Showing posts with label सई ताम्हणकर. Show all posts
Showing posts with label सई ताम्हणकर. Show all posts

Monday, 29 June 2020

तब्बल तीन महिन्यांनंतर सई ताम्हणकर परतली सेटवर, लॉकडाऊननंतर पून्हा सुरू केले शुटिंग

मराठी सिनेसृष्टीतली वर्कहोलिक म्हणून ओळखली जाणारी आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरने  सोमवारपासून चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. सोमवारी सई तिच्या रिएलिटी शोच्या चित्रीकरणस्थळी पोहोचली. तब्बल तीन महिन्यांनी पुन:श्च हरिओम करताना सई ताम्हणकर खूप उत्साहित होती.
सई म्हणाली, पुन्हा एकदा चित्रीकरणाला परतताना खूप संमिश्र भावना आहेत.  एकिकडे थोडीशी भीती आणि चिंता दाटून आली असतानाच मन खूप उत्साहित झालेले आहे. सेटवर डॉक्टर आहेत. रूग्णवाहिकाही बोलवण्यात आलीय. सेटवर आल्याआल्या टेंपरेचर चेक करणे, सतत हात धूणे, सॅनिटायझर बाळगणे. अशा  सेटवर सगळ्या सावधगिरीच्या उपाययोजना बाळगल्या जातायत. लोकांना टीव्हीवरचे तेचतेच एपिसोड पाहून कंटाळा आल्याने नव्या एपिसोडचे चित्रीकरण सुरू केले आहे. तेव्हा आपल्या सर्वांचा आशिर्वाद असू द्या.”   
दिलेली कमिटमेंट पूर्ण करणा-यांमधली सई ताम्हणकर आहे, हे तिने ह्याअगोदरही दाखवून दिले आहे. बॉलीवूड चित्रपट मीमीच्या सेटवर अपघात होऊन पाय फ्रॅक्चर झालेला असतानाही, लॉकडाऊन होणार हे कळल्यावर दुख-या पायासह सई मार्च महिन्यात रिएलिटी शोच्या चित्रीकरणासाठी पोहोचली होती. आताही लॉकडाउन उघडल्यावर निर्माते आणि प्रेक्षकांसाठी असलेली आपली बांधिलकी जपत, सई ताम्हणकर चित्रीकरणासाठी सेटवर पोहोचली. 

Wednesday, 18 March 2020

सई ताम्हणकरने दुख-या पायासह केले रिएलिटी शोसाठी शूटिंग

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 19 मार्चपासून फिल्मइंडस्ट्रीने शुटिंग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामूळे महाराष्ट्राची हास्यजत्रा या आपल्या कॉमेडी रिएलिटी शोच्या निर्मात्यांचे नुकसान होऊ नये म्हणून पायाला दुखापत झाली असतानाही अभिनेत्री सई ताम्हणकरने नुकतेच  शुटिंग  केले. 
 मीमी ह्या बॉलीवूड चित्रपटाचे शुटिंग करत असताना सईच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर तिला डॉक्टरांनी एक महिना सक्त विश्रांतीचा सल्ला दिला होता. सई गेले काही दिवस आपले सर्व कार्यक्रम रद्द करून घरी विश्रांती घेत होती. 
मात्र काही दिवस सर्वच मालिका चित्रपटांचे चित्रीकरण रद्द होणार असल्याने, सईने दुखण्यातही चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला.  प्लॅस्टर असलेल्या पायासह तिने चित्रीकरण पूर्ण केल्याचे ह्या चित्रीकरणादरम्यान तिने केलेल्या फोटोशूटवरून दिसून येत आहे. 

Thursday, 1 August 2019

नवीन संकल्पनेवर आधारित चित्रपट करायला मला नेहमीच आवडतं - सई ताम्हणकर

बोल्ड आणि ब्युटीफुल सईने नेहमीच तिच्या कामातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेततिचे लाखो चाहते आहेत आणि त्यांनी तिच्या प्रत्येक कमला दाद दिली आहेतिचीअशीच एक भूमिका जी भाव खाऊन गेली ती म्हणजे राक्षस चित्रपटातील इरावतीया चित्रपटाचं वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर येत्या रविवारी झी टॉकीजवर होणार आहेत्याच निमित्ताने सई सोबत साधलेला हा खास संवाद  
राक्षस या चित्रपटाची शैलीमराठी सिनेसृष्टीत फार हाताळली  गेलेली अशी निराळी शैली आहेअशाप्रकारचं 
नवीन संकल्पनेवर आधारित चित्रपट करायला मला नेहमीच आवडतं. 'राक्षसहा एक असा थरारपट आहेज्यात कल्पनारम्यतेचा उत्तम वापर केला आहेसिनेमाची कथासुद्धा उत्कृष्ट आहेही कथा माझ्या भावनांशी निगडित आहे असं मी म्हणेननिसर्ग हा एकमेव देव आहेअसं मला वाटतंकदाचित याचमुळे मी या कथेकडे आकर्षितझालेअशाप्रकारचा चित्रपट पहिल्यांदाच करत होतेत्यामुळे अर्थातच खूप मजा आलीदिग्दर्शक ज्ञानेशसोबत ही शैली हाताळत असतांना खूपच आनंद झाला.
सेटवरचा एखादा गमतीशीर किंवा अविस्मरणीय अनुभव आम्हाला सांगू शकशील का?
एक खूपच विनोदी आणि थोडासा वेगळा असा अनुभव सांगण्यासारखा आहेगुजरातमध्ये आमचं चित्रीकरण सुरु असतांना एका माणसाने सेटवर एक गोंडस माकड आणलंहोतंमी सहजच त्या माकडाला हात लावायला गेलेतेव्हा त्या माकडाने चक्क माझ्या हाताचा चावा घेतलात्यामुळे मला  इंजेक्शन्स घ्यावी लागली आहेतकाहीइंजेक्शन्स गुजरातमध्ये तर काही महाराष्ट्रात अशी मी ती घेतलीया निमित्ताने मी 'राक्षससिनेमाचं चित्रीकरण कधीच विसरू शकणार नाही
शरद केळकर सोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
शरद आणि मी एकमेकांसाठी 'कूल डूडआहोत असं मी म्हणेनया चित्रीकरणादरम्यान आमची छान गट्टी झालीतो एक उत्तम सहकारी आहेत्याच्यासोबत कामकरण्याचा अनुभव मस्त होताएखादा 'हॅन्डसममुलगा सेटवर असल्यावर काम करायला फारच बरं वाटतंत्याच्या आवाजाचा एक निराळा दर्जा आहेमला त्याचा आवाजसुद्धा खूप आवडतोअर्थातचशरद केळकर 'राक्षसया सिनेमाचा भाग असल्याने सिनेमात एक वेगळीच मजा आलेली आहे.
हा चित्रपट बघण्यासाठीप्रेक्षकांना कसं आवाहन कराल?
अशा संकल्पनेवर फार कमी चित्रपट बनवले जातातएक निराळा अनुभव म्हणून हा सिनेमा नक्कीच पाहायला हवाया चित्रपटाची कथा सुद्धा फारच मनोरंजक आहेएकानिराळ्या कलाकृतीचा अनुभव घेण्यासाठी हा चित्रपट पाहता येईलज्यांनी हा चित्रपट पाहण्याची संधी गमावली आहेत्यांनी झी टॉकीजच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरवरहा चित्रपट नक्की बघा.

Monday, 29 July 2019

डेब्युटंट फिल्ममेकर्स मला सिनेमाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोण देतात - सई ताम्हणकर

अभिनेत्री सई ताम्हणकरला नाविन्याची सातत्याने ओढ असतेहे तिच्या सिनेमाच्या निवडीने तिने दरवेळी दाखवून दिलंय. ह्यामुळेच सई नव्या दिग्दर्शकांसोबतही काम करताना दिसतेय. प्रसिध्दीच्या शिखरावर असलेल्या अभिनेत्री क्वचितच असेएक्पिरिमेन्ट करताना दिसत असतानासई मात्र न कचरता नव्या दिग्दर्शकांना भक्कम सपोर्ट देतेय. आणि ह्याचं लेटेस्ट उदाहरण म्हणजे उपेन्द्र सिधये आणि मोहित टाकळकर.
यंदा दोन फस्ट टाइम फिल्ममेकर्ससोबत मराठी सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री असलेल्या सईचे सिनेमे येत आहेत.  गर्लफ्रेंड सिनेमातून सिनेसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पाऊल ठेवणा-या उपेंद्र सिधये आणि मिडीयम स्पाईसी सिनेमातून दिग्दर्शक म्हणून डेब्यू करणा-या मोहित टाकळकरसोबत काम करण्याचा निर्णय सईने घेतला. पण नव्या फिल्ममेकर्ससोबत सई ताम्हणकर पहिल्यांदाच सिनेमा करत नाही आहे. ह्याअगोदरही सईने मनवा नाईक (पोर बाजार)हर्षवर्धन कुलकर्णी (हंटर),  गिरीश कुलकर्णी (जाऊ द्या ना बाळासाहेब)दिपक भागवत (3.56 किल्लारी),  ज्ञानेश झोटिंग (राक्षस)अशा फस्ट-टाइम दिग्दर्शकांच्या सिनेमांतून काम केले आहे.
सईच्या जवळच्या सूत्रांनुसारआपलं स्टारडमचं बॅगेज बाजूला ठेवून एखाद्या प्रोजेक्टला सामोरे जाण्यामध्ये सई विश्वास ठेवते. जेव्हा जेव्हा ती फस्ट-टाईम दिग्दर्शकांसोबत काम करते. तेव्हा स्वतपहिल्यांदा सिनेमात काम करत असल्याचा हुरूप सईच्या चेह-यावर नेहमी दिसतो. जिथे जिथे पहिली वेळ असते तिथे सई असतेच. ती पहिली मराठी अभिनेत्री आहे जी स्पोर्ट्स टीमची ओनर आहे. ती पहिली मराठी ए-लिस्टर अभिनेत्री आहे जी स्टँडअप कॉमेडी करते. तिला नाविन्याची ओढ आहे. त्यामुळेच नव्या फिल्ममेकर्सकडून तिला फिल्ममेकिंगचा नवा अप्रोच शिकायला खूप आवडतं. तिच्या ह्याच दृष्टीकोणामूळे ती आज यशाच्या शिखरावर आहे. ती न्यु एज सिनेमाचा चेहरा आहे.
सई ह्याविषयी म्हणते, “नव्या दिग्दर्शकांमध्ये फिल्ममेकिंगचा एक नवा दृष्टिकोण आणि फ्रेशनेस असतो. सिनेमा बनवतानाच्या नव्या दिग्दर्शकांच्या अप्रोचला अभिनेत्री म्हणून मॅच करण्यासाठी किंवा त्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना मी आपसूकच स्वत:ला आव्हान देत असते. स्वत:ला ‘ऑन टोज’ ठेवण्यासाठीची ही एक्टर म्हणून माझी एक्सरसाइज असते. भारतीय सिनेमा पूढे जायला हवा असेलआणि एक्टर म्हणून प्रगल्भ व्हायचं असेल तर नव्या दिग्दर्शकांसोबत काम करायला हवं असं मला वाटतं. “ 

Tuesday, 25 June 2019

सई ताम्हणकरच्या वाढदिवशी फुलले 100 गरजू मुलांच्या चेह-यावर हास्य


अभिनेत्री सई ताम्हणकर जेवढे रूपेरी पडद्यावर सुंदर, सशक्त आणि संवेदनशील अभि

नेत्री आहे. तेवढीच ती आपल्या वैयक्तिक आयुष्यातही आहे. हे तिच्या सामाजिक जीवनातल्या वावरावरून नेहमीच दिसून आलंय. सईचा समाजकार्यांमध्ये सक्रिय सहभाग असतो. आणि तिचा सईहोलिक्स हा फॅनक्लबही सईचे हेच विचार पूढे घेऊन जात आहे.
सई ताम्हणकरच्या वाढदिवसानिमित्त दरर्षी सईहोलिक्स काही ना काही सामाजिक उपक्रम हाती घेतात. गेल्या तीन वर्षात त्यांनी महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये वृक्षारोपण करून सईचा बर्थडे साजरा केला होता. तर यंदा त्यांनी पुण्यातल्या सूमारे 100 गरजू मुलांना वह्या-पुस्तके, पेन्सिल अशा शालेयोपयोगी वस्तूंचे वाटप केले. सईच्या वाढदिवसानिमित्त पूण्यात फिरत असलेल्या सई बर्थडे ट्रकने गरीब मुलांना खाऊचे वाटप करून त्यांच्या आयुष्यात आनंद फुलवला.  
सईहोलिक्स ह्या उपक्रमाविषयीचा विचार मांडताना म्हणतात, सई आपला वाढदिवस दिमाखात साजरा करण्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा त्याच पैशात सामाजिक कार्य करण्यावर भर देते. आणि सईचा हा विचार पूढे नेतच आम्ही फॅनक्लबनेही मग तिचा वाढदिवस सामाजिक कार्य करून साजरा करायचं ठरवलंय. म्हणूनच यंदा गरजू मुलांच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आनंद फुलवण्यासाठी आम्ही खाऊच आणि त्यांना आवश्यक असलेल्या भेटवस्तूंचे वाटप केले.
अभिनेत्री सई ताम्हणकर ह्यावर प्रतिक्रिया देताना म्हणाली, माझ्या टीमला सई बर्थडे ट्रकची कल्पना सुचली. हे माझे भाग्य आहे की, मला असा फॅनक्लब आणि अशी टीम मिळाली आहे. माझ्या विचारांचा आदर करून ते विचार अंगिकारणारा फॅनक्लब असणे, ही माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. आणि मीही माझ्या चाहत्यांना आपल्या कामातून प्रेरणा देण्याचा नेहमीच प्रयत्न करत राहीन.”  

Monday, 22 April 2019

जागतिक वसुंधरा दिनी अभिनेत्री सई ताम्हणकरने चाहत्यांना श्रमदान करण्याचे केले आवाहन

जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून अभिनेत्री सई ताम्हणकरने आपल्या चाहत्यांना मातृभूमीसाठी श्रमदान करण्याचे आवाहन केले आहे. १ में रोजी सई ताम्हणकर श्रमदान करायला जाणार आहे. आणि तिने आपल्या चाहत्यांनाही श्रमदानाचे महत्व पटवून देणारा एक व्हिडीयो सोशल मीडियावरून अपलोड केला आहे. 
पाणी फाउंडेशनच्या स्थापनेपासूनच महाराष्ट्र पाणीटंचाईविरहित करण्यासाठी योगदान देणारी सजग अभिनेत्री सई ताम्हणकर यंदाही महाराष्ट्रदिनी श्रमदान करणार आहे. सध्या आपल्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त असलेल्या सईने महाराष्ट्रातल्या नागरिकांनाही श्रमदानात सहभागी व्हायला सांगितले आहे. 
सूत्रांच्या अनुसार, श्रमदान करण्याचे सईचे हे पाचवे वर्ष असेल. सई न चुकता दरवर्षी महाश्रमदानात हिस्सा घेते. पाणी फाउंडेशनच्या श्रमदानाशिवाय  वर्षभर होणा-या कार्यक्रमांनाही सई आवर्जून सहभागी होते. 
अभिनेत्री सई ताम्हणकर म्हणते, "पाण्याअभावी रणरणत्या उन्हात तडफडणा-या गुराढोरांसाठी, पाण्याच्या शोधात बालपण हरवलेल्या लहान मुलांसाठी, डोक्यावर हंडे ठेवून पायपीट करणा-या बायकांसाठी, आणि करपणा-या शेतांसाठी मी ह्या महाराष्ट्रदिनी कुदळ-फावडे घेऊन श्रमदान करणार आहे. मी माझ्या पध्दतीने खारीचा वाटा उचलणार आहे. आपणही सहभागी व्हा."