अभिनय क्षेत्रात एखादा कलाकार मोठा होत जातो त्याच्या मेहनतीमुळे . विविध भूमिका तो जगतो आणि प्रेक्षकांना सुद्धा जगायला शिकवतो. सोनाली कुलकर्णी या अभिनेत्रीचे नाव नेहमीच तिच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहत आले आहे. नटरंग मधील लावणी नर्तिका असो किंवा मितवा , हंपी सारख्या मॉडर्न व्यक्तिरेखा किंवा हिरकणी सारखं एखाद उत्कृष्ट सादर केलेलं पात्रं . सोनाली ने सादर केलेली प्रत्येक भूमिका तिने जिवंत केली आहे आणि त्यामुळेच तिचा एक मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे आणि त्या चाहत्या वर्गाचे नाव आहे ' 'सोनालिअन्स ' आणि या सर्व सोनालिअन्सच्या मार्फत या लॉकडाऊन मध्ये १८ मे ला अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक अनोखे गिफ्ट यशवंत राव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल पिंपरी पुणे हॉस्पिटल हॉस्पिटलला दिले जाणार आहे.
अभिनेत्री सोनाली तिच्या फॅन्स चाहत्यांशी नेहमीच संपर्कात असते. जेव्हा तिच्या फॅन्सनी सोनालीला आपण लॉकडाऊन मधील वाढदिवस कसा साजरा करणार त्याबद्दल विचारले असता सोनालीने एक उत्कृष्ट आयडिया फॅन्सना आणि तिच्या जवळच्या सर्व मित्र मंडळी आणि कुटुंबियांना सांगितली. ही आयडिया अशी होती की सर्वानी सोनाली ला गिफ्ट म्हणून वस्तू देण्या ऐवजी सर्वानी पैसे जमवायचे. जेवढे पैसे जमतील तेवढेच आणखी पैसे सोनाली स्वतःच्या अकाउंट मधून जमवलेल्या पैश्यांमध्ये भर करेल आणि जमलेल्या सर्व पैशांचे एका हॉस्पिटल स्टाफला लागणारे पीपी आय किट सोनालीच्या वाढदिवसा निम्मित दिले जाईल. सर्वांनाचं सोनाली ची ही कल्पना आवडली आणि सर्वानी सढळ हस्ते पैसे दिले . ती सध्या जज करत असलेली झी युवा वाहिनीवरील युवा डान्सिंग ची टीम, धुराळा चित्रपटाची टीम, हिरकणीची टीम, सोनालीचे इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार मित्र मंडळी, कुटुंबातील अनेकजण आणि सोनालिअन्स या सर्वानी मिळून नेहमी प्रमाणे गिफ्ट न देता पैसे जमवले आणि त्यात तेवढ्याच पैशाची भर घालत या किट्सची खरेदी केली गेली आणि सोनालीच्या कल्पनेला खरे स्वरूप आले. आता १८ मे सोनालीच्या वाढदिवसाच्या दिवशी लोकडाऊन मध्ये ही उपयुक्त भेट यशवंत राव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल पिंपरी पुणे हॉस्पिटलला दिली जाईल.
सोनालीला यावर विचारले असता तिने सांगितले, “या संकट समयी माझ्याकडून जेवढं शक्य आहे ते मी करायचा प्रयत्न करत आहे. जिथे पैशांची मदत करण्याची गरज होती तीसुद्धा मी वेळोवेळी केली आहे. वाढदिवस प्रत्येक वर्षी येतो आणि गिफ्ट सुद्धा, मात्र यावेळी मला रिटर्न गिफ्ट द्यायचं आहे आणि मी समाधानी आहे की माझ्या हक्काच्या मंडळींनी मला यासाठी पूर्णपणे साथ दिली आणि यावर्षीचा माझा वाढदिवस माझ्या कायम लक्षात राहील.”
No comments:
Post a Comment