संपूर्ण जगभरात कोविड-१९मुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे भारतात सुद्धा लॉकडाऊन करण्याची स्थिती उद्भवलेली असल्यामुळे, अनेक दैनंदिन व्यवहार बंद आहेत. मनोरंजन विश्वातील, मालिका, चित्रपट आणि वेब सिरीजचे चित्रीकरण सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थांबवण्यात आलेले आहे. अशावेळी, जुन्या, गाजलेल्या, उत्कृष्ट मालिका पुनःप्रक्षेपित करण्याचा मार्ग सर्वच वाहिन्यांनी निवडलेला आहे. 'झी युवा' वाहिनीवर सुद्धा फुलपाखरू, रात्रीस खेळ चाले, एक घर मंतरलेलं आणि लव्ह लग्न लोचा यासारख्या अप्रतिम मालिका पुन्हा पाहायला मिळत आहेत. आपल्या लाडक्या मालिका पुन्हा पाहण्याची संधी मिळत असल्याने प्रेक्षकवर्ग सुद्धा खुश आहे. नेहमीच प्रेक्षकांसाठी विशेष काहीतरी घेऊन येणारी 'झी युवा' वाहिनी, सर्वांसाठी आणखी एक खास सरप्राईझ घेऊन आली आहे. २० एप्रिलपासून सुरु होणाऱ्या, 'हाऊसफुल लॉकडाऊन'मध्ये, दर्जेदार चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. रोज दुपारी ३ वाजता, एका अफलातून चित्रपटाची मेजवानी 'झी युवा'वर असेल.विविध विषयांवर आधारित, वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट 'हाऊसफुल लॉकडाऊन'मध्ये पाहायला मिळतील. आपले सगळ्यांचे लॉकडाऊन हाऊसफुल करणाऱ्या, 'झी युवा'वर दाखवणार असलेल्या चित्रपटांमधून प्रेमाचे रंग बरसतील, दोस्तीची धमाल पाहायला मिळेल आणि भरपूर मनोरंजनाची हमी असेल. 'हाऊसफुल लॉकडाऊन'मध्ये टाईमपास २, मुंबई पुणे मुंबई, चिटर्स, अगं बाई अरेच्चा २, पार्टी, अशी ही आशिकी, क्षणभर विश्रांती, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, वजनदार या धमाकेदार चित्रपटांचा समावेश असणार आहे. हे दमदार चित्रपट बघायला आणि तुमचं लॉकडाऊन जबरदस्त हाऊसफुल करायला विसरु नका. त्यासाठी २० एप्रिल पासून, रोज दुपारी ३ वाजता आपले सर्वांची लाडकी 'झी युवा' वाहिनी पाहायला विसरू नका.

No comments:
Post a Comment