Showing posts with label सोनाली कुलकर्णी. Show all posts
Showing posts with label सोनाली कुलकर्णी. Show all posts

Thursday, 11 June 2020

Zee Yuva | Yuva Dancing Queen | युवा डान्सिंग क्वीन जज सोनाली कुलकर्णी ने स्वीकारलं ३७ दिवसांचं फिटनेस चॅलेंज


युवा डान्सिंग क्वीन जज सोनाली कुलकर्णी विडिओ कॉल मुळे झाली फीटनेस फ्रिक
उत्तम आरोग्य, ही आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातील एक महत्त्वाची बाब आहे. लॉकडाऊनमध्ये घरातच बसावं लागत असल्यामुळे, अनेकांच्या फिटनेसवर परिणाम झालेला दिसत आहे. अर्थात, घरी राहूनही फिटनेसची काळजी घेण्याचा प्रयत्न अनेकजण करत आहेत. सेलिब्रिटी मंडळी सुद्धा यात मागे नाहीत. घरच्या घरी व्यायाम आणि डाएटचा फंडा वापरून, स्वतःला फिट ठेवण्यासाठी ते मेहनत घेत आहेत. 'झी युवा' वाहिनीवरील 'युवा डान्सिंग क्वीन' या स्पर्धेची परीक्षक आणि लाखो तरुणांच्या दिलाची धडकन असलेली सोनाली कुलकर्णी ही सध्या तिच्या होणारा नवरा कुणाल बेनोडेकर सोबत दुबई मध्ये राहत आहे. दुबई मध्येच तिचा  नुकताच साखरपुडा झाला. तिथेच सोनालीने सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर प्रणित चे फेमस  ३७ दिवस फिटनेस चॅलेंज स्वीकारलं होतं. ३७ दिवसांच्या या फिटनेस चॅलेंजच्या काळात, विडिओकॉलच्या माध्यमातून प्रणितच्या  संपर्कात राहून, तिने नियमित डाएट आणि वर्कआऊट केलं. या ३७ दिवसांच्या काळात, ती दिवसातून ४ तास वर्कआऊट करत होती. एवढंच नाही, तर या दिवसांमध्ये तिने साखरेचे सेवन सुद्धा बंद केले होते. सकाळच्या वेळात, रिकाम्या पोटी हा व्यायाम करण्यावर तिने भर दिला. अर्थात, जिम बंद असल्यामुळे आणि व्यायामासाठी घराबाहेर पडणे शक्य नसल्याने, घरच्याघरीच वर्कआऊट करावे लागत होते.या सर्व मेहनतीमध्ये कुणाल सुद्धा सहभागी होता . दोघांनी जोडीने मिळून प्रणित चे फिटनेस चॅलेंज पूर्ण केले .
या अनोख्या चॅलेंज बद्दल सोनाली ने सांगितलं , " युवा डान्सिंगचे शूट सुरु असताना मला प्रणितचा कॉल आला होता , मात्र तेव्हा कामाच्या वेळेअभावी मला ते जमलं नाही .लॉकडाऊन  मध्ये माझ्या वाढदिवसानिम्मित प्रणित ने हे चॅलेंज मला गिफ्ट केलं . रोज विडिओकॉलच्या माध्यमातून, प्रणित  च्या संपर्कात राहणे सोपे होते. मी करत असलेले वर्कआऊट योग्य आहे की नाही, याकडे लक्ष देणे, योग्य त्या सूचना करणे, यासाठी आम्ही विडिओकॉलचा प्रभावी वापर केला गेला. टेक्नॉलॉजीचा वापर करून, फिट राहण्याचा हा फंडा मला खूप आवडला. योग्य वर्कआऊट आणि साखरेविना असलेले डाएट, याचा परिणाम म्हणून, माझा लॉकडाऊनच्या काळातही फिटनेस सुद्धा उत्तम झाला आहे. हा फिटनेस क्लास प्रणित च्या मार्गदर्शनाखाली मी पुढेही सुरु ठेवीन.

Saturday, 16 May 2020

युवा डान्सिंग क्वीन परीक्षक अभिनेत्री सोनाली कुलकर्णी च्या वाढदिवसाचे अनोखे रिटर्न गिफ्ट

अभिनय क्षेत्रात  एखादा कलाकार मोठा होत जातो त्याच्या मेहनतीमुळे . विविध भूमिका तो जगतो आणि प्रेक्षकांना सुद्धा जगायला शिकवतोसोनाली कुलकर्णी या अभिनेत्रीचे नाव नेहमीच तिच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहत आले आहेनटरंग मधील लावणी नर्तिका असो किंवा मितवा , हंपी सारख्या मॉडर्न व्यक्तिरेखा किंवा हिरकणी सारखं एखाद उत्कृष्ट सादर केलेलं पात्रं . सोनाली ने सादर केलेली  प्रत्येक भूमिका तिने जिवंत केली आहे आणि त्यामुळेच तिचा एक मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे आणि त्या चाहत्या वर्गाचे नाव आहे ' 'सोनालिअन्स ' आणि या सर्व सोनालिअन्सच्या मार्फत या लॉकडाऊन मध्ये १८ मे  ला अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक अनोखे गिफ्ट यशवंत राव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल पिंपरी पुणे हॉस्पिटल हॉस्पिटलला दिले जाणार  आहे.
अभिनेत्री सोनाली तिच्या फॅन्स चाहत्यांशी नेहमीच संपर्कात असतेजेव्हा तिच्या फॅन्सनी सोनालीला आपण लॉकडाऊन मधील  वाढदिवस कसा साजरा करणार त्याबद्दल विचारले असता सोनालीने एक उत्कृष्ट  आयडिया फॅन्सना आणि तिच्या जवळच्या सर्व मित्र मंडळी आणि कुटुंबियांना सांगितलीही आयडिया अशी होती की सर्वानी सोनाली ला गिफ्ट म्हणून वस्तू देण्या ऐवजी सर्वानी पैसे जमवायचेजेवढे पैसे जमतील तेवढेच आणखी  पैसे सोनाली स्वतःच्या अकाउंट मधून जमवलेल्या पैश्यांमध्ये भर करेल  आणि जमलेल्या सर्व  पैशांचे एका  हॉस्पिटल स्टाफला लागणारे पीपी आय किट  सोनालीच्या वाढदिवसा निम्मित दिले जाईलसर्वांनाचं सोनाली ची ही कल्पना आवडली आणि सर्वानी सढळ हस्ते पैसे दिले . ती सध्या जज करत असलेली झी युवा वाहिनीवरील युवा डान्सिंग ची टीमधुराळा चित्रपटाची टीमहिरकणीची टीमसोनालीचे इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार मित्र मंडळीकुटुंबातील अनेकजण आणि सोनालिअन्स या सर्वानी मिळून  नेहमी प्रमाणे गिफ्ट  देता पैसे जमवले आणि त्यात तेवढ्याच पैशाची भर घालत या किट्सची खरेदी केली गेली आणि सोनालीच्या कल्पनेला खरे स्वरूप आलेआता १८ मे सोनालीच्या वाढदिवसाच्या दिवशी लोकडाऊन मध्ये ही  उपयुक्त भेट यशवंत राव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल पिंपरी पुणे हॉस्पिटलला दिली जाईल.
सोनालीला यावर विचारले असता तिने सांगितले, “या संकट समयी माझ्याकडून जेवढं शक्य आहे ते मी करायचा प्रयत्न करत आहेजिथे पैशांची मदत करण्याची गरज होती तीसुद्धा मी वेळोवेळी केली आहेवाढदिवस प्रत्येक वर्षी येतो आणि गिफ्ट सुद्धामात्र यावेळी मला रिटर्न गिफ्ट द्यायचं आहे आणि मी समाधानी आहे की माझ्या हक्काच्या मंडळींनी मला यासाठी पूर्णपणे साथ दिली आणि यावर्षीचा माझा वाढदिवस  माझ्या कायम लक्षात राहील.”