Showing posts with label राजवीर आणि मनवाची एक निराळी स्टोरी!!!. Show all posts
Showing posts with label राजवीर आणि मनवाची एक निराळी स्टोरी!!!. Show all posts

Wednesday, 31 July 2019

राजवीर आणि मनवाची एक निराळी स्टोरी!!!

झी युवा वाहिनीवरील 'तू अशी जवळी राहा' या मालिकेतील राजवीर आणि मनवाला बऱ्याचदा भांडतानाच पाहिल्याचं तुम्हाला आठवत असेल. त्यांच्यातील या भांडणाचा शेवट बऱ्याचवेळा राजवीरच्या ठाम मतानेच होतो. राजवीरने त्याचे म्हणणे समोर ठेवायचे आणि बिचाऱ्या मनवाने ते गपचूप मान्य करायचे; हीच कहाणी पडद्यावर पाहायला मिळते. पण, पडद्यावर ही काहीशा दादागिरीची वागणूक खपवून घेणारी मनवा प्रत्यक्षात तशी नाही. अभिनेता सिद्धार्थ बोडके व अभिनेत्री तितिक्षा तावडे यांचे ऑफस्क्रीन नाते मात्र फारच निराळे आहे. सोशल मीडियाचा भरपूर वापर करणाऱ्या सिद्धार्थचा स्वभाव राजवीर सारखा मुळीच नाही. या दोघांची ऑफस्क्रीन मैत्री कशी आहे, हे इंस्टाग्रामच्या माध्यमातून नक्की पाहता येईल.
आपल्या अभिनय कौशल्याने सिद्धार्थने राजवीरची भूमिका उत्तमरित्या निभावली आहे. पण, त्याच्या इन्स्टाग्रामवर भेट दिलीत, तर खऱ्या आयुष्यातील सिद्धार्थ, राजवीरसारखा नाही, हे लगेचच तुमच्यालक्षात येईल. 
सतत पारंपरिक पेहरावात दिसणारी मनवा आणि सुटाबुटात टापटीप असलेला राजवीर, खऱ्या आयुष्यात मात्र अनेक तरुणांचे स्टाईल आयकॉनही ठरू शकतात. नुकताच सिद्धार्थने सोशल मीडियावर टाकलेला विडिओ हा याचा पुरावा आहे. आधुनिक कपडे, तरुणांना आवडेल अशी शैली असलेला एका रॅप गाण्याचा हा विडिओ, तितिक्षा आणि सिद्धार्थ यांची मैत्री आणि त्यांचा 'कूललुक' सगळ्यांसमोर आणणारा आहे.