संपूर्ण जगभरात कोविड-१९मुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे भारतात सुद्धा लॉकडाऊन करण्याची स्थिती उद्भवलेली असल्यामुळे, अनेक दैनंदिन व्यवहार बंद आहेत. मनोरंजन विश्वातील, मालिका, चित्रपट आणि वेब सिरीजचे चित्रीकरण सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थांबवण्यात आलेले आहे. अशावेळी, जुन्या, गाजलेल्या, उत्कृष्ट मालिका पुनःप्रक्षेपित करण्याचा मार्ग सर्वच वाहिन्यांनी निवडलेला आहे. 'झी युवा' वाहिनीवर सुद्धा फुलपाखरू, रात्रीस खेळ चाले, एक घर मंतरलेलं आणि लव्ह लग्न लोचा यासारख्या अप्रतिम मालिका पुन्हा पाहायला मिळत आहेत. आपल्या लाडक्या मालिका पुन्हा पाहण्याची संधी मिळत असल्याने प्रेक्षकवर्ग सुद्धा खुश आहे. नेहमीच प्रेक्षकांसाठी विशेष काहीतरी घेऊन येणारी 'झी युवा' वाहिनी, सर्वांसाठी आणखी एक खास सरप्राईझ घेऊन आली आहे. २० एप्रिलपासून सुरु होणाऱ्या, 'हाऊसफुल लॉकडाऊन'मध्ये, दर्जेदार चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. रोज दुपारी ३ वाजता, एका अफलातून चित्रपटाची मेजवानी 'झी युवा'वर असेल.विविध विषयांवर आधारित, वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट 'हाऊसफुल लॉकडाऊन'मध्ये पाहायला मिळतील. आपले सगळ्यांचे लॉकडाऊन हाऊसफुल करणाऱ्या, 'झी युवा'वर दाखवणार असलेल्या चित्रपटांमधून प्रेमाचे रंग बरसतील, दोस्तीची धमाल पाहायला मिळेल आणि भरपूर मनोरंजनाची हमी असेल. 'हाऊसफुल लॉकडाऊन'मध्ये टाईमपास २, मुंबई पुणे मुंबई, चिटर्स, अगं बाई अरेच्चा २, पार्टी, अशी ही आशिकी, क्षणभर विश्रांती, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, वजनदार या धमाकेदार चित्रपटांचा समावेश असणार आहे. हे दमदार चित्रपट बघायला आणि तुमचं लॉकडाऊन जबरदस्त हाऊसफुल करायला विसरु नका. त्यासाठी २० एप्रिल पासून, रोज दुपारी ३ वाजता आपले सर्वांची लाडकी 'झी युवा' वाहिनी पाहायला विसरू नका.
Showing posts with label झी युवा'. Show all posts
Showing posts with label झी युवा'. Show all posts
Monday, 20 April 2020
Monday, 25 November 2019
झी युवा'वर अप्सरा सोनाली कुलकर्णी दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत!!!
दर्जेदार मालिकांची मेजवानी प्रेक्षकांसाठी सादर करणारी, 'झी युवा' ही मराठी वाहिनी, इतर अनेक खास कार्यक्रमांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. प्रेक्षकांसाठी व चाहत्यांसाठी वेगळं आणि खास असं काहीतरी 'झी युवा' नेहमीच घेऊन येत असते.असाच एक नवा, कोराकरकरीत आणि अफलातून खजिना 'झी युवा' येत्या डिसेंबर महिन्यात घेऊन येत आहे. ११ डिसेंबर पासून 'युवा डान्सिंग क्वीन' हा नवा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अनेक सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि सेलिब्रिटी चेहरे या स्पर्धेतील स्पर्धक म्हणून पाहायला मिळणार आहेत. लोकसंगीत आणि मॉडर्न डान्सफॉर्म अशा दोन्ही प्रकारातील नृत्य स्पर्धक सादर करतील.युवा डान्सिंग क्वीन होण्यासाठीची ही स्पर्धा फारच अटीतटीची होणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने सगळ्यांची लाडकी अप्सरा, सोनाली कुलकर्णी परीक्षकांच्या भूमिकेत पाहायला मिळेल. इंद्रपुरीतून उतरलेल्या या अप्सरेसमोर मंचावर या नृत्यांगना आपली नृत्यकला सादर करतील.या शिवाय एक उत्तम दिग्दर्शक, अभिनेता असलेला अष्टपैलू कलाकार, अद्वैत दादरकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे आणि आणखी एका परीक्षकाची ओळख अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे . सेलेब्रिटी नर्तिका आणि त्याबरोवर असे मोठे चेहरे , ही मेजवानी प्रेक्षकांसाठी बहारदार ठरणार, हे निश्चित! याशिवाय, या कार्यक्रमाचा टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा प्रोमो पाहून सगळ्यांची उत्सुकता वाढलेली आहे. 'युवा डान्सिंग क्वीन' या पुढच्या महिन्यात भेटीला येणाऱ्या कार्यक्रमाविषयी आणखी जाणून घेण्यासाठी पाहत रहा, 'झी युवा'!!
Subscribe to:
Posts (Atom)

