मुंबई २३ ऑगस्ट, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरात आज बर्थडे सेलिब्रेशन असणार आहे... ज्यासाठी सदस्यांना घरामध्ये सजावट करायची आहे. आणि याच मुद्यावरून सदस्यांमध्ये आज वाद होणार आहे... बिचुकले आज नेहावर चिडले आहेत... त्यांचे म्हणणे आहे, मी केलेली सजावट तू का काढून टाकलीस ? त्यावर आरोह म्हणाला, तुम्ही आता जाऊन बघा कुठलं चांगल दिसत आहे आधीच की आताच ? त्यावर बिचुकले म्हणाले आम्ही करू ते चांगल नसतच का ? वीणाचे म्हणणे आहे, “आमच्या पण काही भावना असतात, मी नेहाला म्हणाले असू दे पण तिने नाही ठेवलं जाऊ दे आता... माझ इतकच म्हणण आहे प्रत्येकाने जे काम केले आहे ते असू द्यायला हवं. त्यावर नेहाचे म्हणणे पडले ते खूप shabby दिसत होते... वीणाने नेहाला सांगितले इतक पण घाण नव्हतं दिसत. किशोरी शहाणे यांचे देखील म्हणणे पडले ज्यांनी ते केले होते त्यांच्या भावना दुखावल्या... वीणाने आरोहला सांगितल प्रत्येकाला जे करायचे आहे ते करू दे... अभिजीत बिचुकले म्हणाले, “आम्ही बाजूला थांबलो असतो तुम्ही करत आहात तर आम्ही फक्त बघत रहातो”...
नेहाने माफी मागितली पण, आता हा वाद किती पुढे गेला ? खरच हा वादाचा मुद्दा होता का ? नक्की काय झाले ? हे आजच्या भागामध्ये कळेलच... तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठीसिझन 2 चा आजचा भाग रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
No comments:
Post a Comment