बोल्ड आणि ब्युटीफुल सईने नेहमीच तिच्या कामातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिचे लाखो चाहते आहेत आणि त्यांनी तिच्या प्रत्येक कमला दाद दिली आहे. तिचीअशीच एक भूमिका जी भाव खाऊन गेली ती म्हणजे राक्षस चित्रपटातील इरावती. या चित्रपटाचं वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर येत्या रविवारी झी टॉकीजवर होणार आहे. त्याच निमित्ताने सई सोबत साधलेला हा खास संवाद
१. राक्षस या चित्रपटाची शैली, मराठी सिनेसृष्टीत फार हाताळली न गेलेली अशी निराळी शैली आहे. अशाप्रकारचं
नवीन संकल्पनेवर आधारित चित्रपट करायला मला नेहमीच आवडतं. 'राक्षस' हा एक असा थरारपट आहे, ज्यात कल्पनारम्यतेचा उत्तम वापर केला आहे. सिनेमाची कथासुद्धा उत्कृष्ट आहे. ही कथा माझ्या भावनांशी निगडित आहे असं मी म्हणेन. निसर्ग हा एकमेव देव आहे, असं मला वाटतं. कदाचित याचमुळे मी या कथेकडे आकर्षितझाले. अशाप्रकारचा चित्रपट पहिल्यांदाच करत होते, त्यामुळे अर्थातच खूप मजा आली. दिग्दर्शक ज्ञानेशसोबत ही शैली हाताळत असतांना खूपच आनंद झाला.
एक खूपच विनोदी आणि थोडासा वेगळा असा अनुभव सांगण्यासारखा आहे. गुजरातमध्ये आमचं चित्रीकरण सुरु असतांना एका माणसाने सेटवर एक गोंडस माकड आणलंहोतं. मी सहजच त्या माकडाला हात लावायला गेले, तेव्हा त्या माकडाने चक्क माझ्या हाताचा चावा घेतला. त्यामुळे मला ५ इंजेक्शन्स घ्यावी लागली आहेत. काहीइंजेक्शन्स गुजरातमध्ये तर काही महाराष्ट्रात अशी मी ती घेतली. या निमित्ताने मी 'राक्षस' सिनेमाचं चित्रीकरण कधीच विसरू शकणार नाही.
३. शरद केळकर सोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
शरद आणि मी एकमेकांसाठी 'कूल डूड' आहोत असं मी म्हणेन. या चित्रीकरणादरम्यान आमची छान गट्टी झाली. तो एक उत्तम सहकारी आहे. त्याच्यासोबत कामकरण्याचा अनुभव मस्त होता. एखादा 'हॅन्डसम' मुलगा सेटवर असल्यावर काम करायला फारच बरं वाटतं. त्याच्या आवाजाचा एक निराळा दर्जा आहे. मला त्याचा आवाजसुद्धा खूप आवडतो. अर्थातच, शरद केळकर 'राक्षस' या सिनेमाचा भाग असल्याने सिनेमात एक वेगळीच मजा आलेली आहे.
अशा संकल्पनेवर फार कमी चित्रपट बनवले जातात. एक निराळा अनुभव म्हणून हा सिनेमा नक्कीच पाहायला हवा. या चित्रपटाची कथा सुद्धा फारच मनोरंजक आहे. एकानिराळ्या कलाकृतीचा अनुभव घेण्यासाठी हा चित्रपट पाहता येईल. ज्यांनी हा चित्रपट पाहण्याची संधी गमावली आहे, त्यांनी झी टॉकीजच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरवरहा चित्रपट नक्की बघा.
No comments:
Post a Comment