Showing posts with label बिग बॉस मराठी सिझन 2. Show all posts
Showing posts with label बिग बॉस मराठी सिझन 2. Show all posts

Thursday, 29 August 2019

बिग बॉस मराठी सिझन 2 – घरामध्ये बर्थडे सेलिब्रेशन !


मुंबई २९ ऑगस्ट, २०१९ : आपल्या सगळ्यांसाठीच वाढदिवस खूप खास असतो... काल शिवानी सुर्वेचा वाढदिवस होता आणि त्यासाठीच घरातील सदस्यांनी जय्यत तयारी देखील केली आहे... घरामध्ये किशोरी शहाणे यांनी शिवानीचे औक्षवण केले, आणि केक कटींग देखील झाले ... सगळ्यांनी मिळून छान केक तयार केला होता, खास स्वयंपाक देखील बनवला होता...
त्याच खास क्षणाचे काही फोटो :

बिग बॉस मराठी सिझन 2 – दिवस ९४ ! वीणा आणि आरोह झाले भावुक...


 
मुंबई २९, ऑगस्ट, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांसाठी कालचा दिवस खूपच अविस्मरणीय ठरला... काल टॉप 6 मध्ये पोहचलेल्या किशोरी, नेहा आणि शिव या सदस्यांना त्यांच्या घरातील प्रवासाची AV दाखविण्यात आली... सदस्य आपला प्रवास बघून भावुक तर झालेच पण त्यांना अश्रु अनावर झाले... बिग बॉस यांनी ज्या श्ब्दांत सदस्यांचे कौतुक केले ते त्यांच्यासाठी खास होते... आज वीणा जगताप, आरोह वेलणकर आणि शिवानी सुर्वेला हा खास क्षण अनुभवण्याची संधी मिळणार आहे....
वाईल्ड कार्ड म्हणून आरोहची घरामध्ये एंट्री झाली आणि त्याने घरातील सदस्यांना आपलेसे केले आणि हेच प्रेक्षकांना खूप आवडले असे म्हणत आरोहचे बिग बॉस यांनी कौतुक केले... अनेक वर्ष टेलिव्हीजन माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचल्यावर ती सज्ज होती रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करायला आणि ती अभिनेत्री म्हणजे वीणा जगताप... वीणा हे ऐकून जरा भावुक झाली.
शिवानी, आरोह आणि वीणा या तिघांसाठी देखील हा क्षण खूप महत्वाचा आणि अनमोल असणार आहे हे नक्की... तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन 2 चा आजचा भाग रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर. 

Wednesday, 28 August 2019

बिग बॉस मराठी सिझन 2 – दिवस ९३ ! सदस्यांसाठी आजचा दिवस ठरणार खास...


  
मुंबई २८ ऑगस्ट, २०१९ : बिग बॉस मराठीचा सिझन दुसरा पहिल्या दिवसापासून चर्चेमध्ये आहे मग ते टास्क असो घरातील सदस्यांची भांडण असो वा मैत्री असो... घरामध्ये आलेल्या सदस्यांपैकी ६ सदस्य आता फिनालेमध्ये पोहचले आहेत. आणि आता तो क्षण जवळ आला आहे ज्या दिवसाचे स्वप्न सदस्यांनी घरामध्ये आल्यापासून पाहिले... आजचा दिवस सदस्यांसाठी खास ठरणार आहे... कारण आज बिग बॉस सदस्यांना त्यांच्या घरातील प्रवासाची AV दाखवणार आहेत... यामुळे सदस्य भावूक होणार हे निश्चित...
साहसी, जिगरबाज, लढवय्या अशा विशेषणांनी ओळखली गेलेली व्यक्ति म्हणजे शिव ठाकरे या शब्दांत बिग बॉस यांनी शिवचे कौतुक केले. बिग बॉसच्या घरात प्रथम प्रवेश केला एका ग्लॅमरस, उत्तम अभिनेत्रीने… ती संवेदनशील, हरहुन्नरी व्यक्ति म्हणजेच किशोरी शहाणे ... किशोरी शहाणे यांच्या प्रवासाबद्दल बिग बॉस बोलत असताना किशोरी ताईंच्या डोळ्यात पाणी तरळले... “मूर्ति लहान पण कीर्ती महान” ही म्हण कोणाला लागू पडत असेल तर तो नेहा शितोळे... नेहाला देखील आज तिचा बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवास बघायला मिळणार आहे... तिघेही सदस्य यादरम्यान खूप भावुक झाले, त्यांचा इतक्या दिवसांचा प्रवास त्यांच्या नजरेसमोरून गेला...
बघूया पुढे काय झाले आजच्या बिग बॉस मराठी सिझन 2 च्या भागामध्ये रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Tuesday, 27 August 2019

बिग बॉस मराठी सिझन 2 – “मी तिच्यासोबत मैत्री नाही करू शकत” वीणा जगताप


 
मुंबई २७ ऑगस्ट, २०१९ : बिग बॉस मराठीच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत... कारण, घरामध्ये आलेल्या पत्रकारांनी सहा फाईनलिस्टन अनेक बेधडक प्रश्न विचारले आहेत ज्याची त्यांनी सडेतोड उत्तरे देखील दिली आहेत... घरामधील सदस्य एकमेकांवर अनेक आरोप – प्रत्यारोप,अनेक बाबींचे जाब विचारत असतात पण आज मात्र त्यांना हे पत्रकार जाब विचारणार आहेत, त्यांना त्यांचे मुद्दे मांडण्याची संधी मिळणार आहे...
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वीणा आणि शिवानीचे काय नाते आहे हे आता सगळ्यांनाच माहिती आहे... या दोघींचे एकमेकींशी अजिबात पटत नाही. वीणाला या पत्रकार परिषदेमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला की, या घरामधून बाहेर गेल्यावर कोणाशी मैत्री कायम ठेवायला आवडेल आणि कोणाचं तोंडसुध्दा बघायची इच्छा नाहीये ? यावर वीणाचे म्हणणे होते, “ज्यांना माझे तोंड बघायची इच्छा आहे त्यांनी या नक्की, आणि ज्यांना माझ तोंड बघायच नाही त्यांच तोंड बघायची मलाही इच्छा नाही”. आणि यावर शिवानीचे म्हणणे होते, “बरी दिसते वीणा... बघू शकते मी तीच तोंड... वीणाने त्यावर लगेच उत्तर दिले, मी तिच्यासोबत मैत्री नाही करू शकत”. 
तेंव्हा नक्की बघा पत्रकार परिषदेत पुढे काय होते बिग बॉस मराठी सिझन 2 आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर

बिग बॉस मराठी सिझन 2 – दिवस ९२ ! घरामध्ये रंगला प्रश्न – उत्तराचा डाव... शिव वीणाच्या हातातलं बाहुल बनला आहे का ?

मुंबई २७ ऑगस्ट, २०१९ : बिग बॉस मराठी सिझन 2 चा प्रवास आता शेवटच्या मार्गावर येऊन ठेपला आहे... प्रत्येकाच्या मनामध्ये आता प्रश्न आहे या सिझनचा विजेता किंवा विजेती होण्याचा मान कोण मिळेल ? येत्या रविवारी म्हणजेच १ सप्टेंबरला याचा निर्णय लागणार आहे... आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रश्न उत्तराचा डाव रंगणार आहे... घरात पत्रकार जाणार असून सदस्यांना त्यांच्या कृत्याचा, त्याच्या वागणुकीबद्दलचा जाब विचारणार आहेत... आता बघूया पत्रकारांच्या या बेधडक प्रश्नांची सदस्य कशी आणि काय उत्तर देतील ... तेंव्हा नक्की बघा आजच्या बिग बॉस मराठी सिझन 2 चा भाग रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
घरामध्ये सगळ्यांचा लाडका, प्रेम मिळवणारा शिव वीणाच्या हातातलं बाहुल बनला आहे का ? या प्रश्नावर काय असेल शिवचे उत्तर ? तर शिवानीला विचारण्यात आले तू खरोखरच टीकीट टू फिनालेसाठी पात्र होतीस का ? यावर शिवानीचे उत्तर “हो मी पात्र होते” असे दिले आणि तिने तिची बाजू कशी मांडली हे आज कळेलच. “बाहेरच्या सदस्यांनी दया करून दोघींना टिकीट टू फिनाले दिले” वीणाचे हे वाक्य बाकीच्या सदस्यांना अपमानास्पद वाटले का ? यावर बघूया वीणाचे काय म्हणणे आहे ? आणि इतर सदस्यांनी याचे काय उत्तर दिले ... नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन 2 चा भाग रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Friday, 23 August 2019

बिग बॉस मराठी सिझन 2 – बिचुकले कोणावर चिडले ? नेहाने का मागितली माफी ...


मुंबई २३ ऑगस्ट, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरात आज बर्थडे सेलिब्रेशन असणार आहे... ज्यासाठी सदस्यांना घरामध्ये सजावट करायची आहे. आणि याच मुद्यावरून सदस्यांमध्ये आज वाद होणार आहे... बिचुकले आज नेहावर चिडले आहेत... त्यांचे म्हणणे आहे, मी केलेली सजावट तू का काढून टाकलीस ? त्यावर आरोह म्हणाला, तुम्ही आता जाऊन बघा कुठलं चांगल दिसत आहे आधीच की आताच ? त्यावर बिचुकले म्हणाले आम्ही करू ते चांगल नसतच का ? वीणाचे म्हणणे आहे, “आमच्या पण काही भावना असतात, मी नेहाला म्हणाले असू दे पण तिने नाही ठेवलं जाऊ दे आता... माझ इतकच म्हणण आहे प्रत्येकाने जे काम केले आहे ते असू द्यायला हवं. त्यावर नेहाचे म्हणणे पडले ते खूप shabby दिसत होते... वीणाने नेहाला सांगितले इतक पण घाण नव्हतं दिसत. किशोरी शहाणे यांचे देखील म्हणणे पडले ज्यांनी ते केले होते त्यांच्या भावना दुखावल्या... वीणाने आरोहला सांगितल प्रत्येकाला जे करायचे आहे ते करू दे... अभिजीत बिचुकले म्हणाले, “आम्ही बाजूला थांबलो असतो तुम्ही करत आहात तर आम्ही फक्त बघत रहातो”...
नेहाने माफी मागितली पण, आता हा वाद किती पुढे गेला ? खरच हा वादाचा मुद्दा होता का ? नक्की काय झाले ? हे आजच्या भागामध्ये कळेलच... तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठीसिझन 2 चा आजचा भाग रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

बिग बॉस मराठी सिझन 2 – शिव आणि आरोहचा धम्माकेदार डान्स !


मुंबई २३ ऑगस्ट, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरात आज जंगी सेलिब्रेशन होणार आहे... सदस्य धम्माल, मस्तीच्या मूड आहेत... फूल पार्टी मूड असणार आहे,कारणदेखील तसेच आहे… बिग बॉस यांनी आज सदस्यांवर BB बर्थडे पार्टी हे कार्य सोपावले आहे... त्यामुळे सदस्य एकदम मस्तीच्या मूडमध्ये आहेत असे म्हणायला हरकत नाही. आरोह आज सैराट चित्रपटाच्या गाण्यावर झिंगाट डान्स करताना दिसणार आहे... झिंगाट गाण्यावर सगळेच सदस्य दिलखुलास पणे डान्स करताना दिसणार आहेत... तर शिवने देखील मल्हारी या गाण्यावर डान्स सादर केला आहे.आरोह आणि शिवच्या या धम्माकेदार डान्सने घरामधील पार्टीला अजूनच रंगत येणार आहे हे निश्चित...
वीणा, शिवानी, नेहा, किशोरी हे कोणत्या गाण्यावर नृत्य सादर करतील हे आज नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन 2 च्या आजच्या भागामध्ये रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

बिग बॉस मराठी सिझन 2 – दिवस ८८ ! घरामध्ये होणार “बर्थडे सेलिब्रेशन”


 
मुंबई २३ ऑगस्ट, २०१९ : बिग बॉस मराठी सिझन 2 च्या सदस्यांचा आता शेवटच्या वाटेवरचा प्रवास सुरू झाला आहे... काल घरामध्ये टिकीट टू फिनाले यासाठी कार्य रंगले होते जे सदस्यांच्या चुकीमुळे रद्द करण्यात आले... पहिल्या फेरीमध्ये आरोह आणि दुसर्‍या फेरीमध्ये शिव बाहेर पडले... किशोरी शहाणे आणि वीणा जगताप या दोघींपैकी कोणता सदस्य टिकीट टू फिनाले मिळवण्यासाठी पात्र आहे याचा निर्णय सदस्य एकमताने घेऊ न शकल्याने ते कार्य  बिग बॉस यांनी अनिर्णीत ठेवले आणि रद्द केले. शिवानी सोडून सर्व सदस्य वीणाच्या बाजूनं होते. बिग बॉस यांनी काल झाल्याप्राकावरून सगळ्याच सदस्यांची शाळा घेतली... आता किशोरी, आरोह, वीणा आणि किशोरी हे सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत नॉमिनेट झाले आहेत.
आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये धम्माल मस्ती होणार आहे... नाच, गाणी, सगळे सदस्य मिळून धिंगाणा घालणार हे नक्की ! कारण आज बिग बॉस सदस्यांवर “BB बर्थडे पार्टी” हे कार्य सोपवणार आहेत. या कार्यामध्ये बिचुकलेंचा अनोखा अंदाज बघायला मिळणार आहे... बिचुकले आज “आया है राजा” या गाण्यावर नृत्य सादर करणार आहेत... तेंव्हा बघायला विसरू नका ही धम्माल मस्ती आजच्या बिग बॉस मराठी सिझन 2 च्या भागामध्ये रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Thursday, 22 August 2019

बिग बॉस मराठी सिझन 2 – सदस्य करणार स्वत:चं मूल्यांकन …

मुंबई २२ ऑगस्ट, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सदस्य स्वत:च मूल्यांकन ठरवणार आहेत... या टास्कमध्ये किशोरी शहाणे, शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांनी स्वत:चे मूल्यांकन ६ लाख ठरवले यावर घरातील सदस्य संमती दर्शवतील की नाही हे आजच्या भागामध्ये कळेलच... मुद्रांवर सहा लाख, पाच लाख,साडेचार लाख, चार लाख, साडेतीन लाख, दोन लाख अशी किंमत लिहिलेली आहे... शिवानी सुर्वेवर ही संधी येताच तिने स्वत:ची घरातील किंमत २ लाख अशी ठरवली... आणि त्यावर तिने स्पष्टीकरण दिले. शिवानीचे म्हणणे होते, “आधी ज्या चुका माझ्याकडून झाल्या त्यासाठी मी ही किंमत ठरवली आहे... कारण जर मी त्या चुका केल्या नसत्या किंवा चुका नाही म्हणणार मी त्याला माझा राग, अग्रेशन म्हणणे... मी जर ते कमी केले असते तर मी कदाचित योग्य ठरले असते सहा लाख म्हणायला... पण मला आता ते योग्य नाही वाटत म्हणून मी सगळ्यात कमी किंमत सांगते आहे. मला अस वाटत मी परत आल्यानंतर मी माझ्या वागणुकीमध्ये योग्य त्या बाबींमध्ये बदल घडवून आणला आहे”...
आता बघूया इतर सदस्य कोणती रक्कम ठरवतील ? आणि टास्कमध्ये पुढे काय होईल ? तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन 2 आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

बिग बॉस मराठी सिझन 2 – बिचुकलेंच्या डोळ्यात का आले पाणी ?

मुंबई २२ ऑगस्ट, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरात बिचुकले आणि त्यांचे किस्से खूपच प्रसिध्द आहेत... प्रत्येक घडलेली घटना रंगतदार पध्दतीने सांगण्याचे कौशल्य त्यांच्यामध्ये आहे... आजदेखील घरामध्ये ते नेहा, शिवानी आणि आरोहला घडलेला एक मजेदार किस्सा सांगणार आहेत आणि त्यांच्या डोळ्यात पाणी का आणि कोणामुळे आले हे देखील सांगणार आहेत ... बिचुकले टेंशनमध्ये असताना त्यांना विसर पडला की त्यांची पत्नी त्यांच्यासोबत आहे आणि ते  पत्नीला पेट्रोल पंपावर विसरून पुढे एक किलोमीटर आले... पेट्रोल भरण्यासाठी बिचुकले खाली उतरले आणि परताना मात्र बायकोला विसरून पुढे गेले. बिचुकेल म्हणाले,‘मी खूप टेंशनमध्ये होतो त्यामुळे मी तिला पेट्रोल पंपावरती सोडून पुढे गेलो”... आणि हे सांगितल्यावर शिवानी म्हणाली हाणला असेल ना तुम्हाला ? बिचुकले पुढे म्हणाले,एक माणूस गाडीतून पुढे आला आणि आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे बघत होता मला कळेच ना काय झाले... परत तसेच घडले एक जोडप आलं आणि हसून पुढे गेलं. माझ्या ओळखीचे आहेत तरी असे का बघत आहेत हे कळत नव्हतं, म्हणून मी मागे वळून बघितले तर माझी बायकोच मागे नव्हती क्षणभर मला कळाले नाही काय करू आणि माझ्या डोळ्यात टचकन पाणी आले...
पुढे काय झाले ? बिचुकलेंच्या डोळ्यात पाणी का आले ?  हे जाणून घेण्यासाठी बघा बिग बॉस मराठी सिझन 2 रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

बिग बॉस मराठी सिझन 2 - दिवस ८७ !


मुंबई २२ ऑगस्ट, २०१९ : बिग बॉस मराठी सिझन 2 च्या अंतिम फेरीत नेहा शितोळे आणि शिवानी सुर्वे यांनी आपले स्थान निश्चित आहेया कार्यात नेहाला ९ पैकी ८ आणि शिवानीला ९ पैकी ५ मत मिळवून फिनाले मध्ये पोहचल्या आहेत. सिझन 2 चे हे शेवटचे नॉमिनेशन कार्य आहे अशी घोषणा बिग बॉस यांनी केली यानंतर सगळेच सदस्य भावुक झाले.  या आठवड्यात आरोहकिशोरीवीणा आणि शिव घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाले आहेत, पण मतदान प्रक्रिया बंद आहेत... बघूया पुढे काय होते ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. आज बिग बॉस सदस्यांवर एक नवे कार्य सोपवणार आहेत... ज्यामध्ये प्रत्येक सदस्याला या स्पर्धेतील स्वत:चे मूल्य दिलेल्या मुद्रांमधून ठरवायचे आहे. परंतु शेवटचे मूल्य हे सर्व सदस्यांनी सर्वानुमते ठरवायचे आहे... आता हे ठरवताना सदस्यांमध्ये वाद विवाद होणार हे निश्चित...
या कार्यामध्ये किशोरी शहाणे, शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांनी स्वत:चे मूल्य ६ लाख इतके सांगितले आहे... पुढे टास्क मध्ये काय होईल ? हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन 2 आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Wednesday, 21 August 2019

बिग बॉस मराठी सिझन 2 –बिचुकलेंवर का चिडली शिवानी ?


 
मुंबई २१ ऑगस्ट, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अभिजीत बिचुकले त्यांच्या वादग्रस्त बोलण्यावरून, वागण्यावरून नेहेमीच चर्चेत असतात. बिचुकले यांना नक्की काय बोलायचे आहे याबद्दल सदस्यांनाच्या मनामध्ये नेहेमीच प्रश्नचिन्ह असते.त्यांच्या बोलण्यावरून महेश मांजरेकर देखील बर्‍याचदा त्यांचीWEEKEND चा डावला शाळा घेतात काल देखील सुरेखा पुणेकर यांना उद्देशुन केलेल्या वक्तव्यावर सदस्यांनी त्यांना खडे बोल सुनावले. आज, शिवानी आणि अभिजीत बिचुकले यांच्यामध्ये वाद होणार आहे.  किशोरी शहाणे यांचे म्हणणे होते, “तुम्ही बोलता म्हणजे असे नाही की मी विश्वास ठेवते”... अभिजीत बिचुकले शिवानीला असे म्हणाले, “आपण दोघे जिथून आलो आहे ना”... या वाक्यावर शिवानी भडकली... “कुठून आलो आहे आपण दोघे ? त्यावर बिचुकले यांचे म्हणणे होते “आपण सुट्टीवरून आलो आहे ना”. या म्हणण्यावर शिवानीचा पारा अजूनच चढला ती पुढे त्यांना म्हणाली, “मूर्ख माणूस, कुठे गेला होतात ? गप्प बसा... अभिजीत बिचुकले कोणाच्या म्हणण्यावर गप्प बसतील हे कठीणच... आरोहने शिवानीला सल्ला दिला उगाचच चिडचिड करू नकोस....त्यावर देखील बिचुकले यांना बोलायचे होते,  बिचुकले म्हणाले “मला शांत करते आहे ती”शिवानी आरोहला म्हणाली, “आपण दोघे कुठून आलो कुठून आलो करत असतात,यांच्याबरोबर कुठे गेले होते मी ?” पुढे काय घडले हे आजच्या भागामध्ये कळेलच.
बिचुकले पुढे काय म्हणाले ? बघूया आजच्या भागामध्ये बिग बॉस मराठी सिझन 2 आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

बिग बॉस मराठी सिझन 2 –बिचुकलेंवर का चिडली शिवानी ?


मुंबई २१ ऑगस्ट, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अभिजीत बिचुकले त्यांच्या वादग्रस्त बोलण्यावरून, वागण्यावरून नेहेमीच चर्चेत असतात. बिचुकले यांना नक्की काय बोलायचे आहे याबद्दल सदस्यांनाच्या मनामध्ये नेहेमीच प्रश्नचिन्ह असते.त्यांच्या बोलण्यावरून महेश मांजरेकर देखील बर्‍याचदा त्यांचीWEEKEND चा डावला शाळा घेतात काल देखील सुरेखा पुणेकर यांना उद्देशुन केलेल्या वक्तव्यावर सदस्यांनी त्यांना खडे बोल सुनावले. आज, शिवानी आणि अभिजीत बिचुकले यांच्यामध्ये वाद होणार आहे.  किशोरी शहाणे यांचे म्हणणे होते, “तुम्ही बोलता म्हणजे असे नाही की मी विश्वास ठेवते”... अभिजीत बिचुकले शिवानीला असे म्हणाले, “आपण दोघे जिथून आलो आहे ना”... या वाक्यावर शिवानी भडकली... “कुठून आलो आहे आपण दोघे ? त्यावर बिचुकले यांचे म्हणणे होते “आपण सुट्टीवरून आलो आहे ना”. या म्हणण्यावर शिवानीचा पारा अजूनच चढला ती पुढे त्यांना म्हणाली, “मूर्ख माणूस, कुठे गेला होतात ? गप्प बसा... अभिजीत बिचुकले कोणाच्या म्हणण्यावर गप्प बसतील हे कठीणच... आरोहने शिवानीला सल्ला दिला उगाचच चिडचिड करू नकोस....त्यावर देखील बिचुकले यांना बोलायचे होते,  बिचुकले म्हणाले “मला शांत करते आहे ती”शिवानी आरोहला म्हणाली, “आपण दोघे कुठून आलो कुठून आलो करत असतात,यांच्याबरोबर कुठे गेले होते मी ?” पुढे काय घडले हे आजच्या भागामध्ये कळेलच.
बिचुकले पुढे काय म्हणाले ? बघूया आजच्या भागामध्ये बिग बॉस मराठी सिझन 2 आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

बिग बॉस मराठी सिझन 2 – दिवस ८६ ! कोण असेल फिनालेमध्ये पोहचणारा पहिला सदस्य ?


मुंबई २१ ऑगस्ट, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरात काल जुने सदस्य परत आल्याने सगळेच खूप भाऊक झाले... घरामध्ये आलेल्या सदस्यांना जुन्या आठवणी आठवल्या... या घरामध्ये आलेल्य सदस्यांवर बिग बॉस यांनी एक महत्वपूर्ण कार्य सोपावले आहे...बिग बॉस मराठीच्या घरामध्ये उरलेल्या पाच सदस्यांपैकी त्यांना वाटणार्‍या कोणत्याही दोन सदस्यांना वाचावायचे आहे... हे सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावणार आहेत. घरामध्ये आलेल्या सदस्यांना त्यांच्या मते सर्वोत्तम असणार्‍या दोन सदस्यांची नावे द्यायची आहेत... विद्याधर जोशी, दिगंबर नाईक, माधव देवचके, सुरेखा पुणेकर  यांनी शिवानी आणि नेहा या दोन सदस्यांची नावे घेतली तर वैशाली म्हाडेने शिव आणि नेहा तर मैथिली जावकर हिने शिव आणि वीणा यांची नावे घेतली...
आज घरामध्ये अभिजीत केळकर, रूपाली भोसले, हीना पांचाळ येणार असून हे सदस्य कोणत्या दोन सदस्यांची नावे घेतील हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे... तसेच आज बिग बॉस घोषणा देखील करणार आहेत नऊ पैकी आठ मत मिळवून बिग बॉस मराठी सिझन 2 च्या फिनालेमध्ये पोहचणार्‍या पहिल्या सदस्याचे नाव काय आहे... तेंव्हा जाणून घेण्यासाठी बघा बिग बॉस मराठी सिझन 2 चा आजचा भाग रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Tuesday, 20 August 2019

बिग बॉस मराठी सिझन 2 – दिवस ८५ ! दिगंबर आणि माधवचा शिवला सल्ला…


मुंबई २० ऑगस्ट, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरात आज पुन्हा जुन्या आठवणी, जुने सदस्य, ती मैत्री, त्या गप्पा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत... कारण, आज घरामध्ये सिझन 2 चे घराबाहेर पडलेले काही सदस्य येणार आहेत... हे सदस्य घरात आल्यावर कोणते सल्ले देतील ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे... आज माधव देवचके आणि दिगंबर नाईक घरामध्ये जाणार आहेत... दोघेही शिवला मोलाचा सल्ला देणार आहेत... महेश मांजरेकर प्रत्येक आठवड्याला शिव आणि वीणाला जो सल्ला देतात, वा घरातील इतर सदस्य, शिवच्या घरचे जो सल्ला शिवला देऊन गेले होते तोच सल्ला आज माधव आणि दिगंबर त्याला देणार आहेत...
दिगंबर नाईक म्हणाले,”मला आज ही संधी मिळाली म्हणून मी आलो आहे. परत सांगणार नाही मी अधिकाराने सांगतो आहे तुला शेवट पर्यंत जायचे असेल तर ते तू ठरव कसं जायच. आणि प्रश्न देखील विचारला, तू सगळ्यांनाच हो म्हणतोस आणि मग कसा बदलतोस ? बघूया यावर शिव काय उत्तर देईल ? त्याला हे म्हणणे पटेल का ?
आज माधव एक सुंदर कविता शिवला ऐकवणार आहे. शिवने योग्य तो सल्ला घ्यावा त्यातून “......... दिल दुखा हे लेकीन तुटा तो नही है, उम्मीद का दामन छुटा तो नही है... माधवने शिवला समजावले देखील स्वप्न आहे ना, फार थोडेच दिवस उरले आहेत इतक्या छानप्रकारे दिवस गेले आहेत... कोणालाही तुझा कुठल्याही प्राकरचा होऊ देऊ नकोस... आणि मी काय म्हणतो आहे ते फक्त तुला कळेल आणि मला तेच हवं आहे... आता नक्की याचा अर्थ काय आहे हे आजच्या भागामध्ये कळेलच. वीणाला माधव म्हणाला तुला काहीच सांगायची गरज नाही कारण तुला जे पटत तेच तू करतेस”...
आजच्या भागामध्ये अजून कोण कोण आले ? त्यांनी सदस्यांना काय सांगितले ? काय धम्माल मस्ती केली ? हे नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन 2 च्या आजच्या भागामध्ये रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Monday, 19 August 2019

बिग बॉस मराठी सिझन 2 – बिचुकले मागणार शिवानीची माफी ? “भोगा कर्माची फळं” – शिवानी

मुंबई १९ ऑगस्ट, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काही ना काही मुद्दयावरुन अभिजीत बिचुकले नेहेमीच चर्चेत असतात. शिवानी आणि अभिजीत बिचुकले यांचे पहिल्या दिवसापासून घरामध्ये चांगले जमते. शिवानीने एखादी गोष्ट सांगितली की त्यांना ती लगेचच समजते किंवा ती समजली आहे असे ते दाखवतात... अभिजीत बिचुकलेंसोबत घरातील सदस्य काहीतरी मजा मस्ती करताच असतात. आज शिवानी अभिजीत बिचुकलेंना माफी मागायला सांगणार आहे... बिचुकलेंनी असे काय केले की त्यांना शिवानी माफी मागायला सांगणार आहे ? बिचुकले यांना शिवानीने बाथरूममध्ये बंद केले आहे आणि तिचे म्हणणे आहे तुम्ही पहिले सॉरी म्हणा मगच मी दरवाजा उघडणार. काय आहे यामागचे कारण ?
शिवानीने त्यांना सांगितले मी परत असे करणार नाही हे म्हणा त्यावर बिचुकले म्हणाले, परत नाही पण उद्या करेन आता दरवाजा उघड... शिवानी त्यावर म्हणाली आता भोगा तुमची कर्माची फळं, अजिबात नाही उघडणार दरवाजा. १० वेळा सॉरी म्हणा तरच दरवाजा उघडेन. तर अभिजीत बिचुकले यावर गाण म्हणू लागू लागले... आरोह आणि नेहा तिथे त्याक्षणी उपस्थित होते आणि ते देखील या सगळ्याची मज्जा घेत होते... बघूया पुढे काय झाले आजच्या भागामध्ये रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

बिग बॉस मराठी सिझन 2 – शिवच्या बोलण्याने दुखावली वीणा... मी सेफ झालो त्याचा प्रॉब्लेम आहे तुला ? – शिव


मुंबई १९ ऑगस्ट, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नेहेमीच चर्चेत असलेली दोन नावे म्हणजे वीणा आणि शिव... घरामध्ये या दोघांचे एकमेकांशिवाय पान हलत नाही. जिथे वीणा तिथे शिव असे सहसा आपल्याला दिसते... महेश मांजरेकरांनी देखील WEEKEND चा डाव मध्ये वीणा याचा कंटाळा येत नाही का ? आता खेळाकडे लक्ष द्या असे शिवला सांगण्याचा सल्ला दिला... यानंतर या आठवड्यामध्ये दोघांमध्ये काही बदल दिसेल की नाही हा मोठा प्रश्न आहे... पण आज वीणा आणि शिवमध्ये वाद होणार आहे... शिवच्या बोलण्याने वीणा खूप दुखावली आहे आणि तिने तिच्या भावना किशोरीताई जवळ व्यक्त केल्या...
खरतर दर आठवड्याला या घरामधील समीकरण बदलतात... नाती बदलतात... पण नाती कशी टिकवून ठेवायची हे प्रत्येक सदस्यावर असते... वीणाला शांत आहे हे बघून शिवने विचारले काय झाले ? पण त्यावर वीणाचे म्हणणे होते काहीच नाही... शिव म्हणाला मला सांग काय प्रॉब्लेम आहे ? वीणा त्यावर त्याला म्हणाली आवाज हळू कर माझं खूप डोक दुखत आहे... वीणाच्या अश्या बोलण्याचा शिवला राग आला आणि त्याने रागात वीणाला उत्तर दिले “इतक घाणेरड अॅटीट्यूड आहे, का मी सेफ झालो त्याचा प्रॉब्लेम आहे ? माहिती नाही”... वीणाला शिवच्या या वाक्याचे वाईट वाटले. आज वीणा झालेला प्रकार किशोरीताईन सांगणार आहे ... किशोरी ताईंचे देखील म्हणणे पडले अस का म्हणाला शिव ? त्यानंतर वीणाने सांगितले महेश सर देखील म्हणाले तू नेहेमी विरुध्द टीमला पाठिंबा देते... मी शिवला पाठिंबा देत होते कारण शिव मागील आठवड्यापासून तो खूप अस्वस्थ होतामी प्रत्येक टास्क प्रामाणिकपणे खेळते असे आरोप मी नाही सहन करू शकत, माझ्या मनाला काही गोष्टी खूप लागल्या आहेत. अस असेल तर मी घरी जायला पण तयार आहे पण मी असे आरोप नाही सहन करणार
शिव वीणा मधील वाद मिटेल ? बघूया पुढे काय होईल ? नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन 2 आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

बिग बॉस मराठी सिझन 2 – दिवस ८४ घरामध्ये रंगणार “बिचुकले की अदालत” हे कार्य !


मुंबई १९ ऑगस्ट, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामधून काल हीना पांचाळ घराबाहेर पडली... आजपासून नवा आठवडा सुरू होणार आहे. हा नवा आठवडा सदस्यांसाठी कसं असेल ? काय काय टास्क रंगतील ? हे बघणे रंजक असणार आहे... बिग बॉस नेहेमीच सदस्यांवर वेगवेगळे टास्क सोपवत असतात. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बिचुकले की अदालत हे कार्य रंगणार आहे. बिग बॉसच्या घरात अभिजीत बिचुकले वकिलची भूमिका निभावणार आहेत. या कार्यात बिचुकले  प्रत्येक सदस्यावर काही आरोप लावतील. अभिजीत बिचुकळे यांनी सदस्यांवर लावलेले आरोप त्यांना फेटाळून लावून त्यांची बाजू मांडायची आहे.
टास्कमध्ये वाद – विवाद तर होणारच... बिचुकले सदस्यांवर कोण कोणते आरोप लावतील ? सदस्य स्वत:ची बाजू काशी मांडतील ? हे बघणे रंजक असणार आहे... तेंव्हा नक्की बघा बिचुकले की अदालत आजच्या भागामध्ये रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Friday, 16 August 2019

बिग बॉस मराठी सिझन 2 – शिवानीला नेमके काय झाले ?


मुंबई १६ ऑगस्ट, २०१९ : आज बिग बॉस यांनी शिवला कन्फेशन रूममध्ये बोलावले आणि त्याला दिलेले संदेश पत्र सगळ्यांना वाचून दाखविण्यास सांगितले... काय असेल त्या संदेश पत्रामध्ये ? बिग बॉस सदस्यांना कोणता टास्क देणार ? की संदेश पत्रात घरच्यांसाठी त्यांच्या कुटुंबाने दिलेला संदेश असणार म्हणून शिव खुश झाला आहे हे आज कळेलच. घरामध्ये सगळे नीट सुरू असताना अचानक शिवानी चक्कर येऊन पडली नक्की काय झाले ? आणि त्यावर बिचुकले यांनी बिग बॉसना काय सांगितले ?  हे नक्की बघा... काल पार पडलेल्या साप्ताहिक टास्कमध्ये सुशांतची टिम विजयी ठरली. काल सुशांत, मेघा आणि रेशमची घरातून एक्जिट झाली... बिग बॉस यांची घोषणा होताच रेशम टिपणीस घराचा निरोप निघताना खूप भाऊक झाली. 
आजचा टास्क काय असेल ? टास्कमध्ये कोण विजयी ठरणार ? हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन 2 आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

बिग बॉस मराठी सिझन 2 – कोणी म्हंटले बिचुकलेंना भुंगा ?

मुंबई १६ ऑगस्ट, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्य कधी घरातील कॅमेरा तर कधी एकमेकांना वेगवेगळी नावे ठेवत असतात... ही नाव त्यांच्या वागणुकीनुसार, कधी त्यांच्या बोलण्याच्या पध्दतीवरून तर कधी त्याच्या स्वभावरून ठेवलेली असतात. आज अभिजीत बिचुकले यांना घरातील सदस्यांनी सहमताने एक नाव ठेवले आहे ... अभिजीत बिचुकले त्यांच्या बोलण्याच्या स्टाईलवरून, घरातील वागणुकीवरून नेहेमी चर्चेत असतात... आरोह आज बोलताना सांगणार आहे सहमताने तुम्हाला एक नाव ठेवले आहे त्यावर शिवानी म्हणाली कानखजुरा का? त्यावर आरोह म्हणाला नाही “भुंगा”... सगळ्यांनाच हे नाव पटले आहे... आता अभिजीत बिचुकले यावर किती सहमत आहेत... त्यांचे यावर काय म्हणणे असेल ? हे कळेलच... बघूया पुढे काय होते बिग बॉस मराठीच्या आजच्या भागामध्ये रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
अभिजीत बिचुकलेंचा वीणाबरोबर चांगलच वाद झाला... मेघा, शिवानी आणि वीणाने त्यांना खडसावले की, यापुढे कोणाची कृपयावरून लायकी काढू नका... शिवानीच्या सांगण्यावरून अभिजीत बिचुकले यांनी वीणाची माफी मागितली परंतु वीणाने सांगितले यापुढे मी तुमच्याशी नाही बोलणार...