणं चुकीचं आहे आणि सोहम  त्याच्या आईचे प्रसंग पाहताना त्यांना ते प्रकर्षाने जाणवतंमला असे बरेच मेसेजेस येतात ज्यात मुलं मला सांगतात कि तुझ्यामुळे आम्हाला कळतं कि आमचं वागणं चुकीचं आहेयासगळ्यामुळे मला खूप बरं वाटतं कि सोहमला बघून तरुणवर्ग चांगला अर्थ घेत आहे आणि त्याच्या वागणं सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.  
दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याचा तुझा अनुभव कसा आहे?
मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो कि मला या मालिकेत इतक्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळालीनिवेदिता ताई आणि माझं बॉण्डिंग खूप छान आहेत्या मला अगदी त्यांच्या मुलासारखंच वागवतातत्यामुळे माझे सेटवर खूप लाड होतातत्याचबरोबर त्या मला अभिनय अधिकाधिक कसा चांगला करायचा याचे देखील धडे देतातचित्रीकरणात देखील मला खूप मदत करताततिच्याकडून मी खूप शिकतोयगिरीश सरांच्या परफॉर्मन्समध्ये खूप ईझ असतोतेजश्री एक उत्तम अभिनेत्री आहे आणि माणूस म्हणून देखील तितकीच चांगली आहेया सगळ्यांकडून मला खूप काही शिकायला मिळतं.