Showing posts with label सावनी रविंद्र. Show all posts
Showing posts with label सावनी रविंद्र. Show all posts

Monday, 22 June 2020

सावनी रविंद्रच्या नव्या अनप्लग्ड सीरिजची झाली सुरूवात,‘इतना शोर शराबा क्युँ हैं’ गझल झाली प्रदर्शित

गोड गळ्याची गायिका सावनी रविंद्र जागतिक संगीत दिनी आपल्या सावनी अनप्लग्ड युट्यूब सीरिजचे तिसरे पर्व घेऊन आलीय. इतना शोर शराबा क्युँ हैं’.. ह्या गझलने ह्या तिस-या पर्वाची सुरूवात झाली आहे.
वैभव जोशी ह्यांनी लिहीलेल्या गझलला दत्तप्रसाद रानडे ह्यांनी संगीतबध्द केले आहे. सावनी रविंद्रच्या गोड आवाजाला निनाद सोलापूरकरने पियानोव्दारे श्रवणीय साथ दिली आहे. तर मयुर धांडेचे ह्या गाण्यात पेटिंग आकाराला येताना रसिकांना पाहायला मिळते आहे. मयुरने ह्याअगोदर सावनीच्या माहिया गाण्यामध्ये  अशाच पध्दतीने सुंदर पेंटिंग साकारत साथ दिली होती. सावनीच्या आवाजाला मिळालेली पियानोच्या सुरांची योग्य साथ आणि ह्याला साजेशा पेंटिंगची दृश्य, हा दृक-श्राव्य परिणाम गाण्याची गोडी अधिकच वाढवतो.  
गायिका सावनी रविंद्र म्हणते, सावनी अनप्लग्डची दोन्ही पर्व एवढी गाजली की, सातत्याने मला सावनी अनप्ल्ग्डच्या तिस-या पर्वाची विचारणा होत होती. म्हणून जागतिक संगीत दिनाचे निमीत्त साधून तिसरे पर्व घेऊन यावे असे वाटले. माझ्याच मेरे हिस्से का चांद ह्या अल्बममधलं हे इतना शोर शराबा क्युँ हैं’ गाणं आहे. ह्या गाण्याची जादू जागतिक संगीत दिनी रसिकांनी अनुभवावी म्हणून ह्या गाण्याने नवे पर्व सुरू केले आहे. आता दर आठवड्याला तिस-या पर्वातली अनप्लग्ड गाण्यांची श्रवणीय सीरिज घेऊन यायचा मानस आहे.

Thursday, 26 September 2019

गरबा प्रेमींसाठी सावनी रविंद्रचे नवरात्री स्पेशल गुजराती गाणे रिलीज

विविध भारतीय भाषांमध्ये गाणी गायलेली गोड गळ्याची गायिका सावनी रविंद्र आता नवरात्री निमित्ताने आपल्या चाहत्यांसाठी गुजराती रास-गरबा गाण्याची एक सुरेल भेट घेऊन आली आहे. मराठीशिवाय हिंदी, तमिळ, तेलगु ह्या भाषांमध्ये गाणी गायल्यावर आता सावनीने पहिल्यांदाच गुजरातीत गाणे गायले आहे. राधा-कृष्णाच्या अलौकिक प्रेमाला समर्पित कानुडा हे भक्तीपर रास-गरबा गाणे रिलीज झाले आहे.   
सावनी ओरीजीनल्स’ या तिच्या म्युजीकल सिरीजमधील हे तिसरे गाणे आहे. सावनी सांगते, आमच्या घरी घट बसतात. आई नऊ दिवस उपवास करते. प्रत्येक दिवसाचा वेगळा नैवेद्य असतो. ह्या नऊ दिवसांतून एक वेगळीच उर्जा वर्षभरासाठी आपल्याला मिळते. त्यामुळे मला नवरात्रोत्सव खूप आवडतो. मी वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गायली. पण गुजराती गाणे गाण्याची इच्छा अपूर्ण होती. रास-गरब्याच्या ह्या गाण्याने ती पूर्ण झाली.
सावनी ह्या गाण्यात रास-गरबा करतानाही दिसत आहे. पहिल्यांदाच आपल्या म्युझिक व्हिडीयोमध्ये तिने डान्स-मुव्ज केल्या आहेत. ह्याविषयी विचारल्यावर सावनी म्हणते, गायक असल्याने लहानपणापासून नवरात्रीमध्ये नेहमी गाणी गायली आहेत. गरबा केला नव्हता. आता ती इच्छा ही ह्या नव्या सिंगलव्दारे पूर्ण झाली.
सावनी सांगते, मी सोडून ह्या म्युझिक व्हिडीयोवर काम करणारी संपूर्ण टिम गुजरातीच आहे. ह्या गाण्याचे संगीतकार पार्थिव शाह आणि गीतकार प्रणव पांचाल आहेत. सह-गायक कौशल पिठाडिया हा अहमदाबादचा आहे. कौशलकडून मी गुजराती भाषेचा लहेजा शिकले. या गाण्याचे वैशिष्ठ्य म्हणजे दोन वेगवेगळ्या व्हॉइस टेक्सचर्समध्ये गाणे गायले आहे. गुजराती फोक गातानाचा ब्रॉड व्हाइस आणि माझा ओरिजनल आवाज अशा दोन वेगळ्या पध्दतीने एकाच गाण्यात गायलेय. पहिल्यादाच लाइव इन्ट्रुमेंट्ससह मी गायले आहे.
You Tube Link - 

Saturday, 17 August 2019

सावनी रविंद्रच्या नव-याचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण

आपल्या जोडीदारापाठेपाठ चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या पती-पत्नीच्या अनेक जोड्या हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत पाहायला मिळतात. आता ह्या जोड्यांमध्ये सावनी रविंद्र आणि तिच्या पतीचेही नाव सामिल झाले आहे. सुमधूर गळ्याची गायिका सावनी रविंद्रच्या नव-याचे डॉ. आशिष धांडेचे निर्माता म्हणून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण झाले आहे.
सावनी रविंद्रचे यंदाच्या स्वातंत्र्यदिनी वंदे मातरम् – एक निश्चय हे गाणे रिलीज झाले. ह्या गाण्याची निर्मिती सावनीच्या पतीने केली आहे. डॉ. आशिष धांडेच्या पदार्पणाविषयी सावनी सांगते, यंदाचा व्हॅलेंटाईन डे आमचा लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन-डे होता. त्यावेळी आशिषने माझ्या नवीन गाण्याची  निर्मिती करायची इच्छा व्यक्त केली होती. आणि आपलं पहिलं काम हे काहीतरी देशाभिमानाविषयीचं असावं, अशी त्याची इच्छा होती. त्यातूनच वंदे मातरम- एक निश्चय ह्या गाण्याची निर्मिती करायचं ठरलं.
सावनी ह्या गाण्याविषयी सांगते, मी यंदा सावनी ओरिजनल्सची सीरिज सुरू केल्यावर तमिळ गाणं रिलीज केलं. त्याला एवढा चांगला प्रतिसाद मिळाला की, मग दूसरं गाणं हिंदी करायचं ठरलं. आजवर मी इतरांनी गायलेली देशभक्तिपर गीतं कार्यक्रमांमधून गायले होते. पण माझं स्वत:च एक गाणं असावं ही इच्छा होती. म्हणून मग वंदे मातरम- एक निश्चय गाणं आकाराला आलं.