गोड गळ्याची गायिका सावनी रविंद्र जागतिक संगीत दिनी आपल्या ‘सावनी अनप्लग्ड’ युट्यूब सीरिजचे तिसरे पर्व घेऊन आलीय. ‘इतना शोर शराबा क्युँ हैं’.. ह्या गझलने ह्या तिस-या पर्वाची सुरूवात झाली आहे.
वैभव जोशी ह्यांनी लिहीलेल्या गझलला दत्तप्रसाद रानडे ह्यांनी संगीतबध्द केले आहे. सावनी रविंद्रच्या गोड आवाजाला निनाद सोलापूरकरने पियानोव्दारे श्रवणीय साथ दिली आहे. तर मयुर धांडेचे ह्या गाण्यात पेटिंग आकाराला येताना रसिकांना पाहायला मिळते आहे. मयुरने ह्याअगोदर सावनीच्या ‘माहिया’ गाण्यामध्ये अशाच पध्दतीने सुंदर पेंटिंग साकारत साथ दिली होती. सावनीच्या आवाजाला मिळालेली पियानोच्या सुरांची योग्य साथ आणि ह्याला साजेशा पेंटिंगची दृश्य, हा दृक-श्राव्य परिणाम गाण्याची गोडी अधिकच वाढवतो.
गायिका सावनी रविंद्र म्हणते, “सावनी अनप्लग्डची दोन्ही पर्व एवढी गाजली की, सातत्याने मला सावनी अनप्ल्ग्डच्या तिस-या पर्वाची विचारणा होत होती. म्हणून जागतिक संगीत दिनाचे निमीत्त साधून तिसरे पर्व घेऊन यावे असे वाटले. माझ्याच ‘मेरे हिस्से का चांद’ ह्या अल्बममधलं हे ‘इतना शोर शराबा क्युँ हैं’ गाणं आहे. ह्या गाण्याची जादू जागतिक संगीत दिनी रसिकांनी अनुभवावी म्हणून ह्या गाण्याने नवे पर्व सुरू केले आहे. आता दर आठवड्याला तिस-या पर्वातली अनप्लग्ड गाण्यांची श्रवणीय सीरिज घेऊन यायचा मानस आहे.”
No comments:
Post a Comment